सन २०१७-१८ : जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन


       अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने दरवर्षी १२ ते १९ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा संघ विभागस्तरावर विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचा संघ राज्यस्तरावर सहभागी केला जातो. युवा महोत्सवासाठी १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक / युवती सहभाग घेऊ शकतात. जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २४ नोव्हेंबर, २०१७ रोजी सकाळी ९.०० वा. जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग, जि.रायगड येथे करण्याचे आयोजन समितीच्यावतीने निश्चित केलेले असून युवा महोत्सवामध्ये आयोजीत करण्यात येणा-या बाबी सहभागी होण्यासाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे -
जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन स्पर्धात्मक अस्पर्धात्मक पद्धतीने केले जाणार आहे
स्पर्धात्मक बाबी :- कलाप्रकार, कलाकार संख्या, वेळमर्यादा मिनीटांमध्ये- पुढीलप्रमाणे- लोकनृत्य-२०,
१५. लोकगीत-०६, ०७, एकांकीका (इंग्रजी, हिंदी)- १२ तर ४५ मिनिटांमध्ये - शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी )- ०१, १५,


शास्त्रीय नृत्य
            भरतनाट्यम, कथक, मणिपुरी, ओडिसी, कुचिपुडी- प्रत्येकी १, प्रत्येकी १५ , वक्तृत्व-०१, ०४, शास्त्रीय वाद्य- बासरी-०१-१५ सितार-१-१५, तबला-०१, १०, वीणा-०१, १५,मृदुंग-०१, १० ,, हार्मोनियम- ०१, १० (लाईट), गिटार, ०१, १०
अस्पर्धात्मक :-  
            राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम जिल्हास्तरावर आयोजित केला जाईल. मात्र राष्ट्रीय युवा महोत्सवातील बाबींसाठी राज्याचा प्रातिनिधीक संघ पाठविण्यात येईल,अस्पर्धात्मक दोन कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येतील.
युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेचे निकष खालील प्रमाणे-
सहभागी युवा १५ ते २९ वयोगटातील असावा.,ज्या बाबींना साथसंगत आवश्यक आहे त्या कलाकारांना वयोमर्यादा लागु नाही.,एकांकिकेमध्ये सहभागी होणारे सर्व युवा कलाकार तसेच एकांकिका लेखक, निर्माता, दिग्दर्शकसुद्धा १५ ते २९ वयोगटातील असणे आवश्यक राहिल.,सहभागी होणारा युवा हा रायगड जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे.,ओडीसी, भरतनाट्यम, मणिपुरी, कथ्थक, कुचीपुडी नृत्य सादर करणा-या कलाकारांना पुर्वमुद्रीत ध्वनीफीतीवर  (कॅसेट,सीडी) कार्यक्रम सादर करता येईल. लोकगीत व लोकनृत्य या प्रकारातील गीते चित्रपट बाह्य असावीत. लोकनृत्य प्रकारा करीता टेप अथवा कॅसेटसाठी परवानगी दिली जाणार नाही. कलाकारांनी आवश्यक असणारे साहित्य स्वत:च्या जबाबदारीवर आणावे उदा.मेकअप किट इ.,संयोजकामार्फत फक्त स्टेज, विद्युत व्यवस्था पुर्व कल्पना दिल्यानंतर त्याप्रमाणे उपलब्ध करून मिळेल. इलेक्ट्रॉनिक वाद्य स्पर्धात्मक प्रकारांमध्ये वापरण्यास परवानगी नाही. शास्त्रीय गायनामध्ये चित्रपटातील गीतास परवानगी दिली जाणार नाही.  वक्तृत्व स्पर्धांसाठी चिठ्ठी काढून जो विषय मिळेल त्या विषयावर बोलणे आवश्यक आहे. युवा महोत्सवादरम्यान तक्रार निवारणाकरिता त्रिसदस्यीय तक्रार निवारण समिती असेल, सदर समितीचा निर्णय अंतिम राहील. युवा महोत्सवातील कार्यक्रमामध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजन समितीने राखून ठेवले आहेत.
कलाकाराचे वय हे दि. 12 जानेवारी, 2018 रोजीपर्यंत 15 ते 29 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने स्पर्धेस येतांना सोबत जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड पैकी एकाची साक्षांकित  प्रत आणणे आवश्यक आहे.
चालू वर्षामध्ये आयोजित केल्या जाणा-या युवा महोत्सवात सहभागी होऊन प्राविण्य मिळविणा-या युवांना शासनाच्यावतीने प्राविण्य प्रमाणपत्र,चषक प्रदान करण्यात येणार आहेत.     
 तरी जिल्ह्यातील प्रतिभावंत कलाकार, संगीत विद्यालय, महाविद्यालये, सांस्कृतिक मंडळे, नामांकीत कलाकार, संस्था यांनी महोत्सवात सहभागी व्हावे जेणे करून उत्कृष्ठ कलाकारांना विभागस्तर, राज्यस्तर राष्ट्रीय पातळीवर  चमकदार कामगिरी दाखविण्याची संधी उपलब्ध होईल.
स्पर्धेची प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर, 2017 असून विहीत नमुन्यातील प्रवेशिका बाबनिहाय सादर करावी. विहीत नमुन्यातील प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, ता.अलिबाग, जि.रायगड. संपर्क क्रमांक  श्री.विशाल बोडके, क्रीडा अधिकारी ९८९०९१९२९७ यांचेशी व नेहरू युवा केंद्र,अलिबाग,रायगड ९४२०६४५८३० येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्री.महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक