Posts

Showing posts from July 19, 2020

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8 मि.मि.पावसाची नोंद

             अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.98 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1415.18 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 13.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-5.00 मि.मि., पनवेल-1.40 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-3.60 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-6.00 मि.मि., रोहा-21.40 मि.मि., सुधागड-4.00 मि.मि., तळा-11.00 मि.मि., महाड-20.00 मि.मि., पोलादपूर-24.00, म्हसळा-7.00मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-3.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 143.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 8.98 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 44.00 टक्के इतकी आहे. 00000

सर्वसामान्यांच्या कोविड उपचाराकरिता कोविड केअर सेंटर उपयुक्त ठरणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न

Image
अलिबाग,जि.रायगड, दि.25 (जिमाका) : रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, संचालक हितलभाई मेसवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात 50 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांच्या कोविड उपचाराकरिता उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.           नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन संकुलात रिलायन्स इंडस्ट्रीजने उभारलेल्या   50 बेडची   क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या   ई-उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.               यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, नागोठणे रिलायन्स मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे,एचआर हेड चेतन वाळंज हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, आमदार रविशेठ पाटील,आमदार   अनिकेत तटकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवं

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

अलिबाग,जि.रायगड दि.25 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी.,    अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 4.05 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-1.90 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.30 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-42.90 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.00 मी. इतकी आहे.

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद

             अलिबाग,जि.रायगड दि.25 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.63 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1406.21 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 19.00 मि.मि., पेण-7.00 मि.मि., मुरुड-9.00 मि.मि., पनवेल-1.00 मि.मि., उरण-6.00 मि.मि., कर्जत-4.40 मि.मि., खालापूर-3.00 मि.मि., माणगांव-3.00 मि.मि., रोहा-2.30 मि.मि., सुधागड-30.00 मि.मि., तळा-1.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-29.00, म्हसळा-7.00मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-5.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 154.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.63 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 43.72 टक्के इतकी आहे. 00000

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.             रविवार दि.26 जुलै, 2020 दुपारी 2.30 वा. मंडणगड जि.रत्नागिरी येथून मोटारीने महाड, जि.रायगडकडे प्रयाण. दु.3.00 वा. महाराष्ट्र राज्य उद्योग विकास महामंडळाचे शासकीय विश्रामगृह, महाड येथे आगमन व राखीव. दु.3.15 ते 4.15 वा.के.एस.एफ.कॉलनी महाड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे प्रस्तावित कोविड केअर सेंटरची पाहणी.   सायं.5.15 वा. उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे कोविड केअर सेंटरची पाहणी. सोयीनुसार सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.             सोमवार दि.27 जुलै 2020 रोजी सकाळी 11.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून नागोठणेकडे रवाना. स.11.45 वा. नागोठणे येथील प्रस्तावित रिलायन्स कोविड केअर सेंटरला भेट. दुपारी 2.00 वा. मु.डिकसळ ता.कर्जत येथे आगमन व प्रस्तावित डेडिकेटेड कोविड-19 हेल्थ सेंटरची पाहणी व अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. सोयीनुसार मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात उभारलेल्या 100 बेड मर्यादेच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन शनिवार, दि. 25 जुलै 2020 रोजी दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.   पालकमंत्री कु.आदिती तटकरे या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्या या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित राहणार असून जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, आमदार भरत गोगावले, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.अभय ससाणे तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अधिकारी हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या कोविड केअर सेंटर मध्ये 100 बेडची क्षमता असून कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक जागा भारतीय एज्युकेशनने पुरविली असून रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आवश्यक सोयी-सुविधांनुसार अद्ययावत वैद्यकीय सामुग्री, निष्णात डॉक्टर्स, इतर सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.   येथील संपूर्ण कार्यवाही ही शासकीय नियमानुसार होणार असून हे सेंटर पूर्ण

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व इतर कामकाज 27 जुलै पासून होणार सुरु

अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी रायगड व उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पेण यांनी दि.15 ते 26 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती कामकाज, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज व इतर कामकाज स्थगित करण्यात आले होते.   मात्र आता दि. 26 जुलै 2020 रोजी लॉकडाऊन संपत असल्यामुळे   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथील शिबीर कार्यालयातील कामे वगळता अनुज्ञप्ती जारी करणे, दुय्यम अनुज्ञप्ती देणे, अनुज्ञप्ती नुतनीकरण, पत्ता बदल, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे सुरु करण्यात करण्यात येणार आहेत. या सर्व कामकाजाकरिता आगाऊ वेळ निर्धारण प्रणालीवर (अपॉईटमेंट) निर्धारित करणे आवश्यक राहील.   शिकाऊ अनुज्ञप्ती व ड्रायव्हिंग टेस्टसाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्क व हॅण्डग्लोव्हज घातलेले असतील त

रायगडच्या जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.किरण पाटील रुजू

अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ.किरण पाटील यांची रायगड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदलीने नवनियुक्ती झाली असून त्यांनी आज शुक्रवार दि.24 जुलै 2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.   तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हा परिषद, रायगड कार्यालयाने केले आहे. 00000

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी.,    अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 3.75 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-2.00 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.30 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-42.90 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.00 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7 मि.मि.पावसाची नोंद

             अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.06 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1396.58 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 51.00 मि.मि., पेण-9.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-8.80 मि.मि., उरण-8.00 मि.मि., कर्जत-2.00 मि.मि., खालापूर-12.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-2.00, म्हसळा-6.00मि.मि., श्रीवर्धन-1.00 मि.मि., माथेरान-7.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 113.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 7.06 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 43.42 टक्के इतकी आहे. 00000

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीला यश मंत्रिमंडळ बैठकीत सुपारी आणि नारळ प्रति झाडांसाठी मदत देण्याचा झाला निर्णय

अलिबाग, जि.रायगड,दि.23 (जिमाका):-  निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नारळ व सुपारीच्या झाडांना विशेष बाब म्हणून प्रति झाड मदत मिळावी, याकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाकडे मागणी केली होती.       त्यानुसार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपारीच्या प्रति झाडासाठी रू.५० व नारळाच्या प्रति झाडासाठी रू. २५० अशी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.        याबद्दल पालकमंत्री कु.तटकरे यांनी रायगडकर जनता आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत. 0000

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 7 हजार 960 जणांनी केली करोनावर मात

             अलिबाग,जि.रायगड दि.23 (जिमाका):-  स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 960 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 422 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1391, पनवेल ग्रामीण-510, उरण-151, खालापूर-378, कर्जत-81, पेण-398, अलिबाग-403, मुरुड-33, माणगाव-67, तळा-2, रोहा-98, सुधागड-7, श्रीवर्धन-39, म्हसळा-53, महाड-101, पोलादपूर-10 अशी एकूण 3 हजार 722 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-3 हजार 895, पनवेल ग्रामीण-1 हजार 203, उरण-530, खालापूर-324, कर्जत-291, पेण-450, अलिबाग-388, मुरुड-70, माणगाव-171, तळा-19, रोहा-296, सुधागड-8, श्रीवर्धन-76, म्हसळा-67, महाड-128,  पोलादपूर-44 अशी एकूण 7 हजार 960 आहे.                        आज दिवसभरातही पनवेल मनपा-151, पनवेल ग्रामीण-35, उरण-15, खालापूर-6, कर्

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर रायगड मधून आरसीएफ थळ चे कर्मचारी शरद पाटील यांची निवड

अलिबाग, जि.रायगड, दि.23 (जिमाका) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (महाराष्ट्र राज्य अंगीकृत संस्था) च्या वतीने जो कामगार सामाजिक, शैक्षणिक, साहित्यीक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, संघटना व आस्थापना आदी. बाबींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतो, अशा   कामगारांना   "गुणवंत कामगार कल्याण" पुरस्कार देऊन गौरविले जाते. हे गुणवंत कामगार समाजासाठी भूषणावह असतात. राज्यावर, देशावर ज्यावेळी अस्मानी संकट व नैसर्गिक आपत्ती ओढवते त्यावेळी शासनाला सर्वोताेपरी सहकार्य करण्यासाठी या सर्व गुणवंत कामगारांचा सक्रिय सहभाग असतो. राज्यातील   अशा गुणवंत कामगार बंधू -भगिनींनी, सर्व क्षेत्रातील कामगार व समाजातील सर्व घटकांसाठी, भविष्यात "राजकारण विरहित", विधायक कार्य करण्याच्या हेतूने एकत्र येऊन, " राज्य गुणवंत   कामगार असोसिएशन "   (कार्यक्षेत्र-महाराष्ट्र राज्य) या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. .                       सध्याच्या करोनाच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनची नुकतीच ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करिता दि.9 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत

अलिबाग, जि.रायगड,दि.23 (जिमाका):- मुंबई शहर-उपनगर, जिल्ह्यातील मातंग समाजातील   मांग, मिनी मादींग, मादींग दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगाया या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी करिता सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.                ज्येष्ठता गुणानुक्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशिट, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादीसह दोन प्रतीत पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय,

लॉकडाउन काळात दूध विक्री, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने स.6 ते दु. 2 पर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

अलिबाग, जि.रायगड,दि.23 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाउनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने/आस्थापना सकाळी 6.00 ते सकाळी 11.00 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती.   मात्र आता मूळ लॉकडाऊन आदेशात सुधारणा करुन रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. दुकाने/आस्थापना   यापुढे सकाळी 6.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु   ठेवण्यास   जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे.   तसेच समुद्रकिनारी, सार्वजानिक/खाजगी क्रिडांगणे, सोसायटी/संस्था यांच्या अखत्यारीतील मैदाने, उद्याने इत्यादी सह जवळच्या सार्वजानिक खुल्या जागेत वैयक्तिक स्वरुपात शारीरिक व्यायाम उदा. सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग हे व्यायाम याेग्य शारिरीक अंतर (Physical distance) ठेवून सकाळी 5.00 ते सायं. 8.00 या वेळेतील ठराविक कालावधीसाठी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी शारिरीक व्यायामाव्यतिरिक्त अन्य कोणतीही बाब/सामूहिक ग

कर्जत येथील खाजगी रायगड हॉस्पिटल होवू शकते शासकीय कोविड रूग्णालय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली कोविड केअर सेंटरची पाहणी

Image
अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका) - जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील खाजगी असलेल्या रायगड हॉस्पिटलचे रूपांतर लवकरच काेविड उपचार रुग्णालयात होवू शकते. त्या दृष्टीने काल बुधवार,दि.22 जुलै रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटरला भेट दिल्यानंतर जिल्ह्यातील 450 बेडचे हे खाजगी हॉस्पिटल शासकीय कोविड रूग्णालय म्हणून रूपांतरित करण्यास जिल्हा प्रशासन पुढाकार घेईल, असे प्रतिपादन केले.  दि.22 जुलै रोजी खालापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यादरम्यान कर्जत तालुक्यासही भेट दिली. त्यावेळी त्यांनी रायगड हॉस्पिटलमध्ये जाऊन करोना पॉझिटिव्ह रुग्णांची आस्थेने चौकशी केली व नंतर रायगड हॉस्पिटलचीही पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसिलदार विक्रम देशमुख, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.के.मोरे, कर्जत उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.मनोज बनसोडे आदी प्रमुख अधिकारी तसेच महसूल आणि आरो

समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विनम्र अभिवादन

अलिबाग, जि.रायगड, दि.23 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.         या प्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के पाटील, नायब तहसिलदार वैशंपायन हे उपस्थित होते. 00000

उरण तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

  अलिबाग, जि.रायगड, दि.23 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- उरण येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले श्रीमती मंजिरी मिलिंद पाडगावकर यांचे घर, अे-9 क्रिष्णा बिल्डिंग,उरण, पूर्वेस-रायगड बँक, पश्चिमेस-न.पा.रस्ता, दक्षिणेस-पौडवाल निवास यांचे घर, उत्तरेस-भानुशाली निवास हा परिसर. मौजे चिरले येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले श्रीम.अंजना समाधान कलंबाग यांचे घर, घर नं.737, पो.जासई, पूर्वेस-प्रितम प्रभाकर पाटील यांचे घर, पश्चिमेस-प्रल्हाद रामा पाटील यांचे घर, दक्षिणेस व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर. मौजे कोप्रोली येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले सत्यवान पंढरीनाथ भगत यांचे घर,   मौजे खोपटे पाटील पाडा, पूर्वेस-दिलीप पाटील यांचे घर, पश्चिमेस-धनश्याम घरत यांचे घर, दक्षिणेस व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर. मौजे दिघोडे येथील करोना बाधित व्यक्ती राहत असलेले श्रीम.देवयानी संदिप पाटील यांचे घर,

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2 मि.मि.पावसाची नोंद

             अलिबाग,जि.रायगड दि.23 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.19 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1389.51 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 1.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-12.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-1.20 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-5.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-1.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 35.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 2.19 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 43.20 टक्के इतकी आहे. 00000

