Posts

Showing posts from May 29, 2022

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणार वृक्षारोपण विशेष मोहीम

  अलिबाग, दि.01 (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध शासकीय विभाग आणि सुरभी स्वयंसेवी संस्था, अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये 358 तालुक्यांमध्ये वृक्ष लागवड चळवळ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.   तरी इच्छुक संस्था, संघटना, मंडळ, कंपन्या, व्यक्ती यांनी या सामाजिक कार्यात सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा व इच्छुकांनी नोंदणीसाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे यांनी केले आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये संस्थांची निवड करण्यात येणार असून महाराष्ट्रात 1 हजार संस्थांची निवड करून     विविध प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण व त्याचे संगोपन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सुरभी स्वयंसेवी संस्था अंमलबजावणी संस्था म्हणून कार्य करणार आहे. वृक्षारोपण कार्यक्रम दि. 5 जून 2022 ते 31 ऑगस्ट 2022   या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याकरिता सामाजिक वनीकरण, वन विभाग,जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती इत्यादी शासकीय

पोलादपूर तालुक्यात तहसिलदार दीप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणेची आपत्ती व्यवस्थापन तयारी पूर्ण

    अलिबाग, दि.01 (जिमाका):- मान्सूनच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींना अधिक समर्थपणे तोंड देण्यासाठी गावपातळीपासून ते तालुकापातळीपर्यंत ग्रामस्तावरील, अधिकारी व संस्था यांचा योग्य प्रकारे समन्वय राखणे, प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य वापर करणे व उपलब्ध साधन सामग्रीचा कार्यक्षम रितीने उपयोग करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालुक्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तहसिलदार दीप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाली असून आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. पोलादपूर तालुका हा रायगड जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात छोटा तालुका आहे. हा तालुका राज्य शासनाने संपूर्ण डोंगरी म्हणून घोषित केला आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये एकूण तीन महसूल मंडळे व 20 तलाठी सजे मध्ये मिळून 88 गावामध्ये 212 वाड्यांचा समावेश होतो. 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या 45 हजार 464 एवढी आहे. प

“कातकरी उत्थान अभियान” सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत खालापूर येथे ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न 128 ई-श्रम कार्डची झाली नोंदणी

    अलिबाग, दि.01 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली “ कातकरी उत्थान अभियान ” सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत “ स्थलांतरण रोखणे व रोजगार निर्मिती ” च्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील मौजे भिलवले येथील कातकरी आदिवासीवाडी येथे “ ई-श्रम कार्ड ” नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 128 ई-श्रम कार्डची नोंदणी करण्यात आली. यावेळी तेथील तलाठी, ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्था, कामगार उपायुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000

महाड उपविभागीय अधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत “हॅम रेडिओ” वापराचे प्रशिक्षण संपन्न

  अलिबाग, दि.01 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाड उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत हॅम रेडिओ वापराबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास महाड तहसिलदार सुरेश काशीद, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई, गटविकास अधिकारी श्री.पोळ, महाड गटविकास अधिकारी श्री.जगताप, पोलादपूर तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, विविध रेस्क्यू टीम, हॅम रेडिओ वापराचे ज्ञान असलेले काही स्वयंसेवक उपस्थित होते. उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना हे प्रशिक्षण श्री.नितीन ऐनापुरे यांनी दिले. डायरेक्टर नितीन अँड कंपनी यांनी महाडच्या पूरामध्ये अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये हॅम रेडिओचा वापर करून संपर्क यंत्रणा निर्माण केली होती. 00000

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर सेवानिवृत्त

  अलिबाग, दि.01 (जिमाका):- शासकीय नियमानुसार दि.31 मे 2022 रोजी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर व शिपाई श्री.कृष्णा नाईक हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्य करणारे, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात कार्य करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी हॉटेल गुरूप्रसाद येथे उपस्थित होते. आरोग्य विभागात उरण येथे कार्यरत असलेले कर्मचारी श्री.हरीश पाटील यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत गोळा करून राष्ट्रीय क्षयरोग कर्मचारी संघटनेच्या वतीने श्री.हरीश पाटील यांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी मावळते जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार केला. तसेच श्री.कृष्णा नाईक यांचा सपत्नीक सत्कार डॉ.सुरेश देवकर यांनी केला. एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून डॉ.सुरेश देवकर यांनी रायगड जिल्ह्

गृहनिर्माण सहकारी संस्था सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त संस्था अभियानात सहकारी संस्थांनी सहभागी व्हावे -सहाय्यक निबंधक अशोक मोरे

  अलिबाग, दि.01 (जिमाका):- अलिबाग तालुक्यात मार्च 2022 अखेर एकूण 457 गृहनिर्माण सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पुरस्कृत अभियानानुसार गृहनिर्माण सहकारी संस्था सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त संस्था अभियान दि.01 मे 2022 ते दि.30 एप्रिल 2023 या कालावधीत राबविण्याचे निश्चित केले आहे. तरी अलिबाग तालुक्यातील सर्व नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक अशोक धों. मोरे यांनी केले आहे.   00000

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध उपक्रमांद्वारे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

  अलिबाग, दि.01 (जिमाका):- जगभरात 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून अलिबाग जिल्हा रुग्णालयात काल (दि.31 मे) रोजी विविध जनजागृतीपर उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला. सकाळी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विरोधी रॅलीचे आयोजन अलिबाग शहरातील बाजारपेठ, दुकान व वस्ती परिसरातून करण्यात आले.   यात सहभागी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तंबाखू विरोधी घोषणा देऊन अलिबागकारांचे लक्ष वेधले. या रॅलीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांनी झेंडा दाखविला. या दिनानिमित्त अलिबाग नर्सिंग कॉलेज मध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम दर्शविणाऱ्या पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी त्या पोस्टरचे प्रदर्शन लावण्यात आले. या कार्यक्रमासाठी न्यायाधीश तथा अलिबाग विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव श्री.अमोल शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर व्यासपीठावर प्रशासकीय अध

रायगड जिल्हा प्रशासनाची “परिवर्तन” कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध

अलिबाग, दि.01 (जिमाका):- रायगड जिल्हा प्रशासनाने जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 2) ही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून सर्व नागरिकांना https://raigad.gov.in/en/parivartanebook/ या लिंकवर वाचण्याकरिता विनामूल्य उपलब्ध आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी दि.01 मे 2022 रोजी संपन्न झाले. तसेच सप्टेंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीतील राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 1) ही कार्यपुस्तिकादेखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर 24 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी पदी रुजू झाल्यानंतर प्रशासन म्हणून जनतेच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी, अगदी शेवटच्या व्यक्तीच्या चेहन्यावर समाधानाचं हास्य फुलविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनातील सर्वांनी ऑगस्ट-सप्टेंबर 2021 महिन्यात “ परिवर्तन ” घडवून आणण्याची मनाशी खूणगाठ बांधली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कामकाजास उत्साहाने सुरुवात केली. शेतकर

आदिवासी समाजामधील पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

  अलिबाग,दि.01 (जिमाका):-  आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरिता आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि.रायगडमार्फत प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील (जिल्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग) आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता नृत्य पथकांनी दि.08 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालय, पेण येथे अर्ज सादर करावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या पथकातील कलाकारांना मानधन, येण्या-जाण्याचा प्रवास खर्च, दैनिक भत्ता, पेहराव भत्ता मिळणार आहे. प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजामधील विविध जमातींच्या पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे. 00000  

लेखा व कोषागारे संचालक वैभव राजेघाटगे यांनी दिली अलिबाग जिल्हा कोषागार कार्यालयास भेट

Image
    अलिबाग,दि.01 (जिमाका):-  लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री.वैभव राजेघाटगे यांनी लेखापरीक्षण अहवालाच्या अंतिमीकरण कामानिमित्त अलिबाग जिल्हा कोषागार कार्यालयास काल (31 मे रोजी) भेट दिली. यावेळी लेखा व कोषागारे, कोकण विभागाचे सहसंचालक श्री.अनुदीप दिघे हे उपस्थित होते. या दोन्ही मान्यवरांचे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. रमेश इंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.    यावेळी कोषागारातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. श्री.वैभव राजेघाटगे हे वित्त व व लेखा सेवेतील एक अत्यंत प्रयोगशील, प्रामाणिक,संवेदनशील, उपक्रमशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगली येथील जिल्हा परिषद मुद्रणालय, निवृत्ती वेतनधारकांसाठी केलेले काम, कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम याची विशेष दखल राज्यपातळीवर घेण्यात आली असून अधिकारी-कर्मचारी तसेच लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यानिमित्त संचालक श्री.राजेघाटगे यांनी कोषागारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कोषागाराची पाहणी करून कोषागारातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक क

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

Image
रायगड जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन   अलिबाग,दि.31 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. रायगड जिल्ह्यात या कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून येथील पी.एन.पी नाट्यगृह येथे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या ऑनलाईन तर अलिबाग येथील पी.एन.पी नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ.कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अमित सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी, पनवेल महानगरपालिका उपायुक्त सचिन पवार, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, महि

सार्वजनिक ग्रंथालय संचालकांनी ग्रंथालयाचा वार्षिक व अंकेक्षण अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावा

अलिबाग,दि.31 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालय संचालकांनी आपल्या ग्रंथालयाचा विहीत नमुन्यामधील परिपूर्ण वार्षिक अहवाल दि.30 जून 2022 पर्यंत व अंकेक्षण अहवाल दि.31 ऑक्टोबर 2022 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, डोंगरे हॉलच्या वर, पोस्ट ऑफिस समोर, ता.अलिबाग, जि.रायगड येथे सादर करावा, तसेच मिळालेल्या निधीअभावी अनुदान प्राप्त न झाल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीस संबंधित शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळ जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असे प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित ब. पवार यांनी कळविले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांनी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम 1970 सहाय्यक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री मान्यतेनुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना उपलब्ध निधीच्या अधीन राहून परीक्षण विविध पद्धतीने केले जाते. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये 170 अनुदान आणि इमारत व साधन सामुग्री सामान्यतः मधील प्रकरण 6 कलम 25 नुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या संचालक आणि ग्रंथालया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “पीएम केअर फॉर चिल्ड्रन” योजनेंतर्गत अनाथ बालकांना विविध लाभ केले जारी

Image
जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील  यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न   अलिबाग,दि.30 (जिमाका):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि.30 मे 2022 “ पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रन ” योजनेंतर्गत देशभरातील कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभ जारी करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, मंत्रीपरिषदेचे इतर सदस्य आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाशी दूरदृष्यप्रणालीद्वारे जोडलेले होते. रायगड जिल्ह्यात पंचायत राज, केंद्रीय राज्यमंत्री श्री.कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते बालकांना लाभाचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अमित सानप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अशोक पाटील, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे श्री.चिंतामणी मिश्रा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोरोनामु