Posts

Showing posts from September 16, 2018

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.21 , बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे दि. 23 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. रविवार दि.23 रोजी दुपारी पावणे एक वाजता कर्जत येथे आगमन.   पावणे दोन वाजता आयुषमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे जिल्हास्तरीय उद्घाटन व लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप कार्यक्रम. स्थळ : डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ अंतर्गत कर्जत कृषी संशोधन केंद्र हॉल कर्जत.   सव्वा दोन वाजता कर्जत येथून   मोटारीने मुंबईकडे प्रयाण.   0000000

जाणून घ्या…. कुष्ठरोग! पूर्ण उपचार… रोगमुक्ती हमखास

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत ‘कुष्ठरोग शोध अभियान-2018-19’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने कुष्ठरोग जाणून घेणे आवश्यक आहे. या आजाराबद्दल खुपच गैरसमज आहेत. त्यामुळे या आजाराबद्दल उघडपणे बोलणेही टाळले जाते. प्रत्यक्षात नियमित औषधोपचाराने बऱ्या होणाऱ्या या आजाराबद्दल खुलेपणाने बोलले गेले पाहिजे. जिल्ह्यात येत्या सोमवार (24 सप्टेंबर) पासून कुष्ठरोग शोध अभियान सुरु होत आहे.   यानिमित्त विशेष लेख-   इतिहास- कुष्ठरोग किंवा महारोग म्हणून ओळखला जाणारा हा आजार मानवाला माहित असलेला पुरातन आजार आहे. आयुर्वेद ग्रंथात आणि पुराणांमध्ये अनेकदा या आजाराचा उल्लेख आढळतो. एकदा हा आजार झाला म्हणजे त्यामुळे येणारी विकृती व विद्रुपता यामुळे अशा व्यक्तींना सामाजिक बहिष्कार आणि तिरस्काराला सामोरे जावे लागले. त्यामुळे या आजाराबद्दल गैरसमज निर्माण झाले.शिवाय त्याचा संबंध थेट पाप पुण्य या संकल्पनेशी जोडला गेला. प्रत्यक्षात कुष्ठरोग हा आजार हा जंतूंमुळे होणारा आजार आहे हे 1873 पर्यंत मानवास माहितीच नव्हते. नॉर्वे मध

नारी शक्ती पुरस्कारासाठी 29 पर्यंत अर्ज मागविले

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.20 सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे,अशा महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या नावे पाच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात.   महिलांसाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार, कांगी पुरस्कार, माता जिजाबाई पुरस्कार, राणी गार्डीनलो झेलिंग पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार तसेच राणी रुद्रमादेवी पुरस्कार (हा स्त्री व पुरुष या दोघांना देण्यात येतो) देण्यात येतात.   हे सर्व पुरस्कार केंद्र शासनामार्फत देण्यात येतात.   या पुरस्कारचे नाव नारी शक्ती पुरस्कार असून एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.   हा पुरस्कार 8 मार्च या जागतिक महिला दिनी केंद्र शासनातर्फे दिला जातो. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याकरिता आवश्यक कार्य व पात्रता पुढीलप्रमाणे आहेत.   विधवा, परितक्त्या, निराधार, अपंग महिलांचे पुनर्वसन करणे अशा कार्यात ज्या महिलांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केले आहेत त्या महिला.   शैक्षणिक प्रशिक्षण कार्य, पर्यावरण क्षेत्र, महिला स्वावलंबन या क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे. तसेच श

सोमवारपासून कुष्ठरोग शोध अभियानास सुरुवात

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.20 केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत ‘कुष्ठरोग शोध अभियान-2018-19’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत करावयाच्या कामकाजाबाबतचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.   यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर आदि उपस्थित होते.   यावेळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ.प्राची नेहुलकर यांनी सादरीकरणाद्वारे   माहिती दिली.    यावेळी मोहिमेची दि.24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीतली रुपरेषा सांगितली.   या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.   तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.   या अभियानात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल.   असे होणार सर्वेक्षण व तपासणी जिल्ह्यातील ग्रामिण भागात व शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करुन प्रत्येक घरातील सर्व सभासदांची तपासणी करण्यात येईल.   एका पथकात एक पुरुष व एक

भात पिकः किड नियंत्रण; कापणी व कापणी पश्चात व्यवस्थापन

        सध्या भात पीक पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहे. पावसाची उघडीप असल्याने उपलब्धते नुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी . वाढते ऊ न व आद्रतेचे प्रमाण यामुळे वरकस व उतार जमीनित हळव्या जातीच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने लष्करी अळी आ ढळल्यास दिलेल्या शिफारसीप्रमाणे फवारणी करावी . तसेच    भातावर किंवा भाजीपाला व इतर पीकावर फवारणी करताना वि शेष काळजी घ्यावी .          लष्करी अळी :   या किडीच्या अळ्या दिवसा पानाच्या फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्री पाने खातात . पाने कडेपासून मध्यशिरेपर्यंत खात जात असल्यामुळे नुकसानीवरून कीड चटकन ओळखून येते . किडीचा खरा उपद्रव मात्र पीक काढणीच्यावेळी होतो . या किडीच्या अळ्या लोंब्या कुरतडतात , त्यामुळे दाणे जमिनीवर गळून नुकसान होते .         नियंत्रणाचे उपाय :- पीक तयार होताच कापणी करावी , सकाळी किंवा संध्याकाळी चुडांचे निरीक्षण करावे 4 ते 5 अळ्या प्रती चौ.मि आढळताच संध्याकाळच्या सुमारास डायक्लोरोव्हॉस 76 WSP 1.3 मीली प्रती लिटर पाण्यातुन चुडाच्या बुंध्यावर पड