Posts

Showing posts from October 23, 2022

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

Image
अलिबाग, दि.29 (जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: सकाळी 8:10 वाजता  “ मुक्तागिरी ”  बंगला, मलबार हिल, मुंबई येथून मोटारीने गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. सकाळी 8:30 वाजता गेट वे ऑफ इंडिया (गेट नं. 4) येथून स्पीड बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 9 वाजता बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड येथे आगमन व मोटारीने आक्षी, ता.अलिबाग, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 9:30 वाजता मराठी भाषा आद्य शिलालेख परिसर सुशोभिकरण करणे या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: ग्रामपंचायत आक्षी, ता.अलिबाग). सकाळी 9:50 वाजता आक्षी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता अलिबाग तालुक्यातील साबरकुंड धरण प्रकल्प भूसंपादन संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 10:30 वाजता आंबेत पूल संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 11 वाजता राष्ट्रीय एकता दिवस मानवंदना स

मत्स्यव्यवसायाशी निगडित समस्यांवर उपाययोजना सुचविण्याकरिता सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरावर समिती गठित करण्याबाबत शासन निर्णय जारी

Image
  अलिबाग, दि.28 (जिमाका):-  राज्यामध्ये भूजलाशयीन मत्स्यव्यवसायासाठी फार मोठा वाव असून या क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होण्याची क्षमता आहे. राज्यात प्रथिने उपलब्धता व्हावी, मत्स्य दरडोई उत्पन्न वाढविणे यासाठी मत्स्योत्पादन वाढविण्यास राज्य शासन सतत प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर भूजल / निमखारे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात येणारी नवीन आव्हाने, निर्माण होणाऱ्या अडीअडचणी/समस्या, मत्स्यउपादन वाढविणे, मच्छिमारांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होणे, मत्स्यव्यवसायाशी संबंधित धोरणात्मक बाबी / विविध मुद्दे इत्यादी बाबींवर उपाययोजना करून समस्यांचे निवारण करण्याकरिता शासनाने सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्याबाबत मान्यता दिली आहे. मत्स्यव्यवसाय हे अनेक मच्छिमारांसाठी उत्पन्नाचे आणि रोजगाराचे साधन म्हणून काम करते. राज्य शासनामार्फत मत्स्यव्यवसाय क्षेत्राला विकसित करण्याच्या दृष्टीने नविन निर्माण झालेल्या तलावामध्ये मत्स्यबीज संचयन करणे, पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन करणे, मत्स्यखाद्य निर्मिती कारखाना, मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यबोटुकली संवर

जिल्ह्यात 31 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार “जनता दरबार”

  अलिबाग, दि.27 (जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या सूचनेनुसार सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. या जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणाप्रमुख उपस्थित राहणार असून जनता दरबाराकरिता उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना आधी टोकन क्रमांक दिले जाणार आहेत. जनता दरबारमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची नोंद घेवून त्यावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे या  “ जनता दरबार ” चे आयोजन नियमितपणे केले जाणार आहे. तरी नागरिकांनी सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे होणाऱ्या जनता दरबाराकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी केले आहे. 00000