Posts

Showing posts from October 31, 2021

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

  अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :-   राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.एकनाथ शिंदे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- गुरुवार दि.4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8.45 वा. ठाणे निवासस्थान येथून मोटारीने रेमंड हेलिपॅड, ठाणेकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. रेमंड हेलिपॅड, ठाणे येथे आगमन व तेथून खाजगी हेलिकॉप्टरने रेवदंडा, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड, साळाव येथे आगमन व तेथून मोटारीने रेवदंड्याकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. रेवदंडा येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 12.30 वा. रेवदंडा येथून मोटारीने जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड, साळावकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. जेएसडब्ल्यू कंपनीचे हेलिपॅड, साळाव येथून खाजगी हेलिकॉप्टरने ठाणेकडे प्रयाण

अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि.05 नोव्हेंबर पर्यंत

    अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :-   राष्ट्रीय परीक्षा एजन्सीची स्थापना शिक्षण मंत्रालय, भारत सरकारद्वारे एक स्वायत आत्मनिर्भर प्रमुख परीक्षण संस्थेच्या स्वरुपात करण्यात आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) देशभरातील 33 सैनिक स्कूलमध्ये इयत्ता 6 वी व इयत्ता 9 वी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. सैनिक स्कूल सातारा येथे सन 2022-23   च्या सत्रामध्ये इयत्ता 6 वी व इयत्ता 9 वी च्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा रविवार, दि. 09 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) यांच्यामार्फत घेतली जाणार आहे. अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि.26 ऑक्टोबर 2021 होती. परंतु प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची मुदत दि.05 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थी केवळ ऑनलाईन पध्दतीने आपला अर्ज   https://aissee.nta.rnic.in   या वेबसाईटवर दि.05 नोव्हेंबर 2021   या कालावधीत भरु शकतील, असे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी कळव

“मिशन 100 टक्के लसीकरण” जिल्हा प्रशासनाने कसली कंबर

    अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :- जिल्ह्यात लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद मिळण्याची क्षमता असताना नागरिकांचे अजूनही 100% लसीकरण पूर्ण झालेले नाही, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या   प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आज संपन्न झाली. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, पेण प्रातांधिकारी विठ्ठल इनामदार, माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, अलिबाग तहसिलदार मिनल दळवी, पाली तहसिलदार दिलीप रायण्णावार, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी गोविंद वाकडे हे प्रत्यक्ष तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, इतर प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.    यावेळी मुख्य कार्यकारी डॉ.किरण पाटील यांनी सर्व शासकीय यंत्रणांना मार्गद

"भाऊबीजेला ओवाळणी द्या लसीकरणाची...!" जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे नागरिकांना भावनिक आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :- कोविड-19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक कुटुंबांनी दुर्देवाने आपल्या जीवाभावाची माणसे गमावली. या दरम्यान शासनाने नागरिकांसाठी आरोग्याच्या सोयी-सुविधा देण्यासाठी व या सोयी-सुविधांमध्ये अधिक वाढ करण्याचे सर्वप्रकारे प्रयत्न केले. नंतरच्या टप्प्यात अथक प्रयत्नांनी लसीकरण मोहीम जोरदार राबविली.               मात्र रायगड जिल्ह्यात लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद मिळण्याची क्षमता असताना नागरिकांचे अजूनही 100 टक्के लसीकरण पूर्ण झालेले नाही, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना भाऊबीजेला लसीकरणाची ओवाळणी द्या, असे भावनिक आवाहन केले आहे.    रायगड जिल्ह्यात 18 लाख 63 हजार 470 इतक्या नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून 7 लाख 81   हजार 648 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. अद्याप 10 लाख 81 हजार 822 इतके नागरिक दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत. तसेच पहिला डोस घेतल्यानंतर 28/84 दिवसांच्या विहित कालावधीनंतर (कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर 28 दिवस व कोविशिल्ड लस घेतल्यानंतर 84 दिवस ) दुसऱ्या डो

वय 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींना भारतीय डाक विभागात विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सूवर्णसंधी

  अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या ग्रामीण डाक जीवन व डाक जीवन विम्याच्या ग्रामीण व शहरी क्षेत्रांमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सूवर्णसंधी आता सुशिक्षित तरुण-तरुणींना त्यासोबतच वय 18 ते 50 वयोगटातील सर्वांनाच उपलब्ध झाली आहे. विमा प्रतिनिधींची नेमणूक अधीक्षक डाकघर, रायगड विभाग अलिबाग   यांच्यामार्फत   दि. 09 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रांच्या मूळ प्रती घेऊन मुलाखतीला हजर राहणे गरजेचे आहे. कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी/ माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्य-कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त   शिक्षक, बेरोजगार/ स्वयंरोजगार असणारे तरुण, तरुणी किंवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवाराना ही सूवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भाग

दीपावली सणाच्या काळात जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

               अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :- सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्नपदार्थ जसे खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादींची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील मिठाई, उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी :-   आस्थापनेचा परिसर हा पर्यावरण दृष्टीने व किटकापासून संरक्षित व स्वच्छ असावा,   कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक/ नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात यावेत, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार अन्नपदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नयेत, मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा वापर करावा (100 PPM पेक्षा कमी), मिठाई ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, बंगाली मिठाई ही 24 तासाच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ ॲप्रन वापरावे, मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदी

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दि.15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे

                 अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दि. 01 एप्रिल 2015 ते दि. 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीककर्जाची दि. 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली तसेच दि. 01 एप्रिल 2015 ते दि. 31 मार्च 2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीककर्जाचे पुनर्गठन / फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दि. 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासहीत थकीत असलेल्या व परतफेड न करता आलेल्या हप्त्याची रक्कम रक्कम रुपये 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे अल्प/अत्यल्प भूधारक या प्रकारच्या जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात रुपये 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडील दि. 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आला आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळण्याकरिता पात्र लाभार्थ्याने आपले आधार प्रमाणीकरण करणे गरज

वंचितांना अधिकार मिळवून देण्यासाठी जागृती आवश्यक--वरिष्ठ न्यायमूर्ती ए.ए. सय्यद विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्यातर्गत 61 स्टॉल्सच्या माध्यमातून 3 हजार 815 लाभार्थ्यांना देण्यात आलेले विविध लाभ

  अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका):- संविधानाने सर्वांना समान हक्क दिले आहेत. तरीही समाजात अजूनही मागासलेले, वंचित घटक आहेत. त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी जागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ न्यायमूर्ती,उच्च न्यायालय, मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई श्री.ए.ए.सय्यद यांनी आज नागोठणे येथे केले.      महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा, योजनांचा महामेळावा रोहा तालुक्यातील नागोठणे येथील रिलायन्स पेट्रोकेमिकल्स टाउनशिप मधील बालगंधर्व रंगभवन सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.     यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई चे सदस्य सचिव श्री.दिनेश सुराणा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे, न्यायाधीश अशोककुमार भिलारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर