Posts

Showing posts from July 21, 2024

कुलगुरू प्राध्यापक डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांचा मानद कर्नल पदवी पदग्रहण सोहळ्याचे दि.29 जुलै रोजी आयोजन

    रायगड(जिमाका) दि.26 :-  डॉ. बासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी संरक्षण मंत्रालय भारत सरकार कडून   जाहीर झाली असून सदरचा (पीपिंग) पदग्रहण सोहळा, सोमवार दि.29 जुलै 2024 रोजी दुपारी 12.15  मि. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात आयोजित केला आहे.  ही पदवी  विशिष्ट सेवा पदक मिळवले (vsm) अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगिंदर सिंग यांच्या शुभहस्ते  प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी कार्यकारी परिषदचे सदस्य,विद्या परिषदचे सदस्य  तसेच विद्यापीठातील  सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशातून 19 विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड करण्यात आली असून त्यातून महाराष्ट्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ कारभारी विश्वनाथ काळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या विद्यापीठास अभियांत्रिकी, फार्मसी ,वास्तुशास्त्र

जिल्ह्यातील इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी

रायगड(जिमाका) दि.26 :-  जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 चे ऑनलाईन अर्ज अपलोड करण्यासाठी पोर्टल दि. 16 जुलै 2024 पासून सुरु झाले आहे.    इयत्ता 6 वी साठी पात्रता -  विद्यार्थी  हा पाचवीत शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये शासकीय तसेच शासनमान्य प्राप्त शाळेत रायगड जिल्ह्यात  शिकत असणे आवश्यक आहे,  विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील रहिवासी असावा, तसेच आधार कार्डवर रायगड जिल्ह्याचा रहिवासी पत्ता असणे आवश्यक आहे,  जन्म तारीख 01 मे 2013 ते 31 जुलै 2015 (दोन्ही दिवस धरून) मधील असावी,  यावर्षी आधारकार्ड आवश्यक असून त्यासाठी लिंक असणाऱ्या मोबाईलवर ओटीपी येणार असून पुढील अर्ज अपलोड करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, (यासाठी आधारकार्ड अपडेट करावे. आधारकार्ड नसल्यास शासकीय नियमानुसार पालकाचे याच जिल्ह्यातील पुरावा म्हणून  रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करावे,  अर्ज अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा फोटो, विहित नमुन्यातील मुख्याध्यापकाचे साक्षांकित प्रमाणपत्र, स्कॅन केलेली विद्यार्थी व पालकाची सही इत्यादी बाबी तयार ठेवाव्या . अंतिम सबमिशन पूर्वी अर्जातील तपशील परत तपासून घ्यावा. यात विशेष जातीची वर्गवार

जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा --उपसभापती आ.डॉ.नीलमताई गोऱ्हे

    रायगड(जिमाका) दि.25:-  महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून अनेक नाविन्य पूर्ण योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य आ.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज येथे केले.  अलिबाग येथील होरीझोन हॉल येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा, पुष्प दुसरे कार्यक्रम सोहळा  कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार भावनाताई गवळी, श्रीमती मीनाताई कांबळी, श्रीमती शीतलताई म्हात्रे, श्रीमती ज्योती ताई वाघमारे, श्रीमती कलाताई शिंदे, श्रीमती शिल्पाताई देशमुख, श्रीमती मानसी दळवी, श्रीमती संजीवनी नाईक, श्रीमती तृप्ती पाटील उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी सुरु जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी न झालेल्या पुरुष उमेदवारांनी मैदानी चाचणीकरीता उपस्थित राहावे

    रायगड(जिमाका) दि.25:-  रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 391 (09 बॅन्डस्मन पदे समाविष्ट) व पोलीस शिपाई चालक संवर्गातील 31 रिक्त पदे भरण्याकरीता सन 2022-2023 ची भरती प्रकीया    दि. 21 जून 2024 रोजीपासून सुरु आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी न झालेल्या पुरुष उमेदवारांनी सोमवार, दि.29 जुलै 2024 रोजी सकाळी 06.00 वा.मैदानी चाचणीकरीता जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता. अलिबाग, जि.रायगड येथे उपस्थित राहावे  असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दि.21 जून 2024 ते दि.23 जुलै 2024 या कालावधीत पुरुष उमेदवार यांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. या कालावधीत पावसामुळे, एकाच दिवशी व लागोपाठचे दिवशी दोन पदांकरीता मैदानी चाचणीसाठी किंवा लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणांमुळे ज्या पुरुष उमेदवारांनी अद्यापपर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकाची मैदानी चाचणी दिली नाही, अशा पुरुष उमेदवारांना संधी/मुभा देण्यात येत आहे. पुरुष उमेदवार यांना ही शेवटची संधी देण्यात येत असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर

रायगड (जिमाका) दि.25:-  महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने 01 जुलै 2024 रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली. 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि.20 जून 2024 रोजीचे पत्रान्वये दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा  “ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) ”  बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते. मात्र भारत निवडणूक आयोगाने  दि.24 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला अ

27 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

    रायगड(जिमाका)दि.25:-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 27 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातीत तडजोडीस पात्र प्रकरणे, प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी  दिली. सुमारे 50 हजार प्रकरणे या लोकअदालतीसमोर ठेवली जाणार आहेत. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातीत प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, बरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधित वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. सुमारे 50 हजार प्रकरणे या लोकअदालतीसमोर ठेवली जाण्याची शक्

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना

Image
  रायगड जिमाका दि. 25-  जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना केल्या.तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले. याबरोबरच नागरिकांनो आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी जावळे यांनी अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यात भेट दिली. त्यांनी यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टी सुरु आहे.  जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण होवून वाहतूकीचे अनेक मार्ग काही काळ बंद झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील मुरूम व गिट्टी वाहून गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घेवून आज पाउस सुरू असतांनाच या भागांना भेट देवून पाहणी केली. नागरिकांनी काळजी घ्यावी, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये.  मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व

काजू बी साठी शासन अनुदान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत

    रायगड,(जिमाका)दि.24:-  सन 2024 च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली असून या योजनेच्या लाभासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी विक्री पावती, 7/12 उतारा, आधार संलग्नित बचत बँक खात्याचा क्रमांकासह तपशील, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इ.तपशीलासह कोकणातील व कोल्हापूर जिल्ह्यामधील संबंधित काजू उत्त्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य/विभागीय कार्यालयांकडे व अन्य भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाकडे दि. 31 ऑगस्ट 2024 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ  संजय कदम यांनी केले आहे. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन 2024 च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावेत

  रायगड,(जिमाका)दि.24:-  सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या 100 विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.26 ऑगस्ट 2024 पूर्वी आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3 चर्च पथ, पुणे 411001 यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुनील जाधव यांनी केले आहे. या योजनेचे अटी व शती :-  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा (नवबौध्दासहित) व महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा, विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा, पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 25 वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी राहील, उत्पन्न मर्यादा रु.6 लक्ष राहील (फॉर्म नं. 16 व तहसिलदार/नायब तहसिलदार सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्नप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. शैक्षण

वसतिगृहाकरिता इमारत भाडेतत्वावर द्यावयाची असल्यास इच्छुकांनी संपर्क साधावा

    रायगड,(जिमाका)दि.24:-  मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग या वसतिगृहाचा इमारतीचा करारनामा 31 जुलै 2024 रोजी संपत असल्याने वसतिगृहाकरीता भाडेतत्वावर 4 हजार ते 5 हजार चौ. फूट जागेच्या इमारतीची आवश्यकता आहे. या वसतिगृहाची विद्यार्थींनी मान्य क्षमता 80 असून या वसतिगृहात गरजू, होतकरू हुशार विद्यार्थींनी शिक्षणाकरीता रहिवास,अभ्यास करतात. त्यांना योग्य सोई सुविधायुक्त इमारत होण्याकरीता इच्छुकांनी वसतिगृहाकरिता इमारत भाडेतत्वावर द्यावयाची असल्यास गृहपाल, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग, दिव्याअपार्टमेंट, आर.सी.एफ.गेटसमोर वेश्वी, अलिबाग येथे संपर्क साधावा. ००००००

जिल्ह्यातील प्रमुख उद्योगसमूहाच्या विविध कंपन्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा--जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
रायगड (जिमाका) दि.22:-  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही बेरोजगार युवकांसाठी एक चांगली योजना आहे.  या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जिल्ह्यातील प्रमुख उद्योगसमूहाच्या विविध कंपन्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि युवकांना प्रशिक्षण देण्याच्या राज्यशासनाच्या या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.  मुख्यमंत्री युवा व प्रशिक्षण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील प्रमुख कंपन्याशी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके, जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळया आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी कशी करावी, योजनेचा उद्देश, योजनेच स्वरूप, योजनेचे लाभार्थी याबाबत मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, आयटीआय/पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8 हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 ह

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन

    रायगड जिमाका दि.22:-     महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली असून मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/ दुर्बलतेनुसार चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरीता  तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना र.रु.3000/- त्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील.   या योजनेबाबत अधिक माहिती व योजनेचे अर्ज प्राप्त करण्यासाठी सहाय्यक आयुक

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन

रायगड जिमाका दि.22:-     महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्री मोफत यात्रा करण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्याचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषित केले होते. त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय आज रोजी सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. देशातील मोठ्या तीर्थ यात्रांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील व भारत देशातील प्र

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत यू.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल उरण ठरला जिल्हास्तर विजेता संघ

    रायगड जिमाका दि.22:-    क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांनी आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा पोलीस मुख्यालय मैदान अलिबाग येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे आयोजन 15 वर्षाखालील मुले 17 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुली या वयोगटात करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील (पनवेल मनपा वगळून) 32 संघांनी सहभाग घेतला साधारण 500 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे-15 वर्षाखालील मुले, प्रथम- हिरानंदानी ट्रस्ट स्कूल भोकरपाडा, द्वितीय- युएस चे इंग्लिश मीडियम स्कूल उरण, तृतीय- रेड क्लिप स्कूल उलवे 17 वर्षाखालील मुली- प्रथम- शिशु मंदिर खोपोली, द्वितीय- एम एन आर इंटरनॅशनल स्कूल पळस्पे, तृतीय- आर के एफ जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा 17 वर्षाखालील मुले-प्रथम-यू ई एस इंग्लिश मिडीयम स्कूल, उरण, द्वितीय-जनता विद्यालय खोपोली, तृतीय-सेंट वेल्फ्रेड हाईस्कूल शेडुंग  या स्पर्धेत जोसेफ नदार, अहमद दादरकर, युवराज वाळवी, नमन कोळी, पल्लवी पाटील, मानसी पाटील, श्रावणी देश