Posts

Showing posts from November 3, 2019

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे - प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे

Image
अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका) अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावीत अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी महा चक्रीवादळ पूर्वतयारी व उपयोजना   प्रशासकीय यंत्रणेच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी सर्व विभाग प्रमुखांना पुढील प्रमाणे सूचना दिल्या. सर्व विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. दुरध्वनी क्रमांक सुरु आहेत याची खात्री करावी, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ प्रतिसाद द्यावा. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर तात्काळ परत बोलविण्यात यावे. पुढील सूचना मिळेपर्यंत मासेमारीसाठी परवाना देण्यात येवू नये. तसेच मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात यावी. मासेमारी जेट्टींवर सूचना फलक लावण्यात य

धार्मिक अल्पसंख्यायक शाळांनी अनुदानासाठी अर्ज करावेत

अलिबाग जि.रायगड (जिमाका) दि.04 :   रायगड जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक शाळांनी पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळण्याकरीता अर्ज करावेत. अल्पसंख्याक विकास विभागाकडून राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी शासनाकडून दि.30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे. तरी दि.30 नोव्हेंबर 2019 अखेरपर्यंत आपले प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकरी कार्यालय, रायगड-अलिबाग यांचेकडे सादर करावेत असे आवाहन श्री.सुनिल जाधव जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 00000

मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका) –   भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दि.6/11/2019 ते 8/11/2019 पर्यंत उत्तर कोकणासह, उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार असल्याने मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याचे देखील सूचनेत कळविण्यात आले आहे. त्याबाबत योग्य त्या उपाय योजनेसह तयारीत राहण्याबाबत सर्व जिल्हा यंत्रणेस सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा असे ड्युटी ऑफिसर मंत्रालय, नियंत्रण कक्ष मंत्रालय, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 000000

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका) उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात होत असणाऱ्या व्यापक गुंतवणूकीमुळे सू क्ष्म व लघु उद्योजकांसाठी पुरक उद्योग व्यवसायाच्या अनेकविध संधी विविध क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. यास अनुसरुन राज्यातील होतकरु युवक/युवतींसाठी राज्याची सर्वसमावेशक स्वंयरोजगारास प्रोत्साहन देणारी मुख्यमंत्री रोजगारनिर्मितीकार्यक्रम (Chief Minister Employment Generation Programme -CMEGP ) योजना   नविन उद्योग धोरणाच्या अंतर्गत जाहीर करण्यांत आली आहे. ठळक वैशिष्टये एकूण 10,000 स्वयंरोजगारीत घटक प्रथम वर्षी स्थापित होतील, एकूण सुमारे 1 लाख घटक योजना कालावधीत पुढील पाच वर्षात स्थापित होतील. सुमारे 8 ते 10 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार संधी राज्यात योजना कालावधीत निर्माण होतील. योजना पूर्णत: ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येईल तसेच विहित निर्धारीत कालावधीत प्रत्येक ट प्प्या वरील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. योजना उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली व विकास आयुक्त (उद्योग) यांच्या संनियंत्रणाखाली अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच