Posts

Showing posts from August 14, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थळ सागरी किनारा स्वच्छता अभियान संपन्न

Image
अलिबाग, दि.20 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांताधिकारी प्रशांत ढगे व तहसिलदार मीनल दळवी यांच्या पुढाकारातून अलिबाग तहसील कार्यालय, माणुसकी प्रतिष्ठान, लाईफ फाउंडेशन, वा.ग. रानडे हायस्कूल, थळ ग्रामपंचायत व थळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने थळ-चालमळा समुद्रकिनारा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार अजित टोळकर यांनी स्वच्छतेबद्दल जागृत झाले पाहिजे व आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, असे सांगितले.     माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान यांनी आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व सर्व शालेय विद्यार्थ्यांना सांगत आपला परिसर, आपली शाळा, आपले घर स्वच्छ ठेवून आपण स्वतः निरोगी कसे राहावे, याबद्दल मार्गदर्शन केले. या स्वच्छता अभियानात अंदाजे 85 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. उपस्थित स्वयंसेवकांना प्लॅस्टिक मुक्तीची व वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली. 00000

कातकरी उत्थान अभियानांतर्गत “सप्तसूत्री” च्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना SKOCH अवॉर्ड जाहीर

Image
रायगड जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीत मानाचा तुरा..! अलिबाग,दि.18 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील आदिवासी कातकरी बांधवांच्या प्रगतीसाठी मागील वर्षभरात कातकरी उत्थान अभियानांतर्गत “ सप्तसूत्री ” च्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी राबविलेल्या उपक्रमाची SKOCH अवॉर्ड्स या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर या पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे. SKOCH समूह हा 1997 पासून सर्वसमावेशक वाढीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक-आर्थिक समस्या हाताळणारा भारतातील अग्रगण्य थिंक टँक आहे. SKOCH समूह धोरणात्मक निर्णयांमध्ये भारतीय समाज व्यवस्थेची गरज व त्यातील संदर्भ आणण्यासाठी सहकार्याची भूमिका बजावतो. त्यासोबतच फॉर्च्यून-500 कंपन्या, सरकारी मालकीचे उद्योग, शासनाशी विविध प्रकारे संलग्न आहे. यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये क्षेत्रीय हस्तक्षेप, सल्लागार, संशोधन अहवाल, प्रभाव मूल्यांकन, धोरण संक्षिप्त, पुस्तके, जर्नल्स, कार्यशाळा आणि परिषदांचा समावेश आहे. SKOCH समूहाकडून शासन, वित्त, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि सामाजिक

पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उपहारगृह चालविण्यासाठी इच्छुक महिला बचतगटांनी अर्ज करावेत

अलिबाग,दि.18 (जिमाका):- पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या आवारात शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून महिला बचतगटाकडून उपहारगृह चालविण्यात यावेत, असे शासन निर्देश आहेत. यानुषंगाने नोंदणीकृत असलेल्या महिला आर्थिक विकास मंडळ व महिला बचतगटाच्या नोंदणीकृत असलेल्या संस्थांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथून बातमी प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवसाच्या आत निविदा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य व्ही.डी.टिकोले यांनी केले आहे. 00000

स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
अलिबाग,दि.18 (जिमाका):- स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे   यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिनानिमित्त दिली सद्भावना प्रतिज्ञा

Image
अलिबाग,दि.18 (जिमाका): - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात सद्भावना दिवस संपन्न झाला. या निमित्ताने उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी उपस्थितांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, तहसिलदार विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000

जिल्हयातील शेतकऱ्यांनी भात पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दि.31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करावेत

  अलिबाग , दि.18 (जिमाका): राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते , अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास , त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल , हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. सध्याच्या पीकस्पर्धेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत:- पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल , खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात , ज्वारी , बाजरी , मका , नाचणी (रागी) तूर , मूग , उडीद , सोयाबीन , भुईमूग , सूर्यफूल अशी एकूण 11 पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 , पीकस्पर्धा मध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्यापिकाखाली

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 20 मि.मी. पावसाची झाली नोंद

  अलिबाग , दि.18 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 20.02 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.01 जून 2022 पासून आज अखेर एकूण सरासरी 2 हजार 504.81 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-               अलिबाग-9.00 मि.मी. , पेण-12.00 मि.मी. , मुरुड-14.00 मि.मी. , पनवेल-12.00 मि.मी. , उरण- 20.00 मि.मी. , कर्जत- 20.50 मि.मी. , खालापूर-15.00 मि.मी. , माणगाव-14.00 मि.मी. , रोहा-18.00 मि.मी. , सुधागड-14.00 मि.मी. , तळा-34.00 मि.मी. , महाड-20.00 मि.मी. , पोलादपूर-27.00 मि.मी , म्हसळा-26.00 मि.मी. , श्रीवर्धन-18.00 मि.मी. , माथेरान-46.80 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 320.30 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 20.02 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 80.76 टक्के इतकी आहे.             रायगड जिल्ह्यात मागील वर्षी दि.18 ऑगस्ट 2021 रोजी सरासरी 12.19 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच दि.01 जून पासून दि. 18 ऑगस्ट 2021 अखेर पर्यंत एकूण सरासरी 2 हजार 778.86 मि.मी. पर्जन्य

डाक विभागाच्या निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी रायगड, नवीमुंबई विभागासाठी दि.16 सप्टेंबर रोजी डाक अदालतचे आयोजन डाक अदालतीचा लाभ घेण्याचे जिल्हा डाक अधीक्षक डॉ.संजय लिये यांचे आवाहन

  अलिबाग,दि.16(जिमाका):- डाक विभागाच्या कुटुंब निवृतीवेतनधारक व निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी पोस्टमास्टर जनरल , नवी मुंबई रिजन यांच्यामार्फत पेन्शन अदालत   शुक्रवार दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12.00 वा.पोस्ट मास्टर जनरल , नवी मुंबई रिजन कार्यालय , दुसरा मजला , पनवेल मुख्य पोस्ट ऑफीस इमारत पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये निवृत्तीधारकांच्या वेतन व इतर लाभाशी संबधित तक्रारी तसेच जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत , ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे , ज्यांना तीन महिन्याच्या आत निवृतीवेतनाची पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणाचा या डाक आदालतीमध्ये निपटारा करण्यात येणार आहे.   तसेच न्यायालयात असणारी , कायदेशीर प्रलंबित असणारी प्रकरणे या अदालती मध्ये समाविष्ट करता येऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे पेन्शनर असोसिएशन कडून आलेल्या प्रकरणावर ही या अदालती मध्ये निर्णय घेता येत नाही. तक्रारदाराने अर्ज करताना निवृत्तीधारकांचे नाव , हुद्दा , जिथे निवृत्त झाले त्या कार्यालयाचे नाव , निवृतीची तारीख , पीपीओ क्रमांक , पोस्टऑफिसचे नाव जिथून पेन्शन घेतली जात आहे , पोस्टाचा पत

नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

Image
अलिबाग, दि.15 (जिमाका):-   समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येतील ,  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर   यांनी आज येथे केले. अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील,  उपजिल्हाधिकारी (निवडणूक)   श्रीमती स्नेहा उबाळे,  अलिबाग उपविभागीय अधिकारी  प्रशांत ढगे , जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जयसिंग मेहत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक