रायगड जिल्हयात विषय समिती सभापती पदासाठी 15 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी



अलिबाग (जिमाका)दि.7:- रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्राची छाननी कार्यक्रम बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. छाननी पत्र तपशिल पुढील प्रमाणे-
1.) विषय समिती सभापती पदासाठी नामनिर्देशनपत्रे  दाखल करणे- बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी सकाळी अकरा वाजता ते दुपारी एक वाजेपर्यंत. ठिकाण- कै.प्रभाकर पाटील सभागृह, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग 2.) विषय समिती सभापती पदाचे निवडीसाठी बैठक- बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी दुपारी दोन वाजता. 3.) प्राधिकृत अधिकारी यांचेमार्फत दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे.- बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी दुपारी दोन वाजता बैठक सुरु झाल्यानंतर. 4.) वैधरित्या नामनिर्देशन उमेदवारांची नावे त्यांच्या सूचकासह वाचून दाखविणे - नामनिर्देशन पत्रांची छाननी  पूर्ण झाल्यानंतर. 5.)उमेदवारी मागे घेणे- अ.क्र.4 व 5 चे काम पूर्ण झाल्यानंतर., 6.) आवश्यक असल्यास विषय समिती सभापती (एक) पदासाठी निवडणूक घेणे.-अ.क्र.4 व 5 चे काम पूर्ण झाल्यानंतर.7.) आवश्यक असल्यास विषय समिती सभापती (दोन)पदासाठी निवडणूक घेणे- अ.क्र.6 चे काम पूर्ण झाल्यानंतर. 8.) आवश्यक असल्यास समाज कल्याण समिती सभापती पदासाठी निवडणूक घेणे- अ.क्र.7 चे काम पूर्ण झाल्यानंतर.9.)आवश्यक असल्यास, महिला व बाल कल्याण समिती पदासाठी निवडणूक घेणे- अ.क्र.8 चे काम पूर्ण झाल्यानंतर.
000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक