Posts

Showing posts from March 12, 2023

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने “महापशुधन एक्स्पो-2023” चे आयोजन जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा

  अलिबाग,दि.17(जिमाका):- शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि.24 ते 26 मार्च 2023 दरम्यान शिर्डी ता. राहता, जि.अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो- 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पो मध्ये देशातील विविध प्रकार व जातीची तसेच अतिशय दुर्मिळ प्रकारची जनावरे पाहण्याची संधी पशुप्रेमींना व पशुपालकांना उपलब्ध होणार आहे. याबरोबरच आधुनिक दुग्ध तंत्रज्ञान, चारा पिके व पद्धती फायदेशीर शेळीपालन, कुक्कुट पालन (मांसल/परसातील/अंडी घालणारी) व पशुसंवर्धनाशी निगडीत व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य व रोजगार निर्मितीच्या संधी आणि लिंग विनिश्चित रेतमात्रा (ET/IVF), भविष्यातील आव्हाने, अशा विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या महापशुधन एक्स्पो- 2023 ला भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.रत्नाकर काळे यांनी केले आहे. ००००००

जिल्हा क्रीडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरभी स्वयंसेवी संस्था, माणुसकी प्रतिष्ठान व रायगड प्रिमियर लिग आयोजित अलिबाग तालुका शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी “कला व क्रीडा महोत्सव 2023” जाहीर

  अलिबाग,दि.17(जिमाका):- स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने अलिबाग तालुक्यातील विविध शाळेमधील व वैयक्तिक विद्यार्थीसाठी क्रीडा व कला महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. क्रीडा व   पारंपारिक सांस्कृतिक कलांचे   जतन करून, विविध क्रीडा प्रकारातील क्रीडांसाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुढे वाव मिळण्यासाठी 19 वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अलिबाग तालुका कला आणि क्रीडा महोत्सवाचे दि.18 मार्च ते दि.20 मार्च 2023 रोजी या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रायगड प्रिमियर लिग आणि माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र यांच्या तर्फे सुरभी स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यासाठी आयोजित केला जाणार आहे.   या महोत्सवासाठी आ.सी.एफ थळ यांचे प्रायोजकत्व तसेच विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या कार्यक्रमात अलिबाग तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यासाठी विशेष करून मैदानी खेळांचे 200 मीटर 800 मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, कबड्डी, कुस्ती, पासिंग व्हॉलीबॉल, सायकलिंग, खो खो, फूटबॉल, लाठीकाठी आ

चवदार तळे, महाड येथील क्रांतीदिनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी घेतला आढावा

    अलिबाग,दि.17(जिमाका):- महाड हे ऐतिहासिक शहर असून सोमवार, दि.20 मार्च 2023 या ऐतिहासिक दिवशी आंबेडकर अनुयायी सामान्य जनता व लोकप्रतिनिधी मोठया प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी महाड येथे येत असतात. महाड येथे येणाऱ्या अनुयायांना रेल्वे बस सेवा, पिण्याचे पाणी, सुलभ सुविधा, आरोग्य तपासणी, तात्पुरता निवारा, बस थांबा, वाहन पार्किंग व्यवस्था इ.सुविधा पुरविणे व त्यात समन्वय असणे आवश्यक आहे. याकरिता सामाजिक संघटना व संबंधित शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय राहण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना यांची एकत्रित बैठक काल दि.16 मार्च 2023 रोजी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, सुनिल जाधव, महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, सहाय्यक संचालक आरोग्य डॉ.प्रताप शिंदे, गट विकास अधिकारी वाय.एस.प्रमे, तहसिलदार सुरेश काशिद, महाड पोलीस निरीक्षक एम.पी. खोक, पोलीस निरीक्षक (वाहतूक) रायगड अ

“युवा संवाद-भारत @ 2047” कार्यक्रमातील सहभागासाठी इच्छुक समुदाय आधारित संस्थानी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.17(जिमाका):- पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव-स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करीत आहोत. पंतप्रधान श्री.मोदी यांनीही त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात “ पंच-प्राण-मंत्र ” ची घोषणा केली होती.    “ अमृत कालच्या काळातील भारत @ 2047 ची झलक ” या संदर्भात युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि त्यांची स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) दि.1 एप्रिल 2023 ते दि.31 मे 2023 या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये समुदाय आधारित संस्था (CBO) “ युवा संवाद-भारत @ 2047 ” या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.   जिल्ह्याच्या विविध CBOs (समुदाय आधारित संस्था) च्या मदतीने आणि साहाय्याने जिल्हा स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. जे “ पंच-प्राण-मंत्र ” अनुरूप देशाचे भविष्य आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी, जिल्हा नेहरु युवा केंद्रासोबत काम करतील, अशी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती. हा कार्यक्

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कर्ज मंजूरीसाठी बँकांनी सहकार्य करण्याचे तर नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन -- महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या

    अलिबाग,दि.17(जिमाका):- राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-2019 अंतर्गत शासनाने अनेक नाविन्यपूर्ण योजना व कार्यक्रम हाती घेतले आहेत. सूक्ष्म, लघु उपक्रमांना चालना देणे आणि तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना कर्ज मंजूरीसाठी बँकानी सहकार्य करावे तर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ या दोन्ही अंमलबजावणीने यंत्रणेमार्फत ही योजना राबविण्यात येते. सन 2022-23 वर्षात रायगड जिल्ह्यासाठी दोन्ही यंत्रणा मिळून 800 कर्ज प्रस्तावाचे उद्दिष्ट प्राप्त आहे. त्यानुषंगाने एकूण 1 हजार 495 प्रकरणे बँकेला सादर करण्यात आली आहेत. त्यापैकी रु.1 497.43 इतक्या प्रकल्प किंमतीची 239 प्रकरणे मंजूर असून त्यात रु.449.22 लाख इतकी अनुदान रक्कम समाविष्ट आहे. योजनेंतर्गत बँकेकडे 344 कर्ज प्

प्रशासनाच्या संवेदनशीलतेमुळे आदिवासी कुटूंबाला मिळाला न्याय…! तहसिलदार विजय तळेकर यांची कौतुकास्पद कामगिरी

Image
    अलिबाग,दि.15 (जिमाका):-  पनवेल तालुक्यातील मौजे हेदूटने सर्व्हे नंबर 123/1/ब ही 32 गुंठे जमीन मिळकत अनंता बाळ्या पोकळा या कुटुंबाच्या नावे आहे. अनंता बाळ्या पोकळा यांचे आई-वडील अशिक्षित असल्याचा फायदा घेवून त्यांच्या सोबत सुरेंद्र सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांनी फसवणूक करून त्या जमीन मिळकतीचे सन 2011 मध्ये अनधिकृतपणे 99 वर्षाचा भाडे करार केला आणि त्या जागेवर अवैधरित्या कब्जा केला.       आदिवासी जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे होणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यासाठी काम करणारी एक आदिवासी व्यक्ती हिरामण बुधाजी उघडा यांच्या नावे सन 2016 मध्ये अवैधरित्या खरेदी-विक्रीचा साठे करार करून फसवणूक करण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. त्या जागेवर सिंग कुटुंबियांनी त्यांच्या कॉरीवर काम करणाऱ्या लोकांसाठी घरे, गाड्या दुरुस्तीसाठी गॅरेज, गाई, म्हशीचा गोठा देखील बांधला आहे, असा अहवाल स्वतः स्थळ पाहणी आणि सखोल चौकशी करून मंडळ अधिकारी श्री.कचरे यांनी सुनावणी दरम्यान सादर केला.       तसेच पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.तुकाराम कोरडे यांनी देखील नि:पक्षपातीपणे

कर्मचारी संघटनांनी जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहावे --जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

  अलिबाग,दि.14 (जिमाका):- शासन आणि शासकीय कर्मचारी जनतेच्या हितासाठीच आहे. सर्व कर्मचारी संघटनांनी जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आज येथे केले.               जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.                 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेच्या रायगड जिल्हा समन्वय समितीच्या अध्यक्ष डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा माहिती अधिकारी तथा रायगड जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघाच्या समन्वय समितीचे सचिव मनोज शिवाजी सानप, तहसिलदार सचिन शेजाळ तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.                जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले की,त्यांच्या मागण्या शासनाकडे सकारात्मकतेने निश्चित कळविल्या जातील. मात्र शासकीय कर्मचारी म्हणून आपली जबाबदारी ओळखून आपण जनतेच्या हितासाठी,जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. चर्चेतून मार्ग न

डाक अदालतीचे 29 मार्च रोजी आयोजन

  अलिबाग,दि.14(जिमाका):-  अधीक्षक डाकघर रायगड विभाग,अलिबाग कार्यालयाद्वारे दि.29 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.                 या डाक अदालतीमध्ये रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित तक्रार/समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.  तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक,ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ.असणे आवश्यक आहे.                 इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग येथे दि.28 मार्च 2023 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे अधीक्षक डाकघर रायगड विभाग श्री.डॉ.संजय लिये यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय नमुना पाहणी 76 वी फेरी सर्वेक्षण पाहणी विषयावरील विशेष सेमिनारचे आयोजन

  अलिबाग,दि.13(जिमाका):-  अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणी (रानपा) 76 व्या फेरीच्या पाहणीवर आधारित सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये संचालनालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच सांख्यिकी, अर्थशास्त्र संबंधित शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी, अध्यापक यांच्याकडून शोधनिबंधांचे सादर करण्यात येईल. शोधनिबंध सादर करणाऱ्या व्यक्तीस सादरीकरणासाठी बोलाविण्यात येईल व प्रमाणपत्र देण्यात येईल.         त्यानुषंगाने राष्ट्रीय नमुना पाहणी (रानपा) 76 व्या फेरीतील पिण्याचे पाणी, स्वछता, आरोग्य आणि घरांची स्थिती, दिव्यांग व्यक्तीची पाहणी हे शोधनिबंधाचे विषय असून  या विषयांवर आधारित शोधनिबंध तयार करुन  dydirnss.des@maharshtra.gov.in  या ई-मेलवर दि.15 मार्च 2023 पर्यंत पाठविण्यात यावेत. तसेच सेमिनार करिताचा दिनांक/स्थळ/वेळ आपणास यथावकाश कळविण्यात येईल, असे उपसंचालक, अर्थ व सांख्यिकी कार्यालय, रायगड-अलिबाग श्रीमती वृषाली माकर यांनी कळविले आहे. ०००००००

अल्पसंख्याक उमेदवारांकरिता मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण गरजू उमेदवारांनी प्रवेशासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्यांशी संपर्क साधावा

  अलिबाग,दि.13(जिमाका) :- शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत मुंबई विभागामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर 67 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. शासनातर्फे अल्पसंख्याक लोकसमूहातील युवक व महिला यांना अल्पमुदतीचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणास प्रवेश उपलब्ध आहेत.      या अंतर्गत मुंबई विभागातील एकूण 36 औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे, असे सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांनी कळविले आहे.        विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था :- मुंबई शहर जिल्हा-मांडवी, दादर (मुलींची) लोअर परेल, मुंबई-11, मुंबई उपनगर जिल्हा-कुर्ला, नेहरूनगर कुर्ला (चांदीवली), बोरीवली, मुलुंड,  ठाणे जिल्हा- शहापूर, ठाणे (मुलींची), अंबरनाथ, बेलापूर, भिवंडी, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड,  पालघर जिल्हा-जव्हार, वाणगाव, रायगड जिल्हा- महाड, माणगाव, पनवेल, पोलादपूर.  रत्नागिरी जिल्हा-चिपळूण, दापोली, गुहागर, लांजा, मंडणगड, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर,  सिंधूदुर्ग जिल्हा- देवगड दोडामार्ग, मालवण, फोंडाघाट, सावंतवाडी, वेंगुर्ला.       

रायगड पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

  अलिबाग,दि.13(जिमाका) :-  रायगड जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करण्याकरिता पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या मान्यतेने दि. 15 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस मुख्यालय, अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर  “ सागर तरंग ”  या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.       पोलीस कल्याण निधीमध्ये जो निधी स्विकारला जातो, ज्यामध्ये काही दानशूर व्यक्ती आपल्या परीने सहभाग नोंदवितात. या प्राप्त रकमेचा वापर हा पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियांकरिता विविध योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता केला जातो. तब्बल 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रायगड पोलीस दलांतर्गत कल्याण निधीकरीता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.        हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश नागरिकांच्या मनोरंजनासोबतच पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करून त्यामधील प्राप्त रकमेच्या सहाय्याने पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियाकरिता विविध लाभदायक योजनांची अंमलबजावणी करणे हे आहे.       पोलीस पाल्यांकरिता योजना :- पुस्तक अनुदान- इ. 5 वी ते इ.10 वी महाविद्यालय तसेच उ

110 आंबा मातृवृक्षावरील आंबा फळांचा जाहीर लिलाव आंबा फळांच्या लिलावामध्ये इच्छूक संस्था/व्यक्तींना सहभागी होण्याचे आवाहन

          अलिबाग,दि.13(जिमाका) :- अलिबाग  तालुक्यातील तालुका फळरोपवाटीका आवास या शासकीय फळरोपवाटिकेतील 110 आंबा मातृवृक्षावरील आंबा फळांचा जाहीर लिलाव बोली पध्दतीने मंगळवार, दि.24 मार्च 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित  करण्यात  आला आहे.       फळबाग व लिलाव संबंधी अटी व शर्ती तालुका फळरोपवाटिका, आवास, ता. अलिबाग या शासकीय फळरोपवाटिकेच्या कार्यालयात शासकीय सुट्टीचा दिवस वगळून आजपासून पाहावयास मिळतील.        तरी इच्छूक संस्था/व्यक्तींनी लिलावाच्या दिवशी शासकीय फळरोपवाटिकेवर हजर राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग यांनी केले आहे.