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

वृत्त क्रमांक :- 1008                                                  दिनांक :- 22 जुलै 2020   अलिबाग, जि.रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील वंदना विनोद खंदारे यांचे घर, गिमीराज इम्पेरियल को.ऑ.हौ.सो.प्लॉट नं.122 ए, सेक्टर-06, दुसरा मजला, करंजाडे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग. मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील दत्तू महादेव कोडक यांचे घर, निंबेश्वर आंगण, बी-विंग, सुकापूर, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-डी-विंग, पश्चिमेस-गंगाधाम, दक्षिणेस-ए-विंग, उत्तरेस-स्वानंद भूमी) हा परिसर. मौजे पारगांव, ता.पनवेल येथील स्मिता कमलाकर चौधरी, यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-नितीन बाळाराम पाटील यांचे घर, पश्चिमेस-वसंत विश्वनाथ चौधरी यांचे, दक्षिणेस-किशोर विठ्ठल पाटील यांचे घर, उत्तरेस-वसंत नारायण मेहेर कायम बंद घर) हा परिसर. मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील सागर संतोष आडसुळे या

अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरुन अवजड वाहतूकीस बंदी

अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :-   आगामी पावसाळयात रेवदंडा पुलास होणारी संभाव्य हानी टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळयाच्या (दि.21 जून 2020 ते दि.30 ऑक्टोबर 2020) या कालावधीमध्ये रेवदंडा पुलावरुन होणारी अवजड वाहतूक (12 मॅट्रीक टनापेक्षा जास्त भारवहन असणारी वाहने) पूर्णपणे बंद करुन, तसेच अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरुन होणारी अवजड वाहतूक बंद करुन ही अवजड वाहतूक अलिबाग ते वडखळ, वडखळ ते रोहा, रोहा ते साळाव या मार्गे करण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश जारी केले आहेत.   ००००००

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची ऑनलाईन प्रतिक्षा यादी तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शकच

अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :-   गेल्या काही दिवसांपासून जिल्हयातील काही वृत्तपत्रांमध्ये तसेच सोशल मिडियावर भरती प्रक्रियेत दलालांनी परस्पर पैसे घेवून उमेदवारांची फसवणूक झाल्याबाबत बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ श्री.आनंद भोसले यांच्याकडून वस्तूस्थितीदर्शक माहिती देण्यात आली आहे. श्री.भोसले यांनी स्पष्ट केले आहे की, ही कोणतीही सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया नाही तर प्रतिक्षा यादी तयार करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध आस्थापनांकडून जशी मागणी होईल तसे सुरक्षा रक्षकांचा पुरवठा संबंधित आस्थापनांना करण्यात येणार आहे. कोणत्याही सुरक्षा रक्षकाला मंडळात काम देण्यात येणार नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया नाही.   त्यांनी पुढे म्हटले आहे की, रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळास सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी मंडळाने मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने नियुक्त केलेल्या मे. सेराईज टेक सोल्युशन्स प्रा. लि. या संस्थेमार्फत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन व स्थानिक व

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी.,    अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 3.30 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-2.50 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.30 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.00 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.20 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.46 मि.मि.पावसाची नोंद

             अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.46 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1387.33 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि., माणगांव-5.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 7.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 0.46 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 43.13 टक्के इतकी आहे. 00000

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 7 हजार 293 जणांनी केली करोनावर मात

                    अलिबाग,जि.रायगड दि.21 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 887 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 299 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1435, पनवेल ग्रामीण-495, उरण-162, खालापूर-343, कर्जत-78, पेण-370, अलिबाग-368, मुरुड-23, माणगाव-51, तळा-2, रोहा-78, सुधागड-2, श्रीवर्धन-28, म्हसळा-55, महाड-63, पोलादपूर-5 अशी एकूण 3 हजार 558 झाली आहे.                 कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-3 हजार 546, पनवेल ग्रामीण-1 हजार 124, उरण-474, खालापूर-271, कर्जत-261, पेण-409, अलिबाग-352, मुरुड-70, माणगाव-168, तळा-19, रोहा-287, सुधागड-8, श्रीवर्धन-74, म्हसळा-60, महाड-126,   पोलादपूर-44 अशी एकूण 7 हजार 293 आहे.                             आज दिवसभरातही पनवेल मनपा-137, पनवेल ग्रामीण-51, उरण-15,