Posts

Showing posts from October 13, 2019

वोट कर रायगडकर…. घोषणांनी दुमदुमले अलिबाग

Image
रायगड अलिबाग दि.19, : जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत.  याच कार्यक्रमांतर्गत अलिबाग बीच येथून अलिबाग शहरात भव्य वॉकेथॉन रॅली काढण्यात आली.   वोट कर रायगडकर…. चला मतदान करु या….लोकशाही मजबूत करु या…आपका वोट आपकी ताकद…एकच लक्ष्य मताचा हक्क…. मतदार राजा जागा हो..लोकशाहीचा धागा हो…या घोषवाक्यांनी अलिबाग बीच व शहर दुमदुमून गेले. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी हिरवा झेंडा दाखवून या वॉकेथॉन रॅलीला अलिबाग बीच येथून सुरुवात झाली. आज सकाळी साडेसात वाजता अलिबाग बीच येथून सुरुवात होऊन रायगड जिल्हा परिषद,श्री समर्थ स्नॅक कॉर्नर,अलिबाग अर्बन बँक को.लि.,स्टेट बँक ऑफ इंडिया,अरुण कुमार वैद्य, जा.र.ह.कन्याशाळा, युनियन बँक, नगररचना कार्यालय, बस स्टँण्ड, रेवदंडा नाका, शेतकरी भवन,ठिकरुळ नाका, शिवाजी पुतळा,जामा मशिद,चावडी मोहल्ला,पोस्ट ऑफीस, अलिबाग बीच येथे रॅलीचा सांगता झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने,

190-उरण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल

रायगड अलिबाग दि.19, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करिता 190- उरण विधानसभा मतदार संघात सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.00   ते सायं.6.00 वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.   या अनुषंगाने पुढील मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे आहे. तरघर-1-मु.तरघर, पो.उलवा, तरघर, मु.मोहाचापाडा पो.उलवा तलघर येथील केंद्र क्र.2 चे रा.जि.प.मराठी शाळा तरघर पश्चिमेकडील खोली क्रमांक 2   हे मतदान केंद्राचे   जुने ठिकाण होते. त्याऐवजी रा.जि.प.शाळा सिडको नवीन इमारत उलवे नोड सेक्टर क्र.25 पश्चिमेकडील खोली क्र.1 हे मतदानाचे नवीन ठिकाण आहे. तरघर-2-वरची आळी पो.उलवा, कोंबडभुजे,आलवारीस वाडी (बाजार), पो.उलवा, कोंबडभुजे, शाळेच्या बाजूला,पो.उलवा, अंगणवाडीच्या बाजूला, पो.उलवा कोंबडभुजे, खालची आळी, पो. उलवा कोंबडभुजे, कातकरीवाडी, पो.उलवा कोंबडभुजे मारु मंदिर समोर पो.उलवा कोंबडभुजे येथील केंद्र क्र.3 चे रा.जि.प.मराठी शाळा कोंबडभुजे उत्तरेकडील खोली क्रमांक 2   हे मतदान केंद्राचे जुने ठिकाण होते. त्याऐवजी रा.जि.प.शाळा सिडको नवीन इमारत उलवे नोड सेक्टर क्र.25 पश्चिम

जिल्ह्यात मनाई आदेश

रायगड अलिबाग दि.19, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करिता जिल्ह्यात सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी   7.00 ते सायं.   6.00 यावेळेत मतदान होणार असून गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान मोजणी होणार आहे.    त्या अनुषंगाने   निवडणूकीचे मतदान व मतमोजणी कार्यक्रम शांततेत   व सुरळीत पडावे आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजाविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे व आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व शस्त्र परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेऊन फिरण्यास, मतदान केंद्राच्या 100 मी. परिसरात मोबाईल, पेजर अथवा कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगणे तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडेल असे कोणतेही कृत्य करण्यास   अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973   चे कलम 144 नुसार मनाई आदेश जारी केला आहे. हा मनाई आदेश जिल्ह्याच्या हद्दीतील 189-कर्जत, 190-उरण (जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यक्षेत्रापुरती), 191-पेण, 192-अलिबाग,193-श्रीवर्धन, 194-महाड विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत दि.19 ऑक्

जिल्ह्यातील निजामपूर जि.प.गट व आंबेवाडी पं.स.गण पोटनिवडणूक मतदार यादी कार्यक्रम

अलिबाग (जिमाका) दि.19:- जिल्ह्यात माणगांव तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र.45-निजामपूर व रोहा तालुक्यतील पंचायत समिती 80-आंबेवाडी निर्वाचक गणामध्ये पोटनिवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 04/10/2019, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणूकीकरीता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरीता प्रसिध्द करण्याचा दिनांक 02/11/2019, मतदार यादी संदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 06/11/2019, निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख 08/11/2019, निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख 08/11/2019, मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्द करणे दिनांक 11/11/2019 असा आहे असे तहसिलदार (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

रायगडकर व्होट कर…. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

Image
रायगड अलिबाग दि.15 :- देशाच्या,राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदानाचा हक्क तथा कर्तव्य बजावणे अत्यंत आवश्यक आहे.   हा संदेश जनमाणसात पोहचविण्यासाठी 19 ऑक्टोबर रोजी  जिल्ह्यात  वॉक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रायगडकर व्होट कर… असे आवाहन जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.सूर्यवंशी बोलत होते.  यावेळी स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने आदि उपस्थित होते. डॉ.सूर्यवंशी म्हणाले जिल्ह्यात आतापर्यंत स्वीप कार्यक्रमांतर्गत साडेतीन लाख संकल्प पत्र भरुन घेण्यात आले आहेत.   271 पथनाट्ये सादर करण्यात आली असून 490 बॅनर्स लावण्यात आले आहेत.  शाळा, महाविद्यालये, बचतगट, कामगार यांच्या मार्फत 236 मतदान जनजागृतीच्या रॅलीचे आयोजित करण्यात आले.  ज्या कंपनीच्या कामगारांचे व त्यांच्या कुटूंबियाचे मतदानाचे प्रमा

विधानसभा निवडणूक 2019 करिता जिल्हा निवडणूक यंत्रणेचे काम समाधानकारक ---कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड

Image
रायगड अलिबाग दि.15 :- विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्याची निवडणूक   यंत्रणा सज्ज झाली आहे.   निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.   निवडणूकी संबंधिची पूर्वतयारी पूर्ण झाल्याने कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड यांनी समाधान व्यक्त केले.   जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीच्या तयारी संबंधिविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.दौंड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)वैशाली माने, स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव व इतर नोडल अधिकारी उपस्थित होते.        मतदान केंद्र संख्या व ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, ई.व्ही.एम., व्ही.व्ही.पॅट संख्या, कर्मचारी संख्या, सुरक्षा आढावा, मतदान जनजागृती अभियान यासर्व निवडणूकीशी संबंधित बाबीचे नियोजन पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी