Posts

Showing posts from August 28, 2016

दिवाणी न्यायालयात मध्यस्थी जागृती कार्यक्रम संपन्न

Image
दिनांक :- 03 सप्टेंबर  2016                                                         वृत्त क्र.576 दिवाणी न्यायालयात मध्यस्थी जागृती कार्यक्रम संपन्न             अलिबाग दि. 3:-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांच्या विद्यमाने आज दिवाणी न्यायालय व.स्तर अलिबाग यांच्या न्याय कक्षामध्ये  जिल्हा न्यायाधीश,रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनानुसार मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.              या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर, दिवाणी न्यायाधी व.स्तर एल.डी.हुली, जिल्हा सरकारी वकील ऍ़ड.प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ऍ़ड. प्रविण ठाकूर आदी वकीलवर्ग व न्यायालयातील अधिकारी उपस्थित होते.                 यावेळी ऍ़ड. प्रसाद पाटील व ऍ़ड  श्रीराम ठोसर यांनी उपस्थित पक्षकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन ऍ़ड. पल्लवी तुळपुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍ़ड.प्रविण ठाकूर यांनी केले.                                                        0000000

गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

दिनांक :- 03 सप्टेंबर  2016                                                          लेख क्र.29 गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज        गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत व्हावा.  वाहतूक कोंडी होऊ, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखून उत्सव शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत.  याबाबतची माहिती देणारा लेख.. गणेशोत्सव कोकणात मोठया प्रमाणावर साजरा होतो.  रायगड जिल्ह्यात सार्वजनिक गणपती 276, खासगी 99762, गौरी स्थापना 14647 एवढया गौरी-गणपतीची स्थापना होते.   कोकणात गणेशोत्सवासाठी जाणारे नागरिक रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन जात असतात.   हा उत्सव साजरा करण्यासाठी जाताना  नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये.  यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणेला त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या बाबी सुयोग्य पध्दतीने कराव्या यासाठी सुचना दिल्या आहेत. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात विद्युत पुरवठा अखंडित राहावा यासाठी विद्युत अधिकाऱ्यांनी योग्य

अवयवदान हे श्रेष्ठ दान सर्वांचा सहभाग महत्वाचा --जिल्हा शल्यचिकित्सक

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 01 सप्टेंबर  2016                                                 वृत्त क्र.574 अवयवदान हे श्रेष्ठ दान सर्वांचा सहभाग महत्वाचा                                 --जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग दि.1 :- अवयवदान हे श्रेष्ठदान असून अवयदान अभियानात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागावकर यांनी आज येथे व्यक्त केले. अवयवदान अभियानानिमित्त जनजागृती व्हावी याकरिता आज  अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील वळके महाविद्यालयात  अवयवदान या विषयाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.    यावेळी महाविद्यालाचे प्राचार्य, उप प्राचार्य शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते. 0000

मुख्य कार्यकारी अधिकारी व शल्य चिकित्सक यांनीही भरले अवयवदानाचे संमतीपत्र

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 01 सप्टेंबर  2016                                                         वृत्त क्र.573 मुख्य कार्यकारी अधिकारी व शल्य चिकित्सक यांनीही भरले अवयवदानाचे संमतीपत्र अलिबाग दि.1 :- अवयवदान महा अभियानंातर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे व  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागावकर यांनी अवयवदानाचे संमतीपत्र भरुन या मोहिमेत आपला सक्रीय सहभाग नोंदवला.              अवयवदान हे श्रेष्ठदान असल्याने या अभियानात व यापुढेही अनेकांनी सहभाग घेऊन रुग्णांना जीवनदान देण्याचे महानकाम करावे, असे आवाहन यावेळी डॉ.अविनाश गोटे व डॉ.बी.एस.नागावकर यांनी केले. 0000

अवयवदान महा अभियान अवयदात्यांचा सत्कार संपन्न

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 01 सप्टेंबर  2016                                                         वृत्त क्र.572 अवयवदान महा अभियान अवयदात्यांचा सत्कार संपन्न  अलिबाग दि.1 : राज्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत अवयवदान महा अभियान राबविण्यात आले.  रायगड जिल्ह्यात या अभियानांतर्गत  अवयवदान केलेल्या दैनिक लोकमतचे कोकण समन्वयक जयंत धुळप व छायाचित्रकार असराणी  यांच्यासह 11 व्यक्तींचा व अवयवदान केलेल्या 5 व्यक्तींच्या नातेवाईकांचा आज नर्सिंग प्रशिक्षण केंद्र अलिबाग येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागावकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.)डॉ.अविनाश गोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  विविध स्पर्धा बक्षिस वितरण             तसेच या अभियानात जनजागृती व्हावी यासाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजे

रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन गणेशोत्सवासाठी कोकणात येताना पर्यायी मार्ग वापरा-वाहतूकीची कोंडी टाळा

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :-01 सप्टेंबर  2016                                                   वृत्त्‍ क्र.571                                     रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन गणेशोत्सवासाठी कोकणात येताना पर्यायी मार्ग वापरा-वाहतूकीची कोंडी टाळा               अलिबाग दि.1 : गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख सण असून यासाठी मुंबई,ठाणे,नाशिक,पुणे आदि भागात असलेल्या कोकणवासी कोकणात सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी हमखास येतात.   यामुळे मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात वाहनांची संख्या वाढून बऱ्याच वेळा  महामार्गावर वाहतूक कोंडी होते.  त्यामुळे अशी होणारी  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेश भक्तांनी गणेशोत्सवासाठी कोकणात गावी येताना पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात

भात पीकावरील किड रोग व्यवस्थापन

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 1 सप्टेंबर 2016                                                          लेख क्रमांक 27 भात पीकावरील किड रोग व्यवस्थापन भात पिकावरील पडणाऱ्या किड, रोग  यांचे  योग्य नियोजन केले तर भात पिकाचे संरक्षण होऊन प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता वाढते.  भात पिकावरील किड रोगाचे व्यवस्थापन,वापरण्यात येणारी किटकनाशके त्यांचे प्रमाण, वापरण्याची  पध्दती, मैत्र किटकाचे संवर्धन याबाबत माहिती देणारा लेख            बहुसंख्य लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. भाताची प्रतिहेक्टरी उत्पादकता फारच कमी आहे.  ती वाढविण्यासाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती, रासायनिक, जैविक सेंद्रिय खतांचा योग्य वापरण्याबरोबरच किडी व रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पीक संरक्षणाची एकात्मिक उपाययोजना करणे आवश्यक आ

पेणच्या सुरेख मंगलमूर्ती गाऊ तयांची आरती

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक  01 सप्टेंबर 2016                                                                 लेख : 28 पेणच्या सुरेख मंगलमूर्ती गाऊ तयांची आरती अष्टविनायकातील महड व पाली हे दोन गणेशस्थान असलेला रायगड जिल्हा.  आणि या गणेशस्थानासोबतच गणेशमूर्तीसाठी जगभर प्रसिध्द असलेले पेण हे गाव.  केवळ पेण हे गाव नव्हे तर पेणच्या आसपास असलेले बरीचशी गावे गणेशाच्या सुरेख मूर्ती तयार करण्यात वर्षभर मग्न असतात.  अगदी संपूर्ण वर्षभर गणेश मूर्ती तसेच देवीच्या मूर्ती निर्मिती प्रक्रियेत असलेला पेण परिसरातील हा महत्वाचा उद्योग व्यवसाय.             अगदी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यासोबत गुजरात,राजस्थान,तेलंगणा,आंध्र, गोवा राज्यात आणि परदेशातही पेणच्या गणेशमूर्तीची मागणी आहे.   या भागात गणेशोत्सवाच्या

सन 2016-17 या वर्षाकरिता पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

दिनांक :- 31 ऑगस्ट  2016                                                वृत्त क्रमांक 566 सन 2016-17  या वर्षाकरिता पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन अलिबाग दि.31 :- सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय कल्याण क्षेत्रात लक्षणीय व वैशिष्टयेपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना साहित्यरत्न लेाकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार  इत्यादी सन्माननीय व्यक्तींच्या नावाने पुरस्कार देण्यात येतात.  सन 2016-17  या वर्षाकरिता वरील पुरस्कारसाठी सामाजिक संस्था व समाज सेवक यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.             पुरस्कारांसाठी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात म्हणजेच मागासवर्गीय, पद्ददलित, दिव्यांग,वृध्द, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी क्षेत्रात वैशिट्येपूर्ण काम करणाऱ्या संस्थांकडून दरवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात.  प्राप्त प्रस्तांवाची राज्यस्तरीय समितीमार्फत छाननी करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.             पुरस्कारांसाठी अटी व शर्ती याबाबतच्या माहितीसा

अवयव दानासाठी स्वेच्छेने पुढे यावे --डॉ. बी.एस.नागावकर

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 30 ऑगस्ट  2016                                                वृत्त क्र.561 अवयव दानासाठी स्वेच्छेने पुढे यावे                                                                --डॉ. बी.एस.नागावकर  अलिबाग दि.30 : आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवयव प्रत्यारोपण करता येते. यामुळे एका रुग्णाचा जीव वाचविता येतो.   अवयव दान हे श्रेष्ठ दान असून यामुळे एका व्यक्तीला नवीन जीवन मिळते. अवयव दान हे मृत्यू पश्चात करण्यात येते. यासाठी अवयवदान मोहिमे अंतर्गत फॉर्म भरुन आपल्या नावाची नोंदणी स्वेच्छेने करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागांवकर यांनी यावेळी केले.             अवयव दानाचे महत्व विषद करण्यासाठी अवयव दान महा अभियानाअंतर्गत अलिबाग येथे केळुस्कर महाविद्यालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.एस.नागावकर यांचे

अवयवदान अभियाना निमित्त रॅलीचे उद्घाटन

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 30 ऑगस्ट  2016                                                 वृत्त क्र.560 अवयवदान अभियाना निमित्त रॅलीचे उद्घाटन अलिबाग दि.30 :-   अवयवदाना विषयी जनजागृती व्हावी व अवयव दान करण्यासाठी लोकांनी पुढे यावे या उद्देशाने राज्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत अवयवदान महा अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने आज रायगड जिल्हयात अलिबाग येथे जिल्हा रुग्णालया तर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा श्रीमती सुरक्षा शहा यांच्या हस्ते हिरवा  झेंडा दाखवून करण्यात आले. या रॅलीची सुरुवात जिल्हा रुग्णालयापासून करण्यात आली.  अलिबाग शहराच्या विविध भागातून रॅलीचे मार्गक्रमण झाले.  या रॅलीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.एस.नागावकर,जिल्हा रुग्णालय