राष्ट्रीय नमुना पाहणी 76 वी फेरी सर्वेक्षण पाहणी विषयावरील विशेष सेमिनारचे आयोजन

 

अलिबाग,दि.13(जिमाका):- अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणी (रानपा) 76 व्या फेरीच्या पाहणीवर आधारित सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये संचालनालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच सांख्यिकी, अर्थशास्त्र संबंधित शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी, अध्यापक यांच्याकडून शोधनिबंधांचे सादर करण्यात येईल. शोधनिबंध सादर करणाऱ्या व्यक्तीस सादरीकरणासाठी बोलाविण्यात येईल व प्रमाणपत्र देण्यात येईल.

        त्यानुषंगाने राष्ट्रीय नमुना पाहणी (रानपा) 76 व्या फेरीतील पिण्याचे पाणी, स्वछता, आरोग्य आणि घरांची स्थिती, दिव्यांग व्यक्तीची पाहणी हे शोधनिबंधाचे विषय असून  या विषयांवर आधारित शोधनिबंध तयार करुन dydirnss.des@maharshtra.gov.in या ई-मेलवर दि.15 मार्च 2023 पर्यंत पाठविण्यात यावेत. तसेच सेमिनार करिताचा दिनांक/स्थळ/वेळ आपणास यथावकाश कळविण्यात येईल, असे उपसंचालक, अर्थ व सांख्यिकी कार्यालय, रायगड-अलिबाग श्रीमती वृषाली माकर यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक