Posts

Showing posts from November 20, 2022

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधने अनुदान योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत

  अलिबाग, दि.25 (जिमाका):-  अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरविण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत रु.3 लक्ष 50 हजार एवढे अनुदान मंजूर करण्यात येत असून त्यापैकी 90% हिस्सा शासनाचा असतो व उर्वरित 10% हिस्सा हा बचतगटांचा आहे. इच्छुक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचतगटातील सदस्यांनी या योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. बचतगटांनी 10% रक्कम भरल्यानंतर रु.3 लाख 15 हजार ही रक्कम बचतगटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. स्वयंसहाय्यता बचतगटांना किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची किंमत कमाल शासकीय अनुदानापेक्षा (रु.3.15 लाख) जास्त असल्यास कमाल अनुज्ञेय अनुदानाव्यतिरिक्त जादाची रक्कम बचतगटांना स्वतः खर्च करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचतगटातील सदस्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलि

दि.26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत “सामाजिक न्याय पर्व” कार्यक्रमाचे आयोजन -सहाय्यक आयुक्त सुनील जाधव

  अलिबाग, दि.25 (जिमाका):-  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालय येथे शनिवार, दि.26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत  “ सामाजिक न्याय पर्व ”  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी दिली आहे. शनिवार, दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करुन, संविधान वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते हिराकोट तलाव या मार्गावरून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांमार्फत महाड येथील चवदार तळे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच समाज कल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमांवर आधारित यशोगाथा पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. जिल्ह्यातील समतादूतमार्फत विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत प्रचार-प्रसार केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता संवाद उपक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जिल्हा जात पडताळणी समिती

"संविधान दिनी” पर्यटन संचालनालयामार्फत “चवदार तळे” महाड येथे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट” शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन

“ टूर सर्किटची सुवर्णसंधी ”     अलिबाग, दि.25 (जिमाका):-  दरवर्षी दि.26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी संविधान दिवसाचे औचित्य साधून पर्यटन विभागाच्या सूचनेनुसार पर्यटन संचालनालयाद्वारे  “ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट ”  मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या विभागनिहाय तयार करण्यात आली आहेत. या टूर सर्किटच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत स्थळे व बुध्दिस्ट स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. या दूर सर्किटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे शनिवार, दि.26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील   “ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट ”  चा औपचारिक शुभारंभ कार्यक्रम चवदार तळे, महाड येथे पर्यटन संचालनालय, कोकण विभाग, नवी मुंबई आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या टूर सर्किटच्या माहितीपत्रकाचा औपचारिक प्रकाशन समारंभ स्

कृषी औजारे बँक घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट/नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत

             अलिबाग, दि.25 (जिमाका):-  कोकण विभागात कृषी क्षेत्राकरिता कृषी यांत्रिकीकरण हे फार महत्वाचे आहे. दिवसेंदिवस शेतीकामाकरिता मजूरांची कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरण, नागरीकरण तसेच  इत्यादीमुळे कृषी क्षेत्रात मजूर उपलब्ध होत नाहीत तसेच मजुरांचे दर परवडत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रात कृषी औजारे आणि यंत्रे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. विभागात भात हे प्रमुख पिक असून चिखलणी, उखळणी, लागवड, फवारणी, काढणी सह सर्व प्रकारच्या कामाकरिता यंत्र उपलब्ध आहेत. कोकणातील धारणा क्षेत्र कमी असल्याने वैयक्तिक यंत्रे खरेदी करण्यास मर्यादा आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता  कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कृषी अवजारे बँक स्थापनेकरिता शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते. जिल्ह्यातील पीक रचनेनुसार पिकाच्या पेरणी पासून काढणी पश्चात प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफक दराने यांत्रिकीकरणाची सेवा सुविधा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे तसेच लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण

ऐतिहासिक स्थळांचा, स्मारकांचा वारसा टिकविण्याची जबाबदारी सर्वांची - अपर जिल्हाधिकारी अमोल यादव

Image
अलिबाग, दि.24 (जिमाका):-  आपल्या जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वारसा असलेली स्मारके, विविध स्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा, स्मारकांचा वारसा टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी नुकतेच घारापूरी-एलिफंटा येथे केले. जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून दि.19 ते दि.25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नुकतेच एलिफंटा लेणी (जागतिक वारसा स्थळ), घारापुरी येथे या सप्ताहाच्या उद्घाटनपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, मुंबई सर्कल डॉ.राजेंद्र यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.अनिता राणे-कोठारे, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, एलिफंटाचे सरपंच बळीराम ठाकूर, माजी सरपंच राजेंद्र पडते यांची प्रमुख उपस्थिती होती. अपर जिल्हाधिकारी अमोल यादव पुढे म्हणाले की, दि.19 ते 25 नोव

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा परिषद येथे क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप

Image
अलिबाग, दि.24 (जिमाका):-  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांच्या हस्ते नुकतेच रायगड जिल्हा परिषद येथे निक्षय मित्रांकडून क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. निक्षय मित्र श्रीमती रेश्मा म्हात्रे (आरोग्य सेविका) व झिराड आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी संग्राम पाटोळे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना दोन महिन्यांच्या पोषण आहाराचे वाटप केले. यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मोरे म्हणाले की, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील सर्व कॉर्पोरेट क्षेत्र, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सरपंच, सर्व संघटना व विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष, सचिव यांना निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना पोषण आहार किंवा व्यवसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी आवाहन केले आहे. रायगड जिल्ह्यात 2 हजार 803 क्षयरुग्णांना निक्षय मित्रांची आवश्यकता आहे. क्षयरुग्ण झालेल्या रुग्णांना आजही क्षयरोगाविषयीच्या गैरसमजुतींमुळे समाजात योग्य वागणूक मिळत नाही, रोजगार मिळत नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. यामुळे क्षयरोगी व्यक्त

उसर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कामगारांची जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या सहकार्याने सर्वरोग आरोग्य तपासणी संपन्न

Image
अलिबाग, दि.24 (जिमाका):-  जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या सहकार्याने उसर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीतील कामगारांकरिता नुकतेच क्षयरोग तपासणी व एक्स-रे तपासणी शिबीर संपन्न झाले. उसर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या आवारातील प्रशिक्षण सभागृहात 101 कामगारांची सर्वरोग आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणीत कामगारांची मधुमेह, रक्तदाब, रक्त व क्षयरोग तपासणी करण्यात आली. यावेळी 60 जणांचे मोफत एक्स-रे करण्यात आले तर 90 जणांचे थुंकी नमुने घेवून ते अलिबाग येथील लॅबमध्ये तपासणीसाठी आणण्यात आले आहेत. यावेळी कंपनीचे सुरक्षा अधिकारी उत्सवकुमार सिंग म्हणाले की, कामगारांचे आरोग्य चांगले असेल तरच ते कंपनीत चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्यासाठी त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक असते. ही तपासणीची सुविधा आम्हाला जिल्हा क्षयरोग कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. या कार्यालयाने कामगारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य केले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श शाळा टप्पा-2 करिता शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी जिल्हा परिषद शाळांना दिली भेट

Image
अलिबाग, दि.24 (जिमाका):-  शिक्षण ही समाजात निरंतर चालणारी उद्दिष्टपूर्ण प्रक्रिया आहे.  “ दर्जेदार शिक्षण ”  या ध्येयाने भरीव कामगिरी केल्यास निश्चितपणे देशाच्या विकासावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या (VSTF) माध्यमातून आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 व गुणवत्तापूर्ण शिक्षण निधीतून आदर्श शाळा निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरण स्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण, आनंदाची शिक्षण इत्यादी उद्दिष्टांवर कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अक्षय पाटील, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी रत्नशेखर गजभिये तसेच अन्य सदस्यांनी अलिबाग तालुक्यातील खानाव तसेच मुरूड येथील नांदगाव व चोरढे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली.      यावेळी संबंधित तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच ग्र

विशेष लेख: मरावे परी देहरुपी उरावे..! ; अवयवदान करा.. अवयवदान करा..!

Image
  अवयवदान म्हणजे काय? जिवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदान श्रेष्ठदान असून ज्याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अंतिम स्वरूपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.  ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे. अवयवदान प्रत्यारोपण प्रतिरूप म्हणजे काय? मानवी अवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धी आहे. या उपचारात एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करून तो एखाद्या गरजवंत रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करतात. ज्यांचा एखादा अवयव कायमस्वरूपी निकामी झाला आहे, अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित व उपलब्ध अशी उपचार पद्धती आहे. आपण कोणत्या अवयवांचे दान करू शकतो? • मेंदू स्तंभ मृत्यू (Brain Death): मृत व्यक्तीची हृदयक्रिया चालू आहे पण तिचा मृत्यू झाला आहे, अशी व्यक्ती बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे डम यांचेदेखील दान क

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जवाहर नवोदय विद्यालय नियोजन व सल्लागार समितीची बैठक संपन्न

Image
अलिबाग, दि.22 (जिमाका):-  जवाहर नवोदय विद्यालय, रायगड यांची विद्यालय नियोजन समिती (Vidyalaya Administration Committee) आणि विद्यालय सल्लागार समिती (Vidyalaya Advisory committee) यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दि.21 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व विद्यालयाच्या वतीने प्राचार्य किरण इंगळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्स्ना शिंदे, उपप्राचार्य शिरीष जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी डॉ.रवींद्र रोकडे, नवोदय विद्यालयाचे कार्यालय अधीक्षक नितीन बुधगे, शैलेश पडवळ, गणेश अडोडे, श्री.कडू, लोकसभा खासदार सुनिल तटकरे यांचे प्रतिनिधी तुकाराम सुतार, शिक्षक पालक संघटनेचे सदस्य नितीन बडे हे उपस्थित होते. या बैठकीत विद्यालयाकरिता सांस्कृतिक सभागृह, सोलार लाईट योजना, विद्यालयातील आपातकालीन स्थितीसाठी वाहन व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय चाचण्या आणि वैद्यकीय शिबिर, विद्यालयाचे लँडस्केपिंग, विद्यालयाच्या मैदानांची दुरुस्ती इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर

जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध उपक्रम संपन्न

  अलिबाग, दि.22 (जिमाका):-  रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. अलिबाग तालुक्यातील सहाण ग्रामपंचायतीला रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी भेट दिली. यावेळी उपसरपंच सौंदर्या पोईलकर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल पाटील, ग्रामसेविका सोनाली नाईक व ग्रामपंचायत सदस्य नरेश वर्तक, ग्रामपंचायत सदस्या निवेदिता पाटील व विद्या मगर आदी उपस्थित होते. ग्रामसेविका सोनाली नाईक यांनी गावातील स्वच्छताविषयक कामांची माहिती दिली. यावेळी काही ग्रामस्थांच्या घरातील वैयक्तिक शौचालयांना भेटी देऊन त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले म्हणाल्या की, स्वच्छ भारत अभियानामुळे गावांचा चेहरा मोहरा बदलला आहे. स्वच्छतेमुळे गावामध्ये लोकांचे जीवनमान बदलले आहे तसेच आर्थिक, पर्यावरणीय आरोग्यमान देखील उंचावले आहे. गावात नियमित स्वच्छता राहावी, म्हणून आता सर्व ग्राम ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदीसाठी प्राधान्य द्यावे. शौचाल

भारतीय मानकांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यशाळा संपन्न

  अलिबाग, दि.22 (जिमाका):-  भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 अन्वये भारतीय मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या क्षमतावर्धन तसेच केंद्र शासनामार्फत गुणवत्तेबाबत निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी इ. संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दि.21 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात भारतीय मानक ब्युरोचे वैज्ञानिक टी.अर्जन व आशिष वाकले यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना भारतीय मानक ब्युरो संदर्भात प्रशिक्षण दिले. तसेच रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाव्यतिरिक्त सर्व शासकीय कार्यालयांना यावेळी ऑनलाईन पध्दतीने सहभागी करुन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास रायगड जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी

“चला जाणूया नदीला” उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी कटिबद्ध होवू या..! -अपर जिल्हाधिकारी अमोल यादव

Image
अलिबाग, दि.22 (जिमाका):-  “ जल है तो कल है ”  या उक्तीतच पाण्याचे महत्व स्पष्ट होते. सुप्रसिद्ध गीतकार ग.दि.माडगूळकर यांनीही त्यांच्या  “ संथ वाहते कृष्णामाई.. ”  या गीताद्वारे पाण्याचे महत्व विषद केले आहे. त्यामुळे आपल्या व आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आपण सर्वांनी  “ चला जाणूया नदीला ”  या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी कटिबद्ध होवू या, प्रत्येकाने आपापल्या परीने शक्य तितके योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी आज येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत  “ चला जाणूया नदीला ”  हा उपक्रम जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविला जात आहे. याबाबतची कार्यशाळा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री.यादव बोलत होते. यावेळी अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, जलसंपदा विभागाच्या प्रभारी