विधानसभा सार्वत्रिक निवडणुक- 2019 साठी निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल



रायगड  (जिमाका) दि. 07 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून सर्व साधारण निवडणूक निरीक्षक श्रीमती रेणु जयपाल (आय.ए.एस), श्री.बी.परमेसवरन (आय.ए.एस) आणि श्री.एस.हरिकिशोर (आय.ए.एस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केले.
188-पनवेल व 189-कर्जत साठी श्रीमती रेणु जयपाल (आय.ए.एस.) सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आहेत.  यांच्या संपर्क अधिकारी म्हणून श्रीमती शशीकला अहिरराव या असून त्यांचा संपर्क क्रमांक  7507251511, 8208123951 असा आहे.
190-उरण व 191-पेण साठी श्री.बी. परमेसवरन (आय.ए.एस.) सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आहेत. यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.बनसोडे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9619368365 असा आहे.
192-अलिबाग, 193-श्रीवर्धन व 194-महाड साठी श्री.एस.हरिकिशोर (आय.ए.एस.) सर्व साधारण निवडणूक निरीक्षक आहेत यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.रमेश पंडीतराव पाटील  असून त्यांचा संपर्क क्रमांक 8108022010 असा आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक