Posts

Showing posts from November 19, 2017

उरण शहरासाठी प्राप्त 56 कोटींच्या विशेष अनुदानातून विकासकामांचा ना. चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ

Image
             अलिबाग, जि. रायगड, दि.24(जिमाका)-    उरण शहर स्मार्ट सीटी बनविण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.त्या अश्वासनाची पुर्तता करण्यासाठी    महाराष्ट्र शासनाच्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण निधीतून 56 कोटींचे विशेष अनुदान देण्यात आले आहे. त्या अंतर्गत विविध विकासकामांचा आज  राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उरण येथे शुभारंभ करण्यात आला.  यावेळी  पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष महेश बालदी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, मुख्याधिकारी संदीप खोमणे, शिक्षणमंडळ सभापती रवी भोईर जयविन कोळी कौशिक शहा पी पी खारपाटील यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणंवीस यांच्या माध्यमातून उरण नागरपरिषदेला हे विशेष 56 कोटींचे अनुदान मिळाले आहे.  यावेळी बोलतांना ना. चव्हाण म्हणाले की,  विकासकामे करताना दुरदृष्टी ठेवून कामे करावी, जेणे करुन त्यांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राहिल.  यानिधीतून शहरातील रस्ते, टाऊन हॉल व विमला तलाव सुशोभिकरण करण्

क्षेत्र दुरुस्ती सुनावणीसाठी उपस्थितीचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24:- दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोर अंतर्गत मौजे पाणसई ता. माणगाव येथील औद्योगिक क्षेत्र सऩं. 186/6/ब/2  येथील क्षेत्र दुरुस्तीसंदर्भात तहसिलदार माणगाव यांच्या कार्यालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचे कामकाज  यासंदर्भात 29 जून, 18 सप्टेंबर 13 ऑक्टोंबर, 27 ऑक्टोंबर वेळी सुनावण्या झाल्या. तथापि यासुनावण्यांना सामनेवाला  श्रीमती जयश्री विनोदकुमार शहा या अनुपस्थित राहिल्या आहेत.  येत्या 14 डिसेंबर रोजी  सकाली साडेअकरा वा. पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीस श्रीमती शहा यांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहावे. या सुनावणीस त्या उपस्थित न राहिल्यास त्यांना काहीही सांगावयाचे नाही असे गृहित धरुन  पुढील कारवाई करण्यात येईल, असे आवाहन तहसिलदार माणगाव यांनी केले आहे. ०००००

पेण अर्बन बॅंकेचा एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा ठराव

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24:- पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, यांचे निर्गमित परिपत्रकान्वये कर्जाची प्रभावीपणे वसुली व्हावी यासाठी बँकेच्या सर्व कर्जदारांसाठी शासनाने एकरकमी परतफेड योजना अमलात  आणण्याचा ठराव  दि. 22 नोव्हेंबर रोजीच्या सभेत करण्यात आला. या एकरकमी परतफेड योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी 2018 पर्यंत  असून मुदतीत प्राप्त  अर्जांचा विचार केला जाईल. एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या शर्ती व अटीनुसार कोणत्याही कर्जदारांस यापुढे पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेता येणार नाही. तरी बँकेच्या सर्व थकीत कर्जदारांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेऊन आपली कर्जखाती बंद करावीत व तसा बेबाकी दाखला घेण्यात यावा, असे आवाहन प्रशासक मंडळ, दि.पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. पेण यांनी केले आहे. ०००००

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे सोमवार दि.27 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- सोमवार दि.27 रोजी सकाळी अकरा वाजता अलिबाग येथे आगमन व हमी भावाने भात खरेदी योजनेच्या आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ:राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग,जि. रायगड. बैठकीनंतर दुपारी चार वाजता अलिबाग येथून डोंबिवलीकडे प्रयाण. ०००००

निलक्रांतीसाठी मत्स्य संशोधन गरजेचे-ना.दीपक केसरकर

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.24(जिमाका)- महाराष्ट्रात मत्स्यशेती यशस्वी होऊन  निलक्रांती होण्याकरीता मत्स्य विकासात अद्यावत संशोधन होणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त,  नियोजन राज्यमंत्री ना.दीपक केसरकर यांनी  डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील मत्स्य व कृषि संशोधन प्रकल्पाची पाहणी नुकतीच (दि.21) करताना केले.  यावेळी खार  जमीन संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.सुरेश दोडके, मत्स्यशास्त्रज्ञ डॉ.विवेक वर्तक, सहाय्यक कृषि  अभियंता डॉ.प्रविण इंगळे उपस्थित होते. डॉ.दोडके यांनी खार जमीनीत केलेल्या संशोधनाबाबत तसेच डॉ.विवेक वर्तक यांनी मत्स्य संशोधन प्रकल्पाची माहिती देणारे सादरीकरण केले. केसरकर यांनी केंद्रावरील मत्स्यपिंजरे प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करुन त्याबाबतच्या तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे केंद्राच्या मत्स्यतलावातील नर तिलापीया, पंगॅशियस तसेच जिताडा माशांची प्रत्यक्ष पाहणी करुन त्यांच्या संवर्धनाविषयी व शेतकऱ्यांच्या उपयुक्तेविषयी माहिती घेतली. केंद्रातील उपक्रमाचे त्यांनी क

रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2017 :माध्यमे वाचनसंस्कृती संवर्धनासाठी पुरकच- डॉ. गणेश मुळे

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.24(जिमाका)- वाचनाची माध्यमे बदलली आहेत. परंतू वाचन हे अक्षरांशी संबंधित आहे; आणि अक्षरे शाश्वत आहेत. त्यामुळे वाचन संस्कृती टिकणार, असे ठाम प्रतिपादन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज येथे केले. जिल्हा ग्रंथोत्सवात आज आयोजित माध्यमे आणि वाचन संस्कृती या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. मुळे बोलत होते. यावेळी दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशीकांत सावंत, दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अलिबागच्या अध्यक्ष सुजाता पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा. वळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  या परिसंवादात बोलतांना सुजाता पाटील म्हणाल्या की, लेखन कलेमुळे शब्द चिरंतन झाले. लिहिलेले वाचले जाऊन वाचन संस्कृति विकसित झाली.  माध्यमांमध्ये बदल होत असला तरी वाचन संस्कृती मात्र टिकून आहे. तरीही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी वाचनसंस्कृतीवर पहिले आक्रमण केले.  अलिकडच्या समाजमाध्यमांमुळे लेखक आणि वाचक यांच्या दरम्यान असणारे अंतर कमी झाले आहे, शिवाय वेळही कमी झाला आहे.  त्यामुळेच आता डिजीटल दिवाळी अंक निघू लागले आहेत

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 27 नोव्हेंबर 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि.27 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल अभिरुची, चिपळूण जि.रत्नागिरी येथून रोहा शहर जि.रायगडकडे प्रयाण.दुपारी एक वाजता रोहा येथे आगमन.दुपारी दोन वाजता रोहा येथून कोर्लई ता.मुरुडकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता कोर्लई येथे आगमन. सायंकाळी पाच वाजता कोर्लई येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

जिल्हा ग्रंथोत्सव 2017 :पुस्तकांमुळे माणसे वाचणेही शिकलो- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.23(जिमाका)- पुस्तक वाचनातून आपण समरसता अनुभवू लागतो. दुसऱ्याला जाणून घेण्याची हीच प्रक्रिया असते.  हे केवळ वाचनातुन शक्य होते. त्यामुळेच पुस्तक वाचता वाचता माणसेही वाचायला शिकलो, ज्याचा फायदा मला जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना होतो. येणाऱ्या अभ्यागतांना वाचणे सहज शक्य होते, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 'ग्रंथांनी मला काय दिले?' या विषयावर आपले विचार व्यक्त केले. जिल्हा ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमात आज सकाळी जेएसएम महाविद्यालयात 'ग्रंथांनी मला काय दिले?' या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात अप्पर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी आपले विचार व्यक्त केले.  यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी उपस्थित होते.  या परिसंवादात बोलतांना जिल्हा कोषागार अधिकारी मुल्ला म्हणाले की,  शासनाचे काम करतांना विविध नियमांचा आधार घ्यावा लागतो. त

वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी उलगडले आपल्या आवडत्या पुस्तकाचे अंतरंग

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.23(जिमाका)- जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात शालेय विद्यार्थी वाचकांनी ' माझे आवडते पुस्तक' या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत आपल्या आवडत्या पुस्तकाचे अंतरंग उलगडले.  शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातून प्रत्येक तालुक्यातून निवडक विद्यार्थी या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी  बोलावण्यात आले होते.  यात सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकाचे अंतरंग उपस्थितां समोर उलगडून दाखवले. यातून विद्यार्थ्यांच्या चौफेर वाचनाचा प्रत्यय उपस्थितांना आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकात श्यामची आई, अग्निपंख,  भगवत गिता यासारख्या विविध विषयांवरील पुस्तकांची  माहिती उपस्थितांसमोर कथन केली. या स्पर्धेत 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांची नावे या प्रमाणे-  प्रथम क्रमांक सिमरन निलेश नाईक, आरसीएफ स्कूल कुरुळ द्वितीय क्रमांक श्रृती भरत म्हात्रे आरसीएफ स्कूल कुरुळ, तृतीय क्रमाक  प्रणोती किशोर अनुभवणे

जिल्हा ग्रंथोत्सव 201:नायगावकरांच्या मिश्किल कविता आणि हास्यरसात डुंबलेले अलिबागकर

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.23(जिमाका)- जिल्हा ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ज्येष्ठ कवी अशोक  नायगावकरांच्या मिश्किली आणि कविता या काव्य मैफिलीत सादर झालेल्या  मिश्किल कवितांनी अलिबागकर रसिक हास्यरसात डुंबले. मिश्किल कवितांतून आणि निवेदनातून नायगांवकरांनी गुदगुल्या आणि चिमटे घेत कवितांची पखरण केली. कवितांच्या या मैफिलीतून दैनंदिन जीवनातील समस्यांकडे मिश्किलपणे पहात जीवन सुसंवादी आणि आनंददायी करण्याचा संदेशही कवी नायगांवकर यांनी अलिबागकर रसिकांना दिला,  येथील जेएसएम महाविद्यालयाच्या सभागृहात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सायंकाळी ही काव्य मैफिल रंगली. यावेळी लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांनी  कवी नायगांवकर यांचा परिचय रसिकांना करुन दिला. ज्येष्ठ साहित्यीक ॲड. विलास नाईक यांच्या हस्ते पुस्तक देऊन कवी नायगांवकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री. नायगांवकर यांनी आपल्या काव्य कथनास सुरुवात केली. आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात खूप कवि कल्पना सुचू शकत नाहीत. त्यामुळे जीवन जगतांना ही मिश्किलता कामी येते. याचे अने

मतदार नोंदणीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण :कार्यक्रमात सहस्त्रक मतदारांची होणार नोंदणी :निवडणूक साक्षरता क्लबही स्थापन करणार

Image
निवडणूक साक्षरता क्लबही स्थापन करणार अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान सहाय्यक मतदार नोंदणी अभियान आणि निवडणू साक्षरता क्लब हे दोन विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली. या  अभियानासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अलिबाग शहरातील जे.एस.एम. महाविद्यालय, पी.एन.पी. महाविद्यालय, वेश्वी,जा.र.ह.कन्या विद्यालय,जन.अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय, अलिबाग येथील प्रतिनिधी उपस्थित होते. सहस्त्रक मतदार नोंदणी अभियानात ज्या मुला-मुलींचा जन्म या सहस्त्रकाच्या  प्रारंभी म्हणजेच 1 जानेवारी 2000 रोजी  झाले आहे ते येत्या 1 जानेवारी 2018 या दिवशी वयाचे 18 वर्षे पूर्ण करीत आहेत.  अशा सहस्त्रक मतदारांचा या निमित्ताने शोध घेऊन त्यांची मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. अशा सहस्त्रक  मतदारांचा 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनी मतदार  ओळख कार्ड देऊन सत्कार करण्यात येईल. तसे

ई-स्कॉलरशिप पोर्टल नव्याने सुरु

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22:- सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतन इत्यादी योनजेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 या वर्षापासून राज्य शासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या या महाडिबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे हे http://mahaeshol.Maharashtra.gov.in   संकेतस्थळ स्थगित करण्यात आलेले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतने,  इत्यादी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने तो अदा करण्यासाठी आत ई- स्कॉलरशिप  हे संकेतस्थळ 21 नोव्हेंबर पासून पुन्हा मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सन 2015-16 साठी दि.31 मार्च पर्यंत सन 2016-17 साठी दि.31 मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. परंतु ज्यांना अद्याप विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतन यांचा लाभ मिळालेला नाही

अन्न पदार्थ व्यावसायिकांना आवाहन :परवाना नोंदणी व नुतनीकरण बंधनकारक

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22:- रायगड जिल्ह्यातील सर्व किराणा, घाऊक विक्रेते,वितरक, किरकोळ विक्रेते, उत्पादक,हॉटेलचालक, रेस्टॉरंट चालक, पान शॉप धारक, दुध,मास विक्रेते,अन्न् पदार्थ वाहतुकदार व इतर अन्न पदार्थ व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 नुसार परवाना अथवा नोंदणी  करुनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे, तरी अन्न पदार्थ व्यावसायिकांनी परवाना नोंदणी व नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न)अन्न  व औषध प्रशासन दि.तु.संगत, पेण यांनी केले आहे. विना परवाना अथवा नोंदणी व्यवसाय करणे गुन्हा असून कलम 63 नुसार 6 महिन्यापर्यंत शिक्षा व 5 लाख रुपये दंड होऊ शकतो. उत्पादक,वितरक व घाऊ विक्रेते यांना परवाना अट क्र.14 नुसार विमा परवाना अथवा नोंदणी धारकास अन्न पदार्थांची विक्री करणे किंवा विना परवाना अथवा नोंदणी धारकाकडून अन्न पदार्थांची खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे  परवाना घेतलेल्या ज्या अन्न व्यावसायिकांची परवाना मुदत 31 डिसेंबर 2017 पर्यंत संपूष्टात येत आहे अशा सर्व अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना चे नुतनीकरणासाठी योग्य त्या शुल्कासह दि.30

जिल्हा ग्रंथोत्सव 2017 : जगण्यासाठी महत्वाचे ते ते वाचावे- कवी अशोक नायगांवकर : रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन, ग्रंथ दिंडीने झाली सुरुवात

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.22(जिमाका)- ग्रंथोत्सवाचे आयोजन हे युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आहे. युवकांसमोर पुढचा काळ हा परीक्षेचा काळ आहे. जगण्याच्या या स्पर्धेत आपले जीवन जगण्यासाठी सुकर करतांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान, तंत्र आत्मसात करावे लागते, ते सगळे ग्रंथामध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे महत्त्वाचे आहे ते ते युवकांनी वाचाचे, असा हितोपदेश ज्येष्ठ कवि अशोक नायगांवकर यांनी आज येथे दिला.  रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2017 च्या उद्घाटनप्रसंगी ते आज अलिबाग येथे आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जेएसएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती रेश्मा पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा. वळवी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथदिंडीने झाली सुरुवात आज सकाळी साडेनऊ वा. सरखेल कान्होजी आंग्रे समाधीपासून ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाच्या आयोजनास सुरुवात झाली. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत

डिसेंबर महिन्यात क्रीडा सप्ताहाचे आयोजन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व क्रीडा वातावरण निर्मिती व्हावी यासाठी डिसेंबर महिन्यात दि.१२ ते  १८ या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा सप्ताह उपक्रमात जास्ती जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. क्रीडा सप्ताहातील कार्यक्रमांचा तपशिल याप्रमाणे- दि. 12 डिसेंबर रोजी  जि.प. प्राथमिक शाळा नवगाव, ता.अलिबाग येथे स्थानिक खेळाडूंचे शहरात संचलन तर विद्यार्थ्यांचे समुहगान, राष्ट्रभक्तीपर गायन तसेच  क्रीडा क्षेत्रातील उच्च पदस्थ तसेच मान्यवर व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन. दि.13 डिसेंबर रोजी  सुषमा पाटील विद्यालय कामोठे ता.पनवेल  येथे भारतीय पारंपारीक व्यायामप्रकार खेळाचे प्रदर्शन तसेच चित्रपट प्रदर्शन व लोकनृत्य सादरीकरण. दि.14 डिसेंबर  रोजी जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, अलिबाग येथे स्थनिक पातळीवर विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने तसेच विविध स्पर्धांचे आयोजन त्यामध्ये कराटे, बेल्टरेसलिंग, तायक्वांदो यांचा समावेश. दि. 15 डिसेंबर रोजी आरसीएफ स्कुल कुरुळ ता. अलिबाग य

जिल्हा ग्रंथोत्सव 2017: आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सव

अलिबाग, जि. रायगड, दि.21(जिमाका)- रायगड जिल्ह्याचा शासकीय ग्रंथोत्सव बुधवार दि.22 व   गुरुवार 23 नोव्हेंबर या दोन दिवसांत आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यास नामां की त कवी अशोक नायगावकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रमही रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. ग्रंथप्रेमी वाचक व विद्यार्थ्यांनी या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सदर दोन दिवसीय कार्यक्रम जेएसएम महाविद्यालय, अलिबाग येथील सभागृहात होणार आहे. बुधवार दि.22 रोजी कान्होजी आंग्रे समाधिपासून सकाळी 9 वा. ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली आहे.  यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ग्रंथ पूजन होईल. तर यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील व  सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील  यांची उपस्थिती राहणार आहे. ग्रंथदिंडी कार्यक्रम स्थळी पोहोचल्यावर सकाळी 11 वा.मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