Posts

Showing posts from July 2, 2023

“अमृत मोफत प्रवास” अन् “महिला सन्मान” योजनांनी एस.टी. महामंडळाला दिली नवसंजीवनी..!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वय वर्ष 75 व त्या पुढील वयाच्या नागरिकांसाठी राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या माध्यमातून  “ अमृत मोफत प्रवास ”  योजना आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असलेली  “ महिला सन्मान ”  ही महिला विशेष अशा दोन स्वतंत्र योजना सुरु केल्या. या योजनांना संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनांमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे. या योजनांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या तिजोरीत भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे. या लेखाच्या माध्यमातून रायगड विभागातील राज्य परिवहन महामंडळाच्या सद्य:स्थितीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रायगड विभागात एस. टी. महामंडळाला अमृत योजनेंतर्गत एप्रिल 2023 मध्ये 1 लाख 51 हजार 701 इतक्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. त्यातून 62 लाख 88 हजार 637 एवढे उत्पन्न मिळाले. माहे मे 2023 या महिन्यात 1 लाख 54 हजार 115 इतक्या जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला. यातून राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाला 71 लाख 51 हजार 256  एवढे उत्पन्

पोलादपूर तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी

अलिबाग,दि.07 (जिमाका):-   रायगड पोलीस अंतर्गत असलेल्या हद्दीतील पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर रोडवरील मौजे दाभोळ गावाजवळ दि.27 जून 2023 रोजी दरड कोसळून येथील रस्ता वाहतुकीकरिता बंद झाला आहे. या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवून व इतर संबंधित विभागांना माहिती देवून रस्ता वाहतूकीकरिता खुला करण्याचे काम सुरु आहे. महाबळेश्वर, पाचगणी ही ठिकाणे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाची असल्याने विशेषत: या दोन्ही ठिकाणी पावसाळी हंगामात पुणे, मुंबई व देशभरातील सर्व राज्यातून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हा रस्ता घाट रस्ता व अवघड वळणे असलेला व रस्त्याच्या बाजूस मोठया तीव्र उताराच्या दऱ्या व दोन्ही बाजूस झाडीद्वारे व ठिकठिकाणी धबधबे असलेला असा आहे. तसेच पोलादपूर महाबळेश्वर रस्ता हा धोकादायक वळणाचा, दाट धुके असलेला व तीव्र उताराचा असल्याने रोडवर तसेच पायवाटेवर दरड कोसळत असल्याने अचानक दरड कोसळल्यास पर्यटकांची वित्त व जीवीत हानी होऊ शकते. त्यामुळे सुरक्ष‍िततेच्या दृष्टीने व पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करता पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर रोडवरील गावचे हद्दीतील धबधबे असलेल्या ठिकाणी या ठिकाणी

दि.1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,दि.07 (जिमाका):-   मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत  दि.21 जुलै 2023 ते दि.21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये  नवीन मतदार नोंदणी करणे, मतदार यादीतील नाव, वय, पत्ता इ. दुरुस्ती करणे, मयत स्थलांतरित मतदारांचे नाव वगळणी करणे, मतदारयादीतील वय वर्षे 80 वरील मतदारांची पडताळणी करणे, मतदारयादीतील अस्पष्ट फोटोबाबत कार्यवाही करणे, युवा मतदारांची विशेषत: दि.1 ऑक्टोबर, 2023 व दि.1 जानेवारी 2024 या महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे, महिला, अपंग, तृतीयपंथी यांच्या मतदार नोंदणीमध्ये वाढ होण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करण्यासाठी अधिकाधिक जनजागृती देखील करण्यात येणार आहे. तसेच वोटर हेल्पलाईन ॲप/वोटर सर्व्हिस पोर्टल (Voter Helpline Ap

महाड तालुक्यातील धरण व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी

    अलिबाग,दि.07 (जिमाका):-  महाड तालुक्यातील मौजे मांडले, मौजे केंबुर्ली, मौजे वाकी बु.येथील नानेमाची, मौजे भावे येथे पावसाळयांत नैसर्गिक धबधबे तयार होतात तसेच मौजे कोतुर्डे, मौजे वरंध, मौजे खैरे, मौजे कुर्ले, मौजे खिंडवाडी येथे धरणाची ठिकाणे आहेत. तसेच मौजे सव येथे गरम पाण्याचे झरे असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी पर्यटकांची व नागरिकांची जीवित व वित्तहानी होवू नये, शासकीय व खाजगी मालमत्तेची हानी होवू नये, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येवू नये, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी तसेच कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहावी, यासाठी येथील गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणी, पर्यटकांनी/नागरिकांनी गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्याच्या 1 कि.मी.च्या परिसरात महाड उपविभागीय अधिकारी डॉ.ज्ञानोबा बानापुरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (4) नुसार दि.06 जुलै ते दि.03 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या प्रतिबंधात्मक आदेशानुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधबे, धरण परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे,

स्थानिक बसस्थानकांची स्वच्छता, सौंदर्यीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

  अलिबाग,दि.07 (जिमाका):-  राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि.01 मे 2023 पासून  “ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान ”  राज्यातील 580 बसस्थानकांवर राबविण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार आणि गुणात्मक सेवा देण्याच्या उद्देशाने स्वच्छ बसेस - बसस्थानके, सुंदर बसस्थानक परिसर आणि टापटीप प्रसाधनगृहे या त्रिसूत्रावर आधारित बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण करणे यामध्ये अभिप्रेत आहे. यासाठी राज्यातील सर्व बसस्थानकावर स्वखर्चाने स्वच्छता, सुशोभिकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठी त्या परिसरातील लघु, मध्यम व मोठे उद्योजक, व्यापारी सहकारी संस्था यांच्याकडे स्वारस्य अभिव्यक्ती सूचना मागविण्यात येत आहेत. बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची किरकोळ डागडुजी करणे, विद्युत उपकरणाची दुरुस्ती करून विद्युत दिवे, पंखे इत्यादी अनुषंगिक गोष्टी सुव्यवस्थित करणे. बसस्थानकाच्या मुख्य इमारतींची रंगरंगोटी करणे. बसस्थानकाच्या प्रसाधनगृहांची किरकोळ दुरुस्ती करुन ते स्वच्छ नीटनेटके व निर्जंतूक ठेवण्याच्या दृष्टीने व्यवस्था निर्माण, बसस्थानकाच्या प्रत्येक फलाटावर गावांचे मार्गदर्शक फलक व प्रवाशां

पेण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु

    अलिबाग,दि.07 (जिमाका):-  औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दि.12 जून 2023 पासून सुरू करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी  https://admission.dvet.gov.in/  या संकेतस्थळावर दि.11 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन पेण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात  https://admission.dvet.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जावून आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण 85 व्यवसाय उपलब्ध असून 1 लाख 54 हजार 932 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्य

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 63.01 मि.मी.पावसाची झाली नोंद

  अलिबाग,दि.07 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 63.01 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 47.04 मि.मी., पनवेल- 62.09 मि.मी., कर्जत- 55.04 मि.मी., खालापूर- 56.06, उरण- 57.08 मि.मी., सुधागड- 71.09 मि.मी., पेण- 67.07 मि.मी., महाड- 81.04 मि.मी. माणगाव- 57.00 मि.मी., रोहा- 65.07 मि.मी., पोलादपूर- 68.09 मि.मी, मुरुड- 48.04 मि.मी., श्रीवर्धन- 64.05 मि.मी., म्हसळा- 67.02 मि.मी., तळा- 94.02 मि.मी. 000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 17.27 मि.मी.पावसाची झाली नोंद

  अलिबाग,दि.06(जिमाका) :-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.27 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-33.00 मि.मी., पनवेल-4.04 मि.मी.,कर्जत-3.00 मि.मी., खालापूर-4.00, उरण-4.00 मि.मी., सुधागड-6.00 मि.मी., पेण-20.00 मि.मी., महाड-37.00 मि.मी. माणगाव- 8.00 मि.मी., रोहा- 6.00 मि.मी., पोलादपूर- 29.00 मि.मी, मुरुड- 13.00 मि.मी., श्रीवर्धन- 61.00 मि.मी., म्हसळा-25.00 मि.मी., तळा- 9.00 मि.मी., माथेरान-14.4 मि.मी. 0000000

“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

    अलिबाग,दि.06(जिमाका) :-   “ शासन आपल्या दारी ”  उपक्रमाची रायगड जिल्हा परिषदमार्फत प्रभावी अंमबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळवून देण्यात येत आहेत. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या स्व. ना.ना. पाटील सभागृहात बुधवारी (दि.5जुलै) रोजी प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व बाल कल्याण, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा, ग्रामपंचयत, समाजकल्याण, सामान्य प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, कृषी विभागातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना तालुकास्तरावर प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी इच्छुक खेळाडूंनी नामांकने,प्रस्ताव सादर करावेत

  अलिबाग,दि.06(जिमाका) :-  युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, केंद्र शासनाने दि.23 जून 2023 रोजीच्या पत्रान्वये सन- 2022 मधील तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (TNNAA) वितरित करण्याकरिता नामांकनाचे प्रस्ताव पाठविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.  तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन-2022 करिता केंद्र शासनास शिफारस करण्यासाठी नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षांमधील म्हणजे सन-2020, 2021, 2022 मधील असणे आवश्यक आहे, साहसी उपक्रम हे जमीन, पाणी व हवेमधील असणे आवश्यक आहे, खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट (Outstanding achivements)असणे आवश्यक आहे, याप्रमाणे खेळाडूंची कामगिरी, कागदपत्रे असणे आवश्यक आहे.   तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन-2022 करिता प्राप्‍त होणारी नामांकने, प्रस्ताव दि. 15 जून ते दि.14 जुलै 2023 या कालावधीतच केंद्र शासनाच्या  https://awards.gov.in  या ऑनलाईन पोर्टलवर स्विकारण्यात येणार आहेत. त्यानुसार इच्छुक खेळाडूंनी आपले नामांकन, प्रस्ताव संचालनालयाच्या  dsysdesk१०@gmail.com  या ई-मेलवर पाठविण्यात यावेत, असे सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा सुधीर मो

भारतीय हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी दि.6 जुलै रोजी रेड अलर्टची पूर्वसूचना

  अलिबाग,दि.05(जिमाका):-  भारतीय हवामान विभागाकडून दि. 6 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्टची पूर्वसूचना प्रसारित केली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता  राहील. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरडग्रस्त, पूर प्रवण, खाडीलगत सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पुलावरून पाणी वाहत असल्यास धाडसाने वाहने पाण्यातून चालवू नये. मासेमारीसाठी खाडी, तलाव, समुद्रात जावू नये. दरड प्रवण गावांतील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी आपल्या विभागांच्या यंत्रसामुग्री मनुष्यबळासह तत्पर ठेवाव्यात. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी 02141-222097 टोल फ्री नंबरवर 112/1077 आणि जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी 02141-228473 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ०००००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 31.8 मि.मी.पावसाची झाली नोंद

    अलिबाग,दि.05(जिमाका):-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.8 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-56.00 मि.मी., पनवेल-38.00 मि.मी.,कर्जत-16.4 मि.मी., खालापूर-21.00, उरण-33.00 मि.मी., सुधागड-12.00 मि.मी., पेण-50.00 मि.मी., महाड-23.00 मि.मी. माणगाव- 33.00 मि.मी., रोहा- 19.00 मि.मी., पोलादपूर- 7.00 मि.मी, मुरुड- 56.00 मि.मी., श्रीवर्धन- 41.00 मि.मी., म्हसळा-22.00 मि.मी., तळा- 13.00 मि.मी., माथेरान-36.6 मि.मी. 0000000

मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

    अलिबाग,दि.05(जिमाका):-  सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनीकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह गोंधळपाडा अलिबाग येथे कार्यरत आहे. या वसतिगृहात इ.8 वी पासून गरीब हुशार होतकरू मागासवर्गीय अनुसूचित जाती- 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, विमुक्त जाती भटक्या जमाती -5 टक्के,, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थिनी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग -2 टक्के, अनाथ -2 टक्के, अपंग-3 टक्के यांना गुणवत्ता नुसार प्रवेश दिला जातो.  वसतिगृहात विद्यार्थींनीकरिता मोफत निवास व्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे,शिरा उपीट इ.पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतूमानानुसार एक फळ व दूध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ भात, चपाती भाजी/उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवड्यातून दोन वेळा मांसाहार) देण्यात येते. अभ्यासासाठी लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु 600/- निर्वाह भत्ता दिला जातो.  शालेय व गणवेश पात्र महाविद्यालयीन विद्यार्थींनींना दोन संचाकरिता ग

आधार नोंदणी आणि अद्यतनसाठी शिबिराचे आयोजन करू इच्छिणाऱ्या संस्था, कंपनी, असोसिएशन व्यक्तींना संपर्क साधण्याचे आवाहन

  अलिबाग,दि.05(जिमाका):-  नाशिक, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पोस्ट ऑफिसने आयोजित केलेल्या विशेष शिबिरांद्वारे नागरिकांना आधार नोंदणी आणि अद्यतन (अपडेट) सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र यांनी दिले आहेत.  गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट असोसिएशन, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा इतर कोणत्याही संस्था/व्यक्तींकडून प्राप्त झालेल्या मागणी/ विनंतीवर सेवा प्रदान केली जाईल. गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट असोसिएशन, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा इतर कोणत्याही संस्था/व्यक्तींकडून मागणीनुसार आधार शिबिरे पोस्ट ऑफिसद्वारे आयोजित केली जातील.  जर शिबिरे आयोजित करण्याची मागणी प्राप्त झाली आहे आणि आधार नोंदणी/ अपडेटेशनचे किमान 100 व्यवहार होतील, अशी खात्री दिली आहे, अशी शिबिरे कोणत्याही सोसायटीमध्ये होऊ शकतात. संस्था, कंपनी असोसिएशन अशा शिबिराचे आयोजन करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी शिबिराचे आयोजन प्रस्तावित असलेले ठिकाण संपूर्ण तपशिलासह सहाय्यक संचालक, पोस्टल सेवा, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, नवी मुंबई क्षेत्र, 2 रा मजला, पनवेल मुख्य प

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत लाभ घेण्यास इच्छूक लाभार्थ्यांनी कर्ज प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव सादर करावेत --जिल्हा व्यवस्थापक प्रवीण आहीर

    अलिबाग,दि.05(जिमाका):-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ (एनएसएफडीसी) मुदती कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघुऋण योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले होते. एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्याकडून कर्ज प्रस्तावासाठी निधी प्राप्त झाला आहे. ज्या अर्जदारांनी जिल्हा कार्यालय, रायगड येथे अर्ज केले होते त्यांच्या कर्ज प्रस्तावातील त्रुटींच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेवून कर्जाचे वितरण करावयाचे आहे. तरी ज्या अर्जदारांच्या कर्ज प्रस्तावात त्रुटी असतील त्यांनी त्रुटींची पूर्तता करुन आपले कर्ज प्रस्ताव तात्काळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, रायगड, मधुनील, हाउस नं-15, रायवाडी कॉम्प्लेक्स, रूम नं-105, पारिजात गृहनिर्माण संस्था मर्या.पहिला मजला, श्रीबाग नं.2, चेंढरे, ता.अलिबाग या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 63 मि.मी.पावसाची झाली नोंद

अलिबाग,दि.04 (जिमाका) :-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 63.48 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-54.00 मि.मी., पनवेल-21.6 मि.मी.,कर्जत-29.4 मि.मी., खालापूर-43.00, उरण-26.00 मि.मी., सुधागड-115.00 मि.मी., पेण-90.00 मि.मी., महाड-45.00 मि.मी. माणगाव- 91.00 मि.मी., रोहा- 60.00 मि.मी., पोलादपूर- 72.00 मि.मी, मुरुड- 84.00 मि.मी., श्रीवर्धन- 80.00 मि.मी., म्हसळा-84.00 मि.मी., तळा- 49.00 मि.मी. 0000000

सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी पुष्पहार अर्पण करुन केले अभिवादन

Image
    अलिबाग,दि.04 (जिमाका) :-  गज फाऊंडेशन आणि अलिबाग नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या 294 व्या पुण्यतिथीनिमित्त आंग्रे स्मारक परिसर, अलिबाग येथे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.                यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे, पश्चिमी नौसेना कमांडर मुख्यालय, भा.नौ.पो.आंग्रे चे कमांडिंग ऑफिसर कंमाडर श्री.आदित्य हाडा, कंमाडर श्री.प्रशांत गोजर, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000000

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी स्थानिक सुट्टया केल्या जाहीर

  अलिबाग,दि.04 (जिमाका) :-  रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व कार्यालयांकरिता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार दि.1 मार्च 2023  च्या अधिसूचनेद्वारे 3 स्थानिक सुट्टयापैकी 1 स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने या अधिसूचनेद्वारे सन-2023 या वर्षाकरिता बुधवार, दि.30 ऑगस्ट 2023, नारळी पोर्णिमा/रक्षाबंधन व गुरुवार, दि.7 सप्टेंबर 2023 रोजी गोपाळकाला या 2 स्थानिक सुट्टया जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जाहीर केल्या आहेत. ००००००००

शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात मिळणार पिक विमा ई-पीक ॲपव्दारे पिकांच्या नोंदी 7/12 वर करण्याचे आवाहन

  अलिबाग,दि.04 (जिमाका) :-  जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना Cup & Cap Model (80:110) नुसार खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपव्दारे आपल्या पिकांची नोंदी 7/12 उताऱ्यावर करुन घ्यावी, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.     योजनेची उद्दिष्टे :-  नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.     योजनेची वैशिष्टे :-  कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के. रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के