Posts

Showing posts from October 29, 2023

पुढील काळात महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सुविधा व कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारणार ---महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

Image
  रायगड, (जिमाका)दि. 3:--महीला स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांच्या  विक्रीसाठी पुढील काळात ऑनलाइन पद्धतीने वस्तूची विक्री करण्याची सुविधा  उपलब्ध होणार असून त्याच प्रमाणे कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्यात येतील  असे प्रतिपादन राज्याच्या महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माणगाव तालुक्यातील इंदापूर व गोरेगाव  प्रभागात  ऊर्जा महिला प्रभाग संघ तलाशेत -इंदापूर व स्वाभिमान महिला प्रभाग संघ -गोरेगाव मार्फत दिवाळी सणानिमित आयोजित  विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन  दि.२ नोव्हेंबर रोजी महीला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, महीला स्वयंसहाय्यता समुहाच्या केंद्र उभारणीसाठी प्रयत्न करणार असून  विक्रीसाठी दुकान-गाळे तसेच वरील  मजल्यावर प्रभाग संघाचे कार्यालय करण्यात येईल,असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन महिलांनी केल्याने महिलांचे कौतुक केले .  सदर कार्यक्रमासाठी  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उमेद जिल्हा व्यवस्थापक  सिद्

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या जिल्हयातील विदयार्थ्यांना टॅबलेटचे वितरण जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते कार्यक्रमात वाटप

Image
रायगड,  (जिमाका) दि. २:--जिल्हयातील जेईई, नीट, एमएचटी-सीईटी (JEE/NEET/MHT-CET) चे प्रशिक्षण घेणा-या  विदयार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हयातील जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ( महाज्योती) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी आज केले.    जिल्हाधिकारी कार्यालय रायगड - अलिबाग, राजस्व सभागृह येथे  आज कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. यावेळी विदयार्थी व पालकांशी संवाद साधला .महाज्योती नागपूर या संस्थेमार्फत JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणा-या रायगड जिल्हयातील १३ विदयार्थ्यांना  जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते टॅबलेट व डाटा सीम यांचे वाटप करण्यात आले.  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे मार्फत ( महाज्योती) JEE/NEET/MHT-CET च प्रशिक्षण घेणा-या विदयार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सीमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येतेे.  आजच्या कार्यक्रमात एकूण १३ विदयार्थ्यांना टॅबलेट व डाटा सीम वाटप करण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी महाज्योती संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन यानिमित

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागवले

  रायगड (जिमाका),दि.1:-  राज्यातील इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या अर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक  व स्वयंरोजगाराकरीता रु.1 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज नाही ) व 20 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 10  लक्ष रुपये पर्यंत, गट कर्ज व्याज परतावा योजना 10 लक्ष ते 50 लक्ष रुपये पर्यंत आहे. तसेच यात शैक्षणिक कर्ज व्याजपरतावा योजना या योजनांचा समावेश असून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्त्म कर्ज मर्यादा 10 लक्ष रुपये पर्यंत व परदेशी अभ्यासक्रमासाठी  जास्तीत जास्त कर्ज मर्यादा 20 रुपये लक्ष पर्यंत आहे. सन 2023 - 24 या वित्तीय वर्षाकरीता विविध कर्ज योजनांचे रायगड जिल्ह्यासाठी उद्दिष्ट् प्राप्त झाले आहे. या योजनांसाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्तींनुसार कर्ज प्रस्तावासोबत आवश्यक् कागदपत्रे, पुरावे हे सादर करणे आवश्यक

सार्वजनिक ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांतर्गत अर्थसहाय्यासाठीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

    रायगड (जिमाका),दि.1:-  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या सन २०२३-२४ साठीच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समान निधी योजनेनंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत. तसेच असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरिता अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहेत. इच्छुकांनी प्रतिष्ठानच्या  www.rrrlf.gov.in  या संकेतस्थळला भेट द्यावी. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इ

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना गावस्तरावरील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी

    रायगड, (जिमाका) दि.31:- केंद्र शासनाची पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना (पीव्हीकेएसयो) गावस्तरावरील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी आज संबंधित अधिकार्‍यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या योजनेची आढावा बैठक  त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे,  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अमिता पवार,  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया, बॅक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक तथा जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री.विजय कुलकर्णी, यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही अत्यंत उपयुक्त योजना असून पारंपरिक उद्योजकांचा विकास साधण्यासाठी ग्रामसेवक व सरपंचांनी ऑनलाईन पद्धतीने प्रथम ग्रामपंचायतांची नोंदणी करून घ्यावी. या योजनेबाबत गावपातळीवर जनजागृती करून ही योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश त्यांनी यावेळ

सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रायगड, दि.31 (जिमाका):-  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल  यांच्या जयंतीनिमित्त व  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार  यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.         सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या 'राष्ट्रीय एकता दिवस' निमित्त यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथही देण्यात आली.         याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार (महसूल) सचिन शेजाळ, तहसिलदार (सर्वसाधारण) उमाकांत कडनोर जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 000000

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  रायगड, (जिमाका) दि.31:- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास युवक, स्वयंसेवी संस्था, शासकीय व पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी यांसह बहुसंख्य नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  येथील वरसोली समुद्रकिनारा येथून सुरु होवून दौडचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग, तहसील कार्यालय अलिबाग, जिल्हा पोलीस दल, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्वयंसिद्ध संचलित स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या माध्यमातून वरसोली समुद्रकिनारा, अलिबाग येथे आज सकाळी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.   बहुसंख्य नागरिक दौड मध्ये सहभागी झाले.  यावेळी उपस्थितांना उमाकांत कडनोर- तहसीलदार, सर्वसाधारण यांनी प्रतिज्ञा दिली तसेच अलिबाग तहसीलदार  विक्रम पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली   आणि समारोप जिल्हाधिकार

निवृत्तीवेतनधारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

    रायगड (जिमाका), दि. 30:- शासनाच्या ज्या निवृत्तीवेतनधारकांना रायगड जिल्हा कोषागाराकडून निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी दि.1 नोव्हेंबर 2023 रोजी हयात असल्याबाबतचे  “ हयात प्रमाणपत्र ”  (Life Certificate) दि.1 ते दि.30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सादर करावेत. निवृत्तीवेतनधारकांचे  हयात प्रमाणपत्र विहीत मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तीवेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्व्त: हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. ही घोषणापत्रे संबंधित बँकांकडे पाठविण्यात आलेली आहेत. पुनर्नियुक्त/पुनर्विवाह केलेल्या कुटूंब निवृत्तीवेतन/निवृत्तीवेतन धारकांकरीता नियमित नमुना वापरावा. मनिऑर्डरद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांचे हयात दाखल्यांचे नमुने या कोषागार कार्यालयाकडून संबंधितांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहेत. त्यांनी स्वत:चे हयात दाखले स्वाक्षरीसह पूर्ण करुन कोषागार कार्यालयाकडे परस्पर

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार 6 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजन

                 रायगड (जिमाका), दि.30:-  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. माहे नोव्हेंबर 2023 रोजी मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केला आहे असे विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 000000

दक्षता जनजागृती सप्ताहाचे 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजन

रायगड (जिमाका),दि.30:-  जिल्ह्यात 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भ्रष्टाचाराचे विरोधात जनजागृती कार्यक्रमांचे विविध पातळीवर आयोजन करुन भ्रष्टाचार विरोधात नागरिकांनी  जास्तीत जास्त तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दक्षता जनजागृती अभियानमध्ये यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अनुषंगाने अधिक माहिती संपर्कासाठी पत्ता, तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.  टोल फ्रि क्रमांक-1064, व्हॉटस्अप: 9930997700, संकेतस्थळ:  acbmaharashtra.gov.in , मोबाईल ॲप: www.  acbmaharashtra.net , ई-मेल: acbwebmail@mahapolice. gov.in , ट्विटर:@ACB_maharashtra, फेसबुक : www.facebook.com  /maharashtra ACB संपर्कासाठी पत्ता- पोलीस अधिक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पिंपळभाट बस स्टॉपजवळ, अलिबाग जि. रायगड 402209. दुरध्वनी क्रमांक-9870332291/ 9821233160/ 9730271560 येथे संपर्क साधावा,असे आवाहन शशिकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड अलिबाग यांनी केले आहे. 000000