अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत
रायगड(जिमाका)दि.02: - जिह्यातील प्रथम 01 ते 03 किंवा 05 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतो. त्यानुसार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी दि.20 जुलै 2025 पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या, सदनिका क्र.2, तळमजला, मारुती मंदिराच्या मागे चेंढरे, अलिबाग येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. रायगड रविंद्र भा. धनुर यांनी केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) या महामंडळामार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-माद...