Posts

Showing posts from March 5, 2023

विद्यार्थ्यांना टॅबलेट व सिमकार्ड वाटप करण्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन

अलिबाग,दि.10(जिमाका):- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे(महाज्योती) मार्फत JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे.      त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील एकूण 67 विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटप करण्यासाठी दि.13 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.      संबंधित विद्यार्थ्यांनी येताना स्वत:चे आधारकार्ड, ओळखपत्र, पालकांचे आधारकार्ड, ओळखपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी गुणपत्रक, बोनाफाईड ही कागदपत्रे सोबत आणावीत. तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिराजवळ, श्रीबाग रोड, अलिबाग येथे किंवा कार्यालयाच्या 8007473157 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांनी कळविले आहे. ००००००

कायदेविषयक शिबिरे व फिरते लोक अदालत उद्घाटन कार्यक्रम संपन्न

Image
  अलिबाग,दि.10,(जिमाका):-  मा.उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे निर्देशानुसार  “ न्याय आपल्या दारी ”  या संज्ञेतर्गत दि.9 मार्च ते दि.7 एप्रिल 2023 या कालावधीत रायगड जिल्हयात  कायदेविषयक शिबिरे व फिरते लोक अदालत यांचे आयोजन करण्यात आले आहे.              या कायदेविषयक शिबिरे व फिरते लोक अदालतींचा उद्घाटन समारंभ दि.9 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड श्रीमती.एस.एस.सावंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संपन्न झाला.              यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 श्री.अशोककुमार भिलारे, जिल्हा न्यायाधीश-2 श्री.अ.थट्टे, जिल्हा न्यायाधीश-3 श्री.एन.मणेर, श्रीमती एस.उगले, राष्ट्रीय प्राधिकरण विधी सचिव रायगड श्री.अमोल शिंदे, निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी, श्रीमती एस.सोनी, श्रीमती वर्षा पाटील, श्रीमती एस.मुळीक, श्रीमती जे.कोकाटे, श्रीमती अ.मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.       कायदेविषयक शिबिर व फिरते लोक अदालत कार्यक्रमांचे नियोजन पुढीलप्रमाणे:-             मंगळवार

जागतिक महिला दिनानिमित्त वरसोली बीच समुद्र किनारी महिलांकरिता पारंपारिक खेळाचे आयोजन

Image
    अलिबाग,दि.9,(जिमाका) :-  आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड,नेहरू युवा केंद्र अलिबाग,प्रिझम सामाजिक संस्था अलिबाग, श्रीबाग लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांकरिता पारंपारिक खेळाचे आयोजन वरसोली बीच समुद्र किनारी येथे दि. 8 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजेपासून  करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून रायगड जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले, ॲड.नेहा राऊत, ॲड.कलाताई, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या श्रीमती तपस्वी गोंधळी, नेहरू युवा केंद्र अलिबाग चे समन्वयक श्री निशांत रौतेला, श्रीमती प्राची जोशी, श्रीमती प्राजक्ता कोकणे, श्रीमती सुचिता साळवी, श्रीमती मनीषा मानकर, श्री.सचिन निकम, श्री.संदीप वांजळे, अलिबाग पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री प्रकाश सोनवडेकर, सिद्धार्थ खंडाळे, वरसोली ग्रामपंचायत चे सदस्य महिला, महिला, विद्यार्थिनी आदी संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी सकस आह

माणगाव दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर न्यायालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न माणगाव न्यायालयामुळे पक्षकारांना जलद व योग्य न्याय मिळेल -न्यायमूर्ती अमित बोरकर

Image
    अलिबाग,दि.09(जिमाका):-   माणगाव येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि.5 मार्च2023  रोजी माणगाव जिल्हा सत्र न्यायालय परिसरात पार पडला. या न्यायालयामुळे येथील पक्षकारांना जलद व योग्य न्याय मिळेल, असे उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रायगड जिल्हा अलिबाग अमित बोरकर यांनी सांगितले. उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रायगड जिल्हा अलिबाग अमित बोरकर यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला न्यायालय कक्षाचे उद्घाटन केल्यानंतर राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.      यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत, जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश नवनाथ कोले, न्यायाधीश सर्वश्री.फुझळके, साटोटे, पाठारे, निवृत्त न्यायाधीश जहागीरदार, माजी पालकमंत्री आमदार कु.आदिती तटकरे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माणगाव बार असोसिएशन अध्यक्ष ॲड.महेंद्र मानकर, ॲड. राजीव साबळे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, ॲड.विनोद घायाळ, माणगाव नगरपंचायत नगरसेवक, श्रीवर्धन, महाड, रोहा, बार असोसिएशन सदस्य, वकील, पक्षकार  व कर्मचारी आद

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन

    अलिबाग,दि.09(जिमाका):-   ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी राज्यात ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानांतर्गत आतापर्यंत 5.17 लक्ष स्वयं सहाय्यता गटांची स्थापना झालेली असून त्यामाध्यमातून 60 लक्ष कुटुंबांना अभियानाशी जोडले आहेत. या अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेले स्वयं सहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने सन 2022-23 या कालावधीतील महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे दि.08 ते 19 मार्च 2023 या कालावधीत सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (CIDCO Exhibition & Convention Center), वाशी, नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांना त्यांच्या तयार केलेल्या वस्तू उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्य पदार्थ सहजपणे शहरी नागरीकांपर्यंत पोहचविता येतात. त्यांना ए

उमेद लघुपट स्पर्धेत अरुणोदय संस्थेचा राज्यात चौथा क्रमांक

                     अलिबाग,दि.09(जिमाका):-  शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद लघुपट स्पर्धेत अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्या. खरसई या संस्थेने राज्यात चौथा क्रमांक पटकावला. सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे झालेल्या महालक्ष्मी सरस कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते रोख रक्कम पन्नास हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.  उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांनी सहभागी घेतला होता. संस्थेने किशोर शिताळे यांच्या संकल्पनेनुसार राजलक्ष्मी महिला ग्रामसंघ काळसुरी यांच्या यशोगाथेवर आधारित उमेद या नावाने लघुपटाची निर्मिती आम्ही आहोत Struggler ह्या यूट्यूब चॅनेलच्या सहकार्याने केली असून लेखन दर्पण जाधव,दिग्दर्शन अजिंक्य

प्राणी क्लेष सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्य नेमणुकीसाठी इच्छूक व्यक्ती/संस्थांनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.08(जिमाका):-  रायगड जिल्ह्याच्या प्राणी क्लेष सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणूका करण्याविषयी महाराष्ट्र शासनाच्या कृषी,पदुम विभागाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या समितीवर रायगड जिल्ह्यातील शासनमान्य गोशाळा, पांजरापोळ यांच्याकडील एक सदस्य, प्राणी कल्याणासाठी झटणाऱ्या विश्वस्त संस्थाकडून दोन सदस्य तसेच प्राण्यांबाबत मानवतावादी कार्य करणारे, प्राणी प्रेमी यांच्यातून 5 ते 6 सदस्यांची नेमणूक करावयाची आहे.  याकरिता रायगड जिल्ह्यातील गोशाळा, पांजरापोळ, प्राण्यांविषयी कार्य करणाऱ्या विश्वस्त संस्था, प्राण्याबाबत मानवतावादी कार्य करणाऱ्या पात्र इच्छूक व्यक्ती/संस्था यांनी जवळच्या पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड अलिबाग यांच्याकडे संपर्क करुन अर्ज प्राप्त करुन घ्यावा.अर्ज दि.15 मार्च 2023 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त रायगड-अलिबाग कार्यालयाकडे सादर करण्यात यावा. अर्जासोबत त्यांनी केलेल्या प्राणी कल्याणविषयक कार्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र सादर करावे, असे जिल्

सावित्री नदी व इतर अनुषंगिक नद्या व उपनद्यांमधील गाळ काढण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेस दि.15 मार्च पर्यंत मुदतवाढ

    अलिबाग,दि.08(जिमाका):- सावित्री नदी व इतर अनुषंगिक नद्या व उपनद्यांमधील गाळ काढण्यासाठी महाड व पोलादपूर तालुक्यातील एकूण 96 गटांचा ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रिया दि. 28 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीसाठी राबविण्यांत आली आहे. तथापि दि.08 मार्च 2023 पर्यंत सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत ई निविदा ऑनलाईन पध्दतीने स्विकारणे बंद झालेले आहे. या प्रकरणी दि.08 मार्च 2023 पर्यंत एकही निविदाधारकांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतलेला दिसून येत नाही. या निविदा प्रक्रियेस दि.09 मार्च  ते 15 मार्च 2023 या कालावधीसाठी प्रथम मुदतवाढ देण्यात येत आहे.                या लिलावाच्या प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती, गाळ गटांचा तपशिल, सोबतचे प्रपत्र- अ आणि गाळ उत्खननासंबंधी अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती  http://raigadco.abcprocure.com  तसेच  www.raigad.gov.in  या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी कळविले आहे. 00000000

राष्ट्रीय नमुना पाहणी 76 वी फेरी सर्वेक्षण पाहणी विषयावर आधारित विशेष सेमिनारचे आयोजन

अलिबाग,दि.8(जिमाका):- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (NSO) विविध सामाजिक व आर्थिक विषयांवर राष्ट्रव्यापी सर्वेक्षणे घेण्यात येतात. अर्थ व सांख्यिकी संचालनालय या पाहणीमध्ये अनुरूप नमुना तत्वावर सहभागी होते. या सर्वेक्षणाचा उद्देश सामाजिक व आर्थिक बाबींवर माहिती संकलित करुन धोरणे तयार करण्यासाठी होतो. या सर्वेक्षणामधील आकडेवारीवर आधारित निष्कर्ष/अहवाल संचालनालयामार्फत प्रसिध्द करण्यात येतात.        त्यानुषंगाने राष्ट्रीय नमुना पाहणी (रानपा) 76 व्या फेरीतील पिण्याचे पाणी, स्वछता, आरोग्य आणि घरांची स्थिती, दिव्यांग व्यक्तीची पाहणी या विषयांवर आधारित सेमिनार संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहे.     या सेमिनारमध्ये संचालनालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच सांख्यिकी/अर्थशास्त्र संबंधित शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी/अध्यापक यांच्याकडून शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शोधनिबंध सादर करणाऱ्या व्यक्‍तीस सादरीकरणासाठी बोलविण्यात येईल तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानुषंगाने राष्ट्रीय नमुना पाहणी (रानपा)  76 वी फेरीच्या वरील विषयांवर आधारित शोधनिबंध तयार करुन  dydimss.des@maharshtra.g

उरण तालुक्यातील पाणदिवे गावाचे सुपूत्र मनोज महादेव पाटील यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

    अलिबाग,दि.8(जिमाका):-  महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुत्र व सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापन करत असणारे श्री.मनोज महादेव पाटील यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार नुकताच मुंबई येथील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पर्यटन  व महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह व रोख एक लाख दहा हजार रूपये पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील,शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देवोल आदि मान्यवर उपस्थित होते. ०००००००