Posts

Showing posts from October 24, 2021

होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त विद्यमाने मानसेवी होमगार्ड सदस्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

  अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य होमगार्ड दलाचे उपमहासमादेशक अपर पोलीस महासंचालक ब्रिजेशसिंह यांच्या मार्गदर्शनानुसार होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त विद्यमाने मानसेवी होमगार्ड सदस्यांसाठी दि. 28 ऑक्टोबर   ते 30 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड, रायगड-अलिबाग येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.   या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रशिक्षणाकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. सागर पाठक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे प्रशिक्षण सत्र अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक, होमगार्ड श्री.अतुल झेंडे यांच्या नियंत्रण व देखरेखीखाली संपन्न होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महा बँक कर्ज मेळावा संपन्न 24 गटांना 63 लाख रकमेचे कर्ज वितरित

    अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका):- स्टेट बँक ऑफ इंडिया आणि   जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष रायगड अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने   नुकताच महाबँक मेळावा घेण्यात आला.   या महाकर्ज मेळाव्यामध्ये    24 गटांना 63 लाख रकमेचे कर्ज वितरित करण्यात आले व विविध प्रकारचे वैयक्तिक कर्जाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध विभागांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. उज्वला बाणखेले, जिल्हा विकास व्यवस्थापक श्री एस.एस. रघवतान, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, एल. डी.एम. रायगड श्री.विजय कुलकर्णी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक श्री. प्रकाश तांबे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक श्री. कुमार परिमल प्रेम, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक श्री. विपीन कुमार पांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या मान्यवरांनी सर्व समूहातील महिलांना अतिशय महत्त्वाच्या अशा   योजनांची माहिती व त्याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास BMMU अलिबाग कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक सौ. रुबिना, प्रभाग समन्वयक वर्षा म्हात्रे, अमोल माळी, साईनाथ पाटी

एचआयव्ही/एड्स जनजागृतीविषयी रोहा येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त INDIA   @७५ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग व को. ए. सो. डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य व सौ. के. जी. ताम्हाणे कला महाविद्यालय, रोहा राष्ट्रीय सेवा योजना विभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने   शुक्रवार दि. 29 ऑक्टोबर 2021   रोजी   सकाळी 11. 30 वाजता डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य महाविद्यालय, रोहा   येथे जिल्हास्तरावरील   एचआयव्ही/एड्स विषयी   Quiz competation   (प्रश्नमंजुषा)   या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.             तरी प्रत्येक महाविद्यालयातील रेड रिबन क्लबमधील दोन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, आयोजित करण्यात आलेल्या   एचआयव्ही/एड्स विषयी   Quiz competation   (प्रश्नमंजुषा) स्पर्धेमध्ये जिंकणा-या रेड रिबन क्लबच्या टीम करीता प्रथम   पारितोषिक   रु. ५०००/-     व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पारितोषिक   रु. २०००/-     व प्रशस्तीपत्रक, तृतीय पारितोषिक रु. १०००/-     व प्रशस्तीपत्रक या पध्दतीने बक्षीस देण्यात येणार आहे  

जिल्हा कारागृहातील बंद्यांचे नातेवाईक, वकील यांच्या भेटीदरम्यान कोविड-19 नियमांचे पालन करणे आवश्यक

    अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका) :- अपर पोलीस महासंचालक व महानिरिक्षक कारागृह व सुधारसेवा, पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोविड-19 विषाणूचा सद्य:स्थितीतील प्रादूर्भाव विचारात घेता, अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांच्या प्रत्यक्ष नातेवाईक, वकील भेटी पूर्ववत करण्याबाबत अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह यांनी पुढील अटी व शर्तीच्या आधारे कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. अटी व शर्ती :- प्रत्यक्ष, समक्ष भेटी दरम्यान कोविड-19 च्या संदर्भातील सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्याची खबरदारी घ्यावी,   इंटरकॉमचे फोन रिसीव्हर प्रत्येक भेटी दरम्यान सॅनिटाईज करण्याची दक्षता घ्यावी,   कारागृहांनी विकत घेतलेले सर्व मोबाईल फोन, सिमकार्ड व सोबतची सर्व साधने   अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा पुणे यांच्याकडील दि.12 ऑक्टोबर 2021 च्या परिपत्रकामध्ये दिलेल्या निर्देशानुसार विभागीय विशेष पोलिस महानिरीक्षक कारागृह, कारागृह उपनिरीक्षक यांच्याकडे जमा करण्याची कार्यवाही करावी   तसेच संबंधित मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीशी संपर्क साधून मोबाईल

करोनाच्या नियमांचे पालन करुन शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे निर्देश

  अलिबाग,जि.रायगड,दि.27(जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल क्षेत्रातील उरण, खालापूर, व कर्जत तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण- रायगड कार्डाच्या कार्यक्षेत्रातील अलिबाग, मुरुड, रोहा, महाड, माणगाव, व श्रीवर्धन या ठिकाणी शिबीर दौऱ्याचे कामकाज करताना शासनाने कोविड-19 या   साथ रोगाच्या दिलेल्या शिबिराच्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असावे, शिबिराच्या ठिकाणी उपस्थितांनी मास्क परिधान करणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील, शिबिराच्या ठिकाणी उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगचे   नियम पाळले जातील याची दक्षता घ्यावी, कोविड-19 केंद्र व राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे या सूचनांप्रमाणे शिबिराचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण- रायगड यांना दिले आहेत. ००००००

“माझी वसुंधरा” अभियानांतर्गत श्रीवर्धन मध्ये पर्यावरण संवर्धन व स्वच्छता जनजागृतीपर सायकल रॅली संपन्न

    अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :- “ माझी वसुंधरा ” अभियानांतर्गत श्रीवर्धन मध्ये पर्यावरण संवर्धन व स्वच्छता जनजागृतीपर सायकल रॅली चे आयोजन “ माझी वसुंधरा ” अभियान हे   स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत शासनाने दि. 14 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी,आणि आकाश या निसर्गातील पंचतत्वांचे गुणवत्तापूर्ण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी या अभियानांतर्गत करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार व मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7.30 वाजता श्रीवर्धन नागरपरिषदेमार्फत सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.   या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन, प्लास्टिक मुक्त शहर, कचरा मुक्त शहर, प्रदूषण मुक्त शहर या बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच “ माझी वसुंधरा ” अभियानांतर्गत सामुदायिक शपथ घेण्यात आली. सायकल रॅली ची सुरुवात श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालयापासून करण्यात आली व पुढे    छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्केट

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका) :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-        गुरुवार दि.28 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7.00 वा. शासकीय निवासस्थान क-1 मंत्रालय येथून गेट वे ऑफ इंडिया, मुंबईकडे प्रयाण. सकाळी 7.10 वा. गेट वे ऑफ इंडिया,मुंबई येथून स्पीड बोटीने मांडवा, अलिबागकडे प्रयाण. सकाळी 7.30 वा. मांडवा येथे आगमन व शासकीय वाहनाने माणगावकडे प्रयाण.   सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह माणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह माणगाव येथे कार्यकर्त्यांच्या भेटी   व चर्चा. सकाळी 9.45 वा. माणगाव मांगरुळ ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. मांगरुळ येथे आगमन व मांगरुळ ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. मांगरुळ येथून माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. महाड-माणगाव-पोलादपूर विधानसभा क्षेत्रातील पाणी पुरवठा योजना आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ : शासकीय विश्रामगृह, माणगाव. दुपारी 12.00 वा. माणगाव येथून मांडवा, अलिबागकडे प्रयाण. दुपारी 2.00   वा. मांडवा, अलिबाग येथे आगमन व स्पीड बोटीने मुंबईकड

मोटार वाहन निरीक्षकांचा नोव्हेंबर 2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण या कार्यालयामार्फत तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे कामकाज प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येत असते. कोविड काळातील दुसऱ्या लाटेत वाढती रुग्ण संख्या व शासनाच्या वेळोवेळी आदेशान्वये माहे मार्च 2021 पासून शिबीर कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते.           आता या शिबीर कार्यालयाचे कामकाज माहे नोव्हेंबर 2021 पासून पूर्ववत सुरू करण्यात येत असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा नोव्हेंबर-2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम   पुढीलप्रमाणे-       मंगळवार, दि.11 नोव्हेंबर व दि.सोमवार दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी ता. महाड.   शुक्रवार, दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी ता.रोहा. गुरुवार, दि.11 नोव्हेंबर 2021 रोजी ता.मुरुड.   बुधवार दि.24 नोव्हेंबर 2021 रोजी ता.माणगाव. बुधवार, दि.10 नोव्हेंबर 2021 व मंगळवार दि.23 नोव्हेंबर 2021   रोजी ता.श्रीवर्धन.   शुक्रवार, दि.26 नोव्हेंबर2021 रोजी ता.अलिबाग.   ००००००

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका) :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-        गुरुवार दि.28 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7.00 वा. शासकीय निवासस्थान क-1 मंत्रालय येथून गेट वे ऑफ इंडिया, मुंबईकडे प्रयाण. सकाळी 7.10 वा. गेट वे ऑफ इंडिया,मुंबई येथून स्पीड बोटीने मांडवा, अलिबागकडे प्रयाण. सकाळी 7.30 वा. मांडवा येथे आगमन व शासकीय वाहनाने माणगावकडे प्रयाण.   सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह माणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह माणगाव येथे कार्यकर्त्यांच्या भेटी   व चर्चा. सकाळी 9.45 वा. माणगाव मांगरुळ ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. मांगरुळ येथे आगमन व मांगरुळ ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. मांगरुळ येथून माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. महाड-माणगाव-पोलादपूर विधानसभा क्षेत्रातील पाणी पुरवठा योजना आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ : शासकीय विश्रामगृह, माणगाव. दुपारी 12.00 वा. माणगाव येथून मांडवा, अलिबागकडे प्रयाण. दुपारी 2.00   वा. मांडवा, अलिबाग येथे आगमन व स्पीड बोटीने मुं

रायगडकरांना पासपोर्ट सुविधा उपलब्ध होण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांचे जोरदार प्रयत्न

    अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- पासपोर्ट बनविण्यासाठी रायगडकरांना लांबचा पल्ला गाठावा लागू   नये व पासपोर्टची सुविधा अलिबागमध्येच   उपलब्ध व्हावी, यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. सुनिल तटकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. या   पार्श्वभूमीवर आज (दि.26 ऑक्टोबर) रोजी खासदार श्री.तटकरे यांनी   हरिष अग्रवाल, मुख्य पोस्ट मास्टर जनरल व राजेश गावंडे   - विभागीय पासपोर्ट अधिकारी - भारत सरकार यांच्यासोबत बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. या बैठकीस गणेश सावळेशरकर   - पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई, श्रीमती शरण्या मॅडम - संचालक पोस्टल सुविधा हे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील पासपोर्ट ऑफिस सुरु करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पासपोर्ट कार्यालयाचे संबंधित अधिकारी अलिबाग येथील प्रस्थावित कार्यालयाच्या ठिकाणी भेट देणार असून हे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही या अधिकाऱ्यांनी खा. सुनिल   तटकरे यांना दिली. 000000

दिघी येथील टपाल कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांचे प्रयत्न

    अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे पूर्ण क्षमतेने टपाल कार्यालय सुरू व्हावे यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. सुनिल तटकरे यांनी मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरिष अग्रवाल, नवी मुंबईचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेशरकर तसेच श्रीमती शरण्या मॅडम - संचालक पोस्टल सुविधा यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी साजिद करजीकर, सनाउल्लाह फिरफिरे व ग्रामस्थही उपस्थित होते. नागरिकांना अधिक प्रभावी व जलद टपाल सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी हे टपाल कार्यालय पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असल्याचे खा. तटकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची हमी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. 0000000

“मिशन युवा स्वास्थ्य” कार्यक्रमांतर्गत जे.एस.एम.महाविद्यालयात सुरु असलेल्या कोविड-19 लसीकरण अभियानास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली भेट

    अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- “ मिशन युवा स्वास्थ्य ” कार्यक्रमांतर्गत अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी भेट देवून महाविद्यालयातील युवक-युवतींनी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे व मिशन युवा स्वास्थ्य यशस्वी करावे, असे आवाहन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी “ मिशन युवा स्वास्थ्य ” कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या लसीकरण अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.निदा थत्ते, राजाराम ह

वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत वस्त्रोद्योग प्रकल्पांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत असलेले वस्त्रोद्योग 27   शक्ती पेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरू आहे. त्याचप्रमाणे वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीत असलेले वस्त्रोद्योग प्रकल्प या सर्व प्रकल्पांनी तातडीने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी केले आहे. ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत सुरू असेल किंवा बंद आहे अथवा वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करीत आहे, त्या उद्योगांनी शासन निर्णय, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दि.22 ऑक्टोबर 2021 या शासन निर्णयाप्रमाणे आपले प्रस्ताव आयुक्त (वस्त्रोद्योग) यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा.   या प्रस्तावात मागील 6 महिन्यांचे वीज देयक तसेच प्रकल्पाचा एकूण वीज वापर जसे औद्योगिक, कामगार वसाहत, त्यांचे कार्यालय व अन्य वापर यांच्या माहिती तसेच त्यासाठीच्या वीज मिटर याची माहिती सादर करावी.   ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत नियमित सुरू आहे, त्या प्रकल्पांना वरी

जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिज्ञा घेवून संपन्न झाला कार्यक्रम

    अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व सभागृह येथे आज  दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सप्ताह स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे  या संकल्पनेसह दि.06 ऑक्टोबर 2021 ते 01 नोव्हेंबर 2021 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळै, तहसिलदार सचिन शेजाळ, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार सतिश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  उपस्थित सर्वांनी भ्रष्टाचार निर्मूलन संदर्भातील प्रतिज्ञा घेतली तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचनही करण्यात आले.             000000

कोविड 19 मुळे बाधित होवून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याबाबत तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय व महानगरपालिकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत

    अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- सर्वोच्च न्यायालयामध्ये दिवाणी याचिका क्र.539/2021 विविध अर्ज क्र. 1120/2021 च्या अनुषंगाने कोविड-19 मुळे बाधित होवून मृत झालेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना अर्थसहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याबाबत आदेश पारित झालेले आहेत. शासन निर्णयानुसार कोविड 19 मुळे बाधित होवून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याबाबत तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय व महानगरपालिकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्याचा निर्णय पारित झालेला आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. 13 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या शासन निर्णयातील निर्देशानुसार पुढीलमाणे जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर -अध्यक्ष,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने- सदस्य सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे-सदस्य, स्पेशालिस्ट डॉ. डॉ. विक्रमजीत पडोळे- सदस्य, डीन, अलिबाग वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. महेंद्र कुरा- सदस्य.

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच होणार जाहीर

  वृत्त क्रमांक:- 1076                                                                   दिनांक:- 26 ऑक्टोबर 2021     अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक 30 जून, 2021 रोजीच्या आदेशानुसार व त्यानुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दि. 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रु.50,000/- (अक्षरी रु. पन्नास हजार मात्र) एवढे अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यानुसार, प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दि. 12 आक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केल्यानुसार पुढीलप्रमाणे उक्त सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, हिराकोट तलावाजवळ, अलिबाग जि. रायगड पिन-402201, संपर्क क्रमांक 02141-222097 टोल फ्री नंबर 1077, ईमेल आयडी rdcraigad@gmail.com रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्

"सर्वसामान्यांसाठी न्याय" जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पोस्ट ऑफिसच्या समन्वयाने ग्रामीण शहरी भागात जनजागृती

    अलिबाग,जि.रायगड दि.25 (जिमाका):- "प्रत्येकासाठी न्याय" ही संकल्पना असलेले राष्ट्रीय न्याय सेवा प्राधिकरण व सर्वसामान्य गरीब जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचविणारे पोस्ट ऑफिस यांच्या समन्वयाने महिला, मुले, गरीब, दुर्बल वर्गातील व्यक्तीना मोफत कायदेशीर मदत व सल्ला मिळण्याचा हक्क आहे. याबाबतची माहिती ग्रामीण जनतेला करून देण्यासाठी तसेच याबद्दल जनजागृती व्हावी, या उद्देशाने मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा हक्क नक्की कोणाकोणाला आहे याचा माहितीपूर्ण सनबोर्ड शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येक पोस्ट ऑफिस मधून लावला जाणार आहे.      रायगड जिल्ह्यातील प्रातिनिधीक कार्यक्रम म्हणून सनबोर्डाचे अनावरण करून अलिबाग मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये डाक अधीक्षक रायगड विभाग श्री.अविनाश पाखरे यांच्या हस्ते पार पडला. याचा मुख्य उद्देश महिला व 18 वर्षापर्यंतची मुले, अनुसूचित जाती व जमाती वर्ग, विविध प्रकारची आपत्त्ती, जातीय हिंसा, पूर, भूकंप पिडीत व्यक्ती, मानवी तस्करी शोषण किवा वेठबिगारीचे बळी, तुरुंगात असलेल्या व्यक्ती, औद्योगिक कामगार, मानसिकदृष्ट्या दुर्बल किवां दिव्यांग व्यक्ती, वार्षिक उत्पन्

सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ, 78, 78 अन्वये विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्याबाबत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले आहे.                महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ, 78, 78 अन्वये विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी शासनातील राज्य शासनाचे गट अ व ब प्रवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी/मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (एच.डी.सी) धारक/चार्टड अकाऊंटंट (सी.ए.) /इन्स्टिटयूट ऑफ कास्ट अँड वकस अकाउंटंट (आय.सी.डब्ल्यु.ए.) /कंपनी सेक्रेटरी (सी.एस.), सहकार खात्यातील प्रशासन/ खापरिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक (किमान 5 वर्ष अनुभव) कायद्याची पदवी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.             अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :- पदवी प्रमाण

ग्रामपंचायतीत मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे निर्देश तर या विशेष ग्रामसभेत जनतेनेही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदारयादीची पडताळणी व दुरूस्ती करुन ती त्रुटी विरहीत करण्याचा व दि. 01 जानेवारी या अर्हता दिनांकानुसार नवीन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो. चालू वर्षीच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंदणी करून मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.                यापूर्वी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गावातील नागरिकांनी मतदारयादीतील त्यांची नोंदणी तपासणी व नवीन मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये मतदारयादीच्या चावडी वाचनाचा उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली होती.                तथापि, आता हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचावा, याकरिता दि.16 नोव्हेंबर, 2021 रोजी संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिक

जिल्हा अग्रणी बँक तर्फे दि.27 ऑक्टोबर रोजी कर्जत येथे महाकर्ज मेळाव्याचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार आणि जिल्हा अग्रणी   बँक, बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे बुधवार, दि. 27 ऑक्टोबर   2021 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत रॉयल गार्डन, कर्जत, ता.कर्जत येथे भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.                या कर्ज मेळाव्यात कर्जत शहर परिसरातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँका सहभागी होणार आहेत. तसेच   कर्ज मेळाव्यामध्ये छोट्या व्यवसायिकांना मुद्रा योजनेंतर्गत शिशु कर्ज, हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत कर्ज आणि विविध गृह कर्ज, वाहन कर्ज व   शेतकऱ्यांना, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज, NRLM आणि कर्जत नगर पालिका भागातील बचतगटांना समुदाय कर्ज,   नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांसाठी जिल्हा उद्योग मार्फत PMEGP, CMEGP या   योजनेंर्गत अर्ज स्वीकारले जाणार आहेत .               त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 35 टक्के अनुदान असेलेले PMFME अंतर्गत कृष