Posts

Showing posts from June 30, 2024

आदिवासी मुलांचे/मुलींचे 13 वसतिगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शासकीय वसतिगृह प्रवेश सुरु

       रायगड, दि. 3 (जिमाका) ;- आदिवासी विकास विभागाकडुन अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता इ.8वी पासुन पुढील शिक्षणाकरिता रायगड  मध्ये पेण (मुले), कर्जत (मुले), नेरळ (मुले), पनवेल खांदा कॅालनी (मुले), पनवेल नविन (मुले), महाड (मुले), सुधागड (मुले), नागोठणे (मुले), पेण (मुली), पनवेल (मुली), नेरळ (मुली), सुधागड (मुली) व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये  रत्नागिरी (मुले)  असे एकुण 13 वसतिगृहे कार्यान्वयित आहे.   वसतिगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता प्रवेश अर्ज  https://swayam.mahaonline.gov. in  या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत. अर्ज भरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर आवश्यक सुचना या सदर वेबसाईटवर दिलेल्या आहेत.  “ सदर वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन व निर्वाह भत्ता सोय व इतर शैक्षणिक सोयी सुविधा आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. ” वसतिगृह प्रवेशासंदर्भात कोणत्याही अडचणीकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि.रायगड  येथील वसतिगृह विभागाशी संपर्क साधावा (श्री.दौंड 9075533999) असे आवाहन शशिकला अहिरराव, प

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

                     रायगड, दि.03(जिमाका):-   रायगड जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 4 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या मनुष्यबळाची (पुरुष-स्त्री) दर तिमाही (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहित महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या  www.mahaswayam.gov.in  या  संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.                  त्यानुषंगाने आपल्या आस्थापनेची माहे जून, 2024 अखेर संपणाऱ्या एप्रिल ते जून या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक विवरणपत्र आस्थापनांनी या विभागाच्या  www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर  Employment  या टॅबवरील  Employer (List a Job)  याला क्लीक करुन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करावे लॉगिन झाल्यावर आपल्या आस्थापनेची माहिती अद्ययावत करुन  ER-1  वर क्लि

आरबीएसके-डीइआयसी अंतर्गत जिल्हा रुग्णालयात बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न

Image
    रायगड (जिमाका),दि.02:-   जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने (शुक्रवार,दि.28 जून) रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी- घुगे यांच्या मार्गर्शनाखाली 0 ते 18 वयोगटातील  बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात बाल अस्थीरोग तज्ञ डॉ.मुदीत शहा यांनी 17 बालकांची तपासणी केली व बाल मेंदूविकार तज्ञ डॉ.अंकित पांडे यांनी 24 बालकांची पूर्व तपासणी करून पुढील उपचारासाठी संदर्भित केले. या शिबिरासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चेतना पाटील, अस्थिरोग तज्ञ डॉ. पंकज पाटील, डॉ. आशिष मिश्रा, आरबीसके समन्वयक सुनील चव्हाण, डीईआयसी व्यवस्थापक गणेश भोसले, सामाजिक कार्यकर्ता ज्ञानदीप भोईर, सायकॉलॉजिस्ट राजेश पवार, भौतिकउपचार तज्ञ प्रतिष्ठा नाखवा, स्पेशल एज्युकेटर सीमा विषे, अधिपरिचारिका, ऐश्वर्या थळे आदींनी सहकार्य केले. ००००००

जिल्ह्यात “स्टॉप डायरिया अभियान” राबविणार

  रायगड (जिमाका),दि.02:-   शुदध, स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, जलजीवन मिशनअंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे.जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात 1 जुलै ते  31 ऑगस्ट 2024  या कालावधीत  स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र,सरकारी कार्यालये व  प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया,गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गावस्तरावर  विविध उपक्रम घेऊन लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत. पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे

बँकांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना नियमित आणि चांगल्या पद्धतीने सेवा द्याव्यात -जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड (जिमाका),दि.02:-  रायगड जिल्ह्याला  प्राथमिकता क्षेत्रासाठी 6 हजार 600 कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून ते साध्य करण्यासाठी बँकांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना नियमित आणि चांगल्या पद्धतीने सेवा द्याव्यात असे, निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात (दि.28 जून ) रोजी संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय रिझर्व बँकच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभागाचे व्यवस्थापक अरुण बाबू, बॅंक ऑफ इंडियाचे रायगड चे विभागीय व्यवस्थापक मुकेश कुमार, स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुरेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रदीप अपसुंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जी.एस.हरळया, कृषी विभागातील कृषी अधीक्षक वंदना शिंदे, माविमचे जिल्हा व्यवस्थापक अशोक चव्हाण, वर्षा पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, दौलकर,आरसेटीचे संचालक सुमित धानोरकर तसेच विविध विभाग व महामंडळाचे अधिकारी, बँकांचे जिल

विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये खेळाडूंकरिता नवीन प्रवेश इच्छूक खेळांडूनी अर्ज करावेत

    रायगड (जिमाका),दि.02:-  सन  2024-25   साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत 09 क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (50%) व कौशल्य चाचणी (50% ) प्रक्रियेअंतर्गत खालीदिलेल्या निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार असून खेळांडूनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी , रायगड  राजेंद्र अतनुर  यांनी केले आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण ,  संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य ,  शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.  या  प्रवेश प्रक्रीयेसाठी पुढीलप्रमाणे नियम अटी व शर्ती राहणार आहेत. राज्यात पुणे ,  कोल्हापूर ,  ठाणे ,  अमरावती ,  अकोला ,  नाशिक ,  नागपूर ,  औरंगाबाद ,  गडचिरोली अशा 9 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. सदर ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी मध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्र