पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीला यश मंत्रिमंडळ बैठकीत सुपारी आणि नारळ प्रति झाडांसाठी मदत देण्याचा झाला निर्णय


अलिबाग, जि.रायगड,दि.23 (जिमाका):- निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नारळ व सुपारीच्या झाडांना विशेष बाब म्हणून प्रति झाड मदत मिळावी, याकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाकडे मागणी केली होती.
      त्यानुसार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपारीच्या प्रति झाडासाठी रू.५० व नारळाच्या प्रति झाडासाठी रू. २५० अशी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
       याबद्दल पालकमंत्री कु.तटकरे यांनी रायगडकर जनता आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक