Posts

Showing posts from February 19, 2023

एड्सबाबत जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आरोग्य प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग,दि.22(जिमाका):-  एच.आय.व्ही एड्स, गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष रायगड-अलिबाग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने व डापकूचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 फेब्रुवारी व दि.23 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे.      दि.22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अलिबाग, सकाळी 11 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग व सायंकाळी 4.00 वाजता मुरुड तालुक्यातील रिक्षा स्टॅन्ड बोर्ली मांडला येथे कलापथकाच्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न झाले.                 दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जे.एस.डब्ल्यू कॉलनी पेण व सायंकाळी 4 वाजता मांडवा जेट्टी येथे कलापथकातून जनजागृती करण्यात येणार आहे.              यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग, सरकारी रुग्णालयातील आयसीटीसी एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र येथील सहकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात नागरिकांनी सह

कलापथकाच्या माध्यमातून एड्सबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

  अलिबाग,दि.22(जिमाका):-  एच.आय.व्ही एड्स आणि गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष रायगड- अलिबाग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था,रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 व दि.24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत एड्स बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.   दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता रोहा बस स्थानक, सकाळ 11 वाजता एल.अँड.टी कॉलनी, नागोठणे व सायंकाळी 4 वाजता सुधागड पाली आणि दि. 24 फेब्रुवारी रोजी ठीक सकाळी 10 वाजता एस.टी स्टँड, माणगाव  व सायंकाळी 4.00 वाजता लोणेरे फाटा येथे कलापथकाच्या सादरीकरणाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग, शासकीय रुग्णालयातील आयसीटीसी एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र येथील सहकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने व स्वयंसिद्धा सामाजिक विकास  संस्थेच्या वतीने सुचिता साळवी यांच्याकडून करण्यात आल

कारागृह विभागातील अडीअडचणी दूर होण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपायोजनांबाबतची आढावा बैठक संपन्न

  अलिबाग,दि.22 (जिमाका):-  अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व अधीक्षक यांच्या कारागृह विभागातील अडीअडचणी जाणून  घेवून त्या दूर होण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपायोजनांबाबतची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली.        या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या--- महाराष्ट्र राज्यातील कारागृहामध्ये  वय वर्षे 50 व त्यापेक्षा जास्त वय असलेले बंदी बंदीस्त असतात. त्यामध्ये काही वयोवृध्द बंदी आजारी असतात, या बाबींचा सारासार विचार करुन वय 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणत: जाड बेडींग (अंथरुण) तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्याबाबत उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना प्रारुपास मान्यता दिली आहे.      त्यानुसार कारागृहातील दाखल वय  वर्षे 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणत: जाड बेडींग (अंथरुण) तसेच उशी स्वखर्चाने आणणे, यासाठी परवानगीच्या अधिकाराबाबत सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख व कारागृह अधीक्षक यांना परिपत्रकाद्वार

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमेंतर्गत जिह्यातील 2 हजार 12 शाळा झाल्या डिजिटल

    अलिबाग,दि.21(जिमाका):- प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात तसेच विविध प्रयोगातून शिक्षण घेता यावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शाळा डिजिटल मोबाईल करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 2 हजार 603 शाळांपैकी 2 हजार 12 शाळा डिजिटल झाल्या असून, उर्वरित 591 शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. या शाळाही टप्प्याटप्प्याने पूर्ण डिजिटल करण्याचा मानस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी व्यक्त केला आहे.       प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भावी आयुष्याचा पाया असल्याने येथे मिळणारे शिक्षणही आधुनिकतेला धरून असणे अत्यावश्यक आहे. त्यातच खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्यामुळे डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थही प्रयत्न करत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील तं

जागतिक सामाजिक न्याय दिवस 2023 उत्साहात साजरा

अलिबाग,दि.21(जिमाका):-  पनवेल तालुका विधी सेवा, समिती व तहसील कार्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, पनवेल येथे जागतिक सामाजिक न्याय दिवस न्यायाधीश श्री.जयराज वडणे, (अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश,पनवेल) यांच्या विशेष उपस्थितीत (दि.20 फेब्रुवारी 2023) रोजी संपन्न झाला.        याप्रसंगी पनवेल नायब तहसिलदार श्री.विनोद लचके, , लोकपरिषद सामाजिक संस्था व आश्रय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अशोक गायकवाड, उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस श्री.संतोष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.       याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना न्यायाधीश श्री.जयराज वडणे  म्हणाले की, भेदभाव विरहीत जगामध्ये जगणे आपल्या सगळ्यांचं ध्येय आहे. लिंगभेद, वर्णभेद इत्यादी पलीकडे जाऊन मानवी मूल्यांची जोपासना होणे खूप महत्वाचे आहे.         सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शेवटच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आ