Posts

Showing posts from October 6, 2019

माझं मत, माझा महाराष्ट्र या माध्यमातून कर्जत तालुक्यात स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून मतदार जनजागृती

Image
रायगड अलिबाग दि.10 :- भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ. विजय सूर्यवंशी-, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, नोडल अधिकारी स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी, सुनिल जाधव   यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत विधानसभा मतदार संघ वैशाली परदेशी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत विक्रम देशमुख यांच्या सहकार्याने "विधानसभा   निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर कर्जत विधानसभा मतदार संघात चित्ररथ फिरवून मतदान जागृती केली. स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून दहिवली, कर्जत पोलीस स्टेशन, कपालेश्वर मंदिरा समोर, कर्जत रेल्वे स्टेशन, मच्छीगल्ली, धापया मंदिरा शेजारी, कर्जत नगर परिषदेसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर,  

उरण येथे औद्योगिक कंपन्यांमध्ये मतदान जनजागृती

Image
रायगड अलिबाग दि.10 :- उरण विधानसभा मतदार संघ स्वीप समितीमार्फत ग्रॅन्डवेल नॉर्टन कंपनी, मोरा, GTPS कंपनी, बोकडवीरा, BPCL कंपनी, भेंडखळ, ONGC कंपनी, नागाव उरण या कंपनी मधील अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली.   कामगार व त्यांच्या कुटूंबियांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन स्वीप समितीमार्फत करण्यात आले. तसेच यावेळी कामगारांकडून सामुहिक संकल्प पत्र वाचन करण्यात आले 0000000

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

रायगड अलिबाग दि.10 :-विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून   ते आठ ऑक्टोबर   या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये एकूण 209 गुन्हे नोंद केले असून त्यात 130 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.    त्यात एकूण रु.32 लाख 57 हजार 608 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   तसेच एकूण 14 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. निवडणूक कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी या विभागाने विशेष लक्ष दिले आहे.   त्यानुसार वाहन तपासणी करणे, संशयित ठिकाणांवर छापे टाकणे व रात्रीच्या वेळी गस्त घालणे अशी कारवाई करण्यात येत आहे.   कलम 93 अंतर्गत सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीबाबतचे बंधपत्र घेण्यासाठी संबंधित प्रांताधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत.   निवडणूक कालावधीमध्ये बंधपत्राचा भंग केल्यास गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.   आचारसंहिता कालावधीमध्ये मद्यविक्री अनुज्ञप्त्या विहित वेळेत उघडणे व बंद करणे यावर क्षेत्रीय अधिकारी विशेष लक्ष ठेऊन   आहेत.   या

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक- 2019 साठी निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल

Image
रायगड   (जिमाका) दि. 07 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून सर्व साधारण निवडणूक निरीक्षक श्रीमती रेणु जयपाल (आय.ए.एस), श्री.बी.परमेसवरन (आय.ए.एस) आणि श्री.एस.हरिकिशोर (आय.ए.एस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केले. 188-पनवेल व 189-कर्जत साठी श्रीमती रेणु जयपाल (आय.ए.एस.) सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आहेत.   यांच्या संपर्क अधिकारी म्हणून श्रीमती शशीकला अहिरराव या असून त्यांचा संपर्क क्रमांक   7507251511, 8208123951 असा आहे. 190-उरण व 191-पेण साठी श्री.बी. परमेसवरन (आय.ए.एस.) सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आहेत. यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.बनसोडे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9619368365 असा आहे. 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन व 194-महाड साठी श्री.एस.हरिकिशोर (आय.ए.एस.) सर्व साधारण निवडणूक निरीक्षक आहेत यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.रमेश पंडीतराव पाटील   असून त्यांचा संपर्क क्रमांक 8108022010 असा आहे. 0

सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 78 उमेदवार आज 34 उमेदवारांनी घेतली नामनिर्देशनपत्रे मागे

रायगड अलिबाग दि.07 :- महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी   34   उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण   78   उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली. 188-पनवेल विधानसभा मतदार संघात एकूण 10 उमेदवार रिंगणात 189-कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण 11 उमेदवार रिंगणात 190-उरण विधानसभा मतदार संघात एकूण 8 उमेदवार रिंगणात 191-पेण विधानसभा मतदार संघात एकूण 14 उमेदवार रिंगणात 192-अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण 13 उमेदवार रिंगणात 193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण 14 उमेदवार रिंगणात 194-महाड विधानसभा मतदार संघात एकूण 8 उमेदवार रिंगणात             असे एकूण 78 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. 00000

तळोजा औद्योगीक वसाहतीत मतदान जनजागृती कार्यक्रम

Image
रायगड अलिबाग दि.07 : तळोजा येथील   औद्योगिक वसाहतीतील    एक्साईड इंडस्ट्रीज ,   2. मायलॉन लॅबोरोटरीज आणि     असाही इंडीया ग्लासेस   या   कारखान्यातील सुमारे 500 कामगार   व   कर्मचारी आणि त्यांचया कुटुंबियांना   दि. 21 ऑक्टोबरला मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.   SVEEP कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय SVEEP समिती मार्फत हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कामगारांना मतदान हे राष्ट्रीय काम समजुन   मदतान करावे. मी मतदान करणारच अशी शपथ   देण्यात आली. 00000

अलिबाग तालुक्यात स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून जनजागृती

Image
रायगड अलिबाग दि.07 : भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी - डॉ. विजय सूर्यवंशी,   उपजिल्हाधिकारी निवडणूक- वैशाली माने, नोडल अधिकारी, स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव   यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हयात विधानसभा निवडणुक मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदान जनजागृती विषयी चित्ररथ व पथनाटय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.                अलिबाग येथे आज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी - शारदा पोवार, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी- सचिन शेजाळ , यांच्या प्रमुख उपस्थितीत " विधानसभा   निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर चित्ररथ फिरवून स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून अलिबाग   भाजी मार्केट, अलिबाग बस स्टॅन्ड, शिवाजी महाराज पुतळा, ठिकरूळ नाका, काळंबा मं

ऑक्टोंबर महिन्यात लोकशाही दिन नाही

रायगड अलिबाग दि.07 :   शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ, दिनांक 26 सप्टेंबर, 2012 अन्वये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतू विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 कामी दि.21 सप्टेंबर, 2019 पासून रायगड जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे माहे ऑक्टोंबर 2019 मध्ये लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही . असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 00000

190-उरण विधानसभा मतदारसंघाच्या खर्च ताळमेळ बैठका

रायगड अलिबाग दि.07 :   190-उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार व राजकीय पक्षांना कळविण्यात येते की, श्री.के.सुनिल कुमार नायर, IRS यांची भारत निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशानुसार 190-उरण विधानसभा मतदार संघाकरिता खर्च निरीक्षक (Expenditure Observer) म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 190-उरण या विधानसभा मतदार संघातील सर्व नामनिर्देशित उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतचा व राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्च बाबतचा ताळमेळ घेण्यासाठी बैठकीचा दिनांक व ठिकाण निश्चित केलेले आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे. 190-उरण मध्ये 10 ऑक्टोंबरला   पहिली खर्च ताळमेळ बैठक, 14   ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि   18 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक. या सर्व बैठका   सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी 190-उरण विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय, रा.जि.प.मराठी शाळा, जासई ता.उरण येथे होणार आहेत. तरी 190-उरण विधानसभा मतदार संघातील सर्व नामनिर्देशित उमेदवारांना व संबंधित राजकीय पक्षांना सूचित करण्यात येते की सदर बैठकीसाठी शॅडो रजिस्टर व इतर सर्व खर्चाच्या संबंधित

191-पेण विधानसभा मतदारसंघाच्या खर्च ताळमेळ बैठका

रायगड अलिबाग दि.07 :   191-पेण विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार व राजकीय पक्षांना कळविण्यात येते की, श्री.के.सुनिल कुमार नायर, IRS यांची भारत निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशानुसार 191-पेण विधानसभा मतदार संघाकरिता खर्च निरीक्षक (Expenditure Observer) म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 191-पेण या विधानसभा मतदार संघातील सर्व नामनिर्देशित उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतचा व राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्च बाबतचा ताळमेळ घेण्यासाठी बैठकीचा दिनांक व ठिकाण निश्चित केलेले आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे. 191-पेण मध्ये 11 ऑक्टोंबरला   पहिली खर्च ताळमेळ बैठक, 15   ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि   19 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक. या सर्व बैठका सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी 191-पेण तथा उपविभागीय अधिकारी पेण ता.पेण, जि.रायगड यांचे कार्यालय येथे होणार आहेत. तरी 191-पेण विधानसभा मतदार संघातील सर्व नामनिर्देशित उमेदवारांना व संबंधित राजकीय पक्षांना सूचित करण्यात येते की सदर बैठकीसाठी शॅडो रजिस्टर व इतर सर्व खर्चाच्या संबंधित कागदपत्रासह

पनवेल मतदार संघात विविध ठिकाणी घुमला मतदानाचा जागर

Image
रायगड अलिबाग दि. 06 (जिमाका) :- भारत सरकार, माहिती व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो,     गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने   "विधानसभा   निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर चित्ररथ फिरवून स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी    पथनाट्यातून मतदार जनजागृती केली. या पथनाट्याचे नेतृत्व स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी करीत आहे. चित्ररथाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करीत आहेत.   या पथनाट्य दौऱ्यामध्ये कलाकार म्हूणन प्रतिक कोळी, प्रतिक पाटील, विनोद नाईक, सौरभ मोरे, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, प्रतीक्षा शिपाई, स्वप्नाली थळे आदी कलाकार सहभागी झाले. चित्ररथाच्या माध्यमातून पनवेल मधील तहसील कार्यालय, शिवाजी महाराज चौक, सोसायटी नाका पनवेल, रेल्वे स्टेशन, कोहिनुर टेक्निकल, डॉ. आंबेडकर भवन शेजारी, टेम्बोले नाका, शिवा कॉम्प्लेक्स न्यू पनवेल, बस स्टॅन्ड, खांदा कॉलनी, मानसरोवर, कामोठे सेक्टर 35, कामोठे प

आचारसंहिता भंगाविषयीच्या तक्रारींसाठी सी-व्हिजिल ॲप

Image
रायगड अलिबाग दि. 06 (जिमाका) :- विधानसभा निवडणूका पारदर्शक व मुक्त वातावरणात होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. विधानसभा निवडणूकीदरम्यान कुठे आचारसंहितेचा भंग होत असल्यास ही बाब निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आणून देता यावी, तसेच नागरीकांना आचारसंहितेबाबत त्यांची असणारी तक्रारी नोंदविता यावी. यासाठी सी-व्हिजिल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांची आचासंहितेबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी ती सी-व्हिजिल ॲपवर नोंदवावी त्याची तातडीने दखल घेतली जाईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे. नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जनतेला आचारसंहिता भंग विषयक तक्रारी करावयाची असल्यास त्यांनी सी-व्हिजिल ॲपवर कराव्यात. याकरीता नागरीकांना प्रथम आपल्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरमधून सी-व्हिजिल ॲप डाऊनलोड करुन घ्यावे लागेल. यावर आचारसंहिता भंग होत असल्यास घटनेचा लाईव्ह फोटो, व्हिडीओ टाकून घटनेबाबतची सविस्तर माहिती द्यावी लागेल, तरी जनतेने विधानसभा निव