Posts

Showing posts from November 12, 2017

युथ हॉस्टेल आयोजित 26 वी राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहीम रा.जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांचे सहभागाकरीता आवाहन रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी सहभागी होणार

Image
        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पूनीत झालेल्या आणि हिन्दवी स्वराज्याच्या राजधानीच्या दूर्गराज रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्याचे स्फूलींग चेतविण्याकरीता युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन रविवार दि. 24 डिसेंबर 2017 रोजी करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेच्या सहभाग आवाहनपत्नचे प्रकाशन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखेचे कार्याध्यक्ष व गिर्यारोहक रमेश केणी यांच्या हस्ते गुरूवारी रायगड जिल्हा परिषदेत करण्यात आले. पंतप्रधान मोदि यांच्या कडून रायगडची संवर्धन व विकासाकरिता सर्वप्रथम निवड              देशातील ऐतिहासीक गडकिल्ले ही तरण पिढीची स्फूर्तीस्थाने करणो आणि गतवैभवाच्या या ऐतिहासिक साक्षीदारांचे सवर्धन आणि विकास करण्याची योजना पंतप्रधान नरेद्र

रायगड जिल्हयातील माजी सैनिकांना रोजगाराची संधी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- रायगड जिल्हयातील सर्व माजी सैनिकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी पुर्नवास महानिदेशक, नवी दिल्ली यांचे मार्फत डी जी आर रोजगार सेमिनार दिनांक 25 नोव्हेंबर 2017 रोजी गॅरीजन बटालीयन ग्राउड, आएनएस अश्वनीच्या समोर, कुलाबा मिलीटरी स्टेशन, कुलाबा, मुंबई येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.   तरी माजी सैनिकांनी आपल्या कागदपत्रासह गॅरीजन बटालीयन ग्राउड, आएनएस अश्वनीच्या समोर, कुलाबा मिलीटरी स्टेशन, कुलाबा, मुंबई या ठिकाणी   मेळाव्यास उपस्थीत राहुन रोजगाराच्या संधीचा लाभ   घ्यावा. असे आवाहन मेजर प्रांजळ. पी. जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 0000

खेळामुळे बुध्दिमत्तेबरोबर शरीरस्वास्थ चांगले राहते -राजेंद्र पवार

Image
           अलिबाग दि. 18 (जिमाका रायगड विशेष वृत्त) -  खेळामुळे बुध्दिमत्तेबरोबर शरिरस्वास्थ चांगले राहत असल्याचे प्रतिपादन शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी आज येथे केले. ते जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी बोलत होते. यावेळी  उदघाटन समारंभास  रायगडचे अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, मुंबई विभागाचे क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे , महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन चे सचिव मिलींद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते व राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रविण बोरसे, रायगड जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच सुभाष पाटील हे उपस्थित होते.             यावेळी मार्गदर्शन करतांना पवार म्हणाले की, विध्यार्थ्यानी शालेय शिक्षणाबरोबर खेळाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. खेळामुळे जरी विध्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होत असल्यामुळे इयत्ता 10 वी व 12 मध्ये खेळाचे जादा गुण देण्यात येतात. शासनाने 2020 मध्ये होणा-या ऑलिंपीक स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी पदके मिळविण्याच

पेण येथे शनिवारी रोजगार मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व डॉ.पतंगराव कदम आर्टस अँड कॉमर्स कॉलेज पेण यांच्या संयुक्त विद्यमाने  डॉ.पतंगराव कदम आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज पेण कोर्टाजवळ, पेण येथे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.             यासंदर्भात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. त्यांना 8वी, 10वी, 12 वी, पदवी, पदवीधर, आयटीआय, फिटर, सी.एन.सी प्रोग्रॅमिंग, मशिनिस्ट, डिप्लोमा इन सी.एन.सी प्रोग्रॅमिंग बी.एस.सी. केमेस्ट्री अशा उमेदवारांची आवश्यकता आहे. या मेळाव्यात मुलाखतीस येतांना  उमेदवाराने स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतीसह डॉ.पतंगराव कदम आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज पेण, कोर्टाजवळ,ता. पेण जि.रायगड येथे  उपस्थित रहावे. मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारां

आंतरशालेय ब्रँड स्पर्धेचे आयोजन : 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 16 :- शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने आंतरशालेय ब्रँड स्पर्धा सन 2018 चे आयोजन करण्यात येत आहे. शालेय मुलांच्यामध्ये एकात्मतेची भावना, प्रगल्भता, कृती, धैर्य, देशभक्ती इ.गुण शालेय मुलांच्यामध्ये वृद्धिंगत होण्यासाठी राज्य, विभाग, राष्ट्रीय अशा तीन स्तरामधून या स्पर्धांचा यात समावेश आहे.             संपूर्ण भारतातून मध्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर  व उत्तर पूर्व  या सहा विभागातून मुले व मुली प्रत्येकी एक संघ याप्रमाणे प्रत्येक विभागातून राष्ट्रीय ब्रँड स्पर्धेसाठी  संघाची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजयी संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय  अनुक्रमे रु.वीस हजार, पंधरा हजार,  दहा हजार इतक्या रोख रक्कमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. ब्रँड स्पर्धेसाठी दि. 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असून अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहूली संगम ता.अलिबाग जि.रायगड येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्री.महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांनी केले आहे. 00000

सन २०१७-१८ : जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन

       अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 16 :- राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने दरवर्षी १२ ते १९ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते . त्यानुसार जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा संघ विभागस्तरावर व विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचा संघ राज्यस्तरावर सहभागी के ला जा तो . युवा महोत्सवासाठी १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक / युवती सहभाग घेऊ शकतात . जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २४ नोव्हेंबर , २०१७ रोजी सकाळी ९.०० वा. जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग , जि . रायगड येथे करण्याचे आयोजन समितीच्यावतीने निश्चित केलेले असून युवा महोत्सवामध्ये आयोजीत करण्यात येणा - या बाबी व सहभागी होण्यासाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे - जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन स्पर्धात्मक व अस्पर्धात्मक पद्धतीने केले जाणार आहे स्पर्धात्मक बाबी :- कलाप्रकार, कलाकार संख्या, वेळमर्यादा मिनीटांमध्ये- पुढीलप्रमाणे- लोकनृत्य-२०, १५. लोकगीत-०६, ०७, एकांकीका ( इंग्रजी , हिंदी )