Posts

Showing posts from November 5, 2017

राष्ट्रीय विधी सेवा सप्ताहनिमित्त रॅली

Image
अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.10 - :    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग व वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा दिन सप्ताहनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले.   या रॅलीचे उदघाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग मु.गो.सेवलीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळी दिवाणी न्यायाधीश व.स्तर तथा सचिव जिल्हा विधी प्राधिकरण एल.डी.हुली, मुख्यालयातील अन्य स्थानिक अधिकारी व जिल्हा सरकारी वकील संतोष पवार, वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण ठाकूर, सेक्रेक्टरी ॲड.के.डी.पाटील हे उपस्थित             या रॅलीचा मारुती नाका, बालाजी मंदिर या मार्गाने जाऊन एस.टी.स्टॅंड अलिबाग यामार्गे जिल्हा न्यायालयात समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थींनी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंगच्या विद्यार्थींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 00000

पायाभुत सुविधांची उभारणी करुन मासेमारी व्यवसायाला बळकटी

Image
  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9- जिल्ह्यातील मत्सविकास विभागाने गेल्या तीन वर्षात मत्स्य विकास क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. मासेमारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करुन मासेमारीला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.  रायगड जिल्ह्याला 220 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. शिवाय खाड्या आणि नद्यांचेही विस्तृत जाळे असल्याने या जिल्ह्यात मासेमारीला मोठा वाव आहे. त्यामुळे मासेमारी हा इथला मोठ्याप्रमाणावर रोजगार संधी निर्माण करणारा व्यवसाय आहे. मत्स्य विभागाने जिल्ह्यात राष्ट्रीय सहकार विकास निगम या योजनेअंतर्गत सन 2016-17 मध्ये 169 लाभार्थी गटांना नौका बांधणीसाठी 14 कोटी 13 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य वाटप केले आहे.  मासेमारीसाठी नौकांव्यतिरिक्त अन्य सामुग्री मोठ्या प्रमाणावर लागत असते.  या साथनांच्या खरेदीवरही शासन अर्थसहाय्य देत असते. त्यात बिगर यांत्रिक नौका बांधणीसाठी  32 लाभार्थ्यांना 32 लाख रुपयांचे अनुदानही वाटप करण्यात आले आहे. मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या  नौकांना लागणाऱ्या डिजेल तेलाच्या विक्रीकराच

पं.स. गण चाणजे ता. उरण पोटनिवडणूक कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 9:-  राज्य निवडणूक आयोगाच्या पोटनिवडणूक कार्यक्रमान्वये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण पंचायत समिती निर्वाचक गण -56 चाणजेच्या पोटनिवडणूकीबाबत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तो पुढीलप्रमाणे- नामनिर्देशन स्विकारण्याचा कालावधी-दि. 23 ते 28 नोव्हेंबर 2017 नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे-दि.29 नोव्हेंबर 2017 नामनिर्देशनपत्राबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख -दि.2 डिसेंबर 2017 जिल्हा न्यायाधीशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख –दि.5 डिसेंबर 2017 उमेदवारी मागे घेणे- जेथे अपिल नाही तेथे-दि.4डिसेंबर 2017-11-09 ब) जिथे अपिल आहे तेथे-दि. 7 डिसेंबर 2017 मतदानाची तारीख- दि.13 डिसेंबर 2017., मतमोजणीची तारीख- 14 डिसेंबर 2017, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे. ०००००

मतदान याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2018: मतदार नोंदणी व पडताळणीसाठी 15 पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या घरोघरी भेटी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9- भारत निवडणूक आयोगाने मतदान याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2018 घोषित केला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी करुन  मतदार यादी अचूक होण्यासाठी व मतदार नोंदणीविषयक चांगल्या सुविधा देण्यासाठी  15 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी व नोंदणी करणार आहेत.  तसेच या कालावधीत 1 जानेवारी 2018 या दिवशी ज्यांच्य वयाची 18 वर्षे पुण होत आहेत अशा नवमतदारांचीही नोंदणी केली जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करुन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  केले आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदान याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2018 घोषित केला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पनवेल,कर्जत,उरण,पेण,अलिबाग,श्रीवर्धन, महाड या विधानसभा मतदारसंघाच्या प्रारंप मतदार याद्यांची प्रसिद्धी दि.3 ऑक्टोबर 2017 रोजी करण्यात आली आहे. तथापि हा कार्यक्रम दि.30 नोव्हेंबर 2017 पर्यंत सुरु ठेवावा असे निर्देश भारत

कातकरी समाजाने शासकीय योजनांचा लाभ घ्यावा :-तहसिलदार अजय पाटणे

Image
            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:- आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी शासनाच्या अनेक योजना असून या योजनांचा कातकरी समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन पेणचे तहसिलदार अजय पाटणे यांनी येथे केले.   पेण तालुक्यातील धामणीवाडी येथे आयोजित कातकरी उत्थान अभियान कार्यक्रमांतर्गत आयोजित दाखले वाटप शिबीरात ते बोलत होते.             यावेळी धामणीच्या सरपंच श्रीमती प्रियांका लंबाडे, नायब तहसिलदार धनंजय कांबळे, मंडळ अधिकारी डी.डी.निकम, आदिवासी विकास निरीक्षक निलेश पालकर, संशोधन सहायक डी.एस.दळवी, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र दुदुसकर, श्रमिक संघटनेचे दिलीप डाके, अनुलोमचे जिल्हा प्रमुख रविंद्र पाटील आदि उपस्थित होते.             यावेळी मार्गदर्शन करताना तहसिलदार श्री.पाटणे म्हणाले की, कोकण विभागाचे आयुक्त जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आदिवासी कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी कातकरी उत्थान अभियान राबविण्यात येत आहे.  आदिवासींना वय व आधिवास, रहिवास, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड आदी दाखले देऊन  त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल.  कातकरी समाज हा उपजिवीकेसाठी विविध ठिकाणी स्थलांतर करीत असतो.  त्

धान खरेदीः1550 रुपये प्रति क्विंटल दर : हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:-   जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी पंचवीस केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून सर्वसाधारण दर्जाच्या धानासाठी 1550 रुपये प्रतिक्विंटल दर शासनाने निश्चित केला आहे. या दरापेक्षा कमी दराने धान खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी  डॉ. विज सूर्यवंशी यांनी दिला आहे. रायगड जिल्ह्यात   पंचवीस धान खरेदी केंद्रांना मंजूरी देण्यात   आली आहे. त्यापैकी धान या धान्यासाठी सर्वसाधारण दर्जा   रु.1550/- प्रति क्विंटल व   अ दर्जा रु.1590/- प्रति क्विं. आधारभूत किंमती निश्चित केल्या आहेत. आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धान खरेदी झाल्याचे निदर्शनास आल्यास शासन निर्णय मुद्दा क्रमांक 5.4 इतर ब) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, शेतकऱ्यांने उत्पादीत केलेल्या उत्पादनाची महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी  ( नियमन )  नियम 1963 च्या नियम 32 (ड) अन्वये कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात केंद्रशासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्

लोकशाही दिनात 5 अर्ज प्राप्त

Image
            अलिबाग दि.06 (जिमाका)  :-  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये  5  अर्ज प्राप्त झाले आहेत.               यामध्ये महसूल विभाग- 3 व मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-2 असे एकूण 5 अर्ज प्राप्त झाले आहेत.  मागील प्रलंबित अर्ज 3  आणि आजचे 5 असे एकूण 8 अर्ज प्रलंबित आहेत.  यात महसूल विभाग-5, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-2, मुख्य नियंत्रक अनाधिकृत बांधकाम (सिडको)-1.   यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी  उपस्थित होते. 0000

लॅटव्हियाच्या पंतप्रधानांची शिष्टमंडळासह जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टला भेट व द्विपक्षीय व्यापार चर्चा

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.5(जिमाका)- भारतात पाच दिवसीय भेटीसाठी आलेले लॅटविया या देशाचे पंतप्रधान श्री. मारिस कुसिनस्किस यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय शिष्टमंडळाने शनिवारी (दि.4) उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या बंदरास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली.  ही चर्चा फलद्रुप झाल्याची भावना श्री. कुसिनस्किस यांनी व्यक्त केली. या चर्चेत जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. लॅटविया चे पंतप्रधान श्री. मारिस कुसिनस्किस व त्यांचे शिष्टमंडळ शनिवारी मुंबईहून बोटीने जेएनपीटीला आले. त्यांनी जेएनपीटी बंदराची पाहणी केली. भारतासोबत व्यापार संबंध दृढ करण्यासाठी आवश्यक मालवाहतूक, साठवणूक व दळणवळण सुविधांची त्यांनी पाहणी केली. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष नीरज बन्सल यांनी               श्री. कुसिनस्किस व त्यांच्या समवेत आलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.  त्यानंतर द्विपक्षीय व्यापार बैठकीत श्री. बन्सल यांनी भारत सरकार तर्फे सागरमाला या बंदर सुविधा आधुनिकीकरण मोहिमेची माहिती उपस्थितांना दिली.  तसेच जेएनपीटी मध्ये उपलब्ध अत्याधुनिक दळणवळण सुविधांची माहिती द