जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणार वृक्षारोपण विशेष मोहीम

 


अलिबाग, दि.01 (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध शासकीय विभाग आणि सुरभी स्वयंसेवी संस्था, अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये 358 तालुक्यांमध्ये वृक्ष लागवड चळवळ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.  तरी इच्छुक संस्था, संघटना, मंडळ, कंपन्या, व्यक्ती यांनी या सामाजिक कार्यात सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा व इच्छुकांनी नोंदणीसाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे यांनी केले आहे.

प्रत्येक तालुक्यामध्ये संस्थांची निवड करण्यात येणार असून महाराष्ट्रात 1 हजार संस्थांची निवड करून    विविध प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण व त्याचे संगोपन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सुरभी स्वयंसेवी संस्था अंमलबजावणी संस्था म्हणून कार्य करणार आहे.

वृक्षारोपण कार्यक्रम दि. 5 जून 2022 ते 31 ऑगस्ट 2022  या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याकरिता सामाजिक वनीकरण, वन विभाग,जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती इत्यादी शासकीय कार्यालयांचे सहकार्य मिळणार आहे.  दि.05 जून 2022 रोजी सकाळी 07.00 वाजता मयेकर डोंगरी, वायशेत, अलिबाग येथे वृक्षारोपण करुन या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या संस्थाना/संबंधितांना प्रत्येक महिन्याला वृक्षांचे फोटो देण्यात येईल व वृक्ष किती इंच आणि वाढलेत त्याची माहिती देण्यात येईल. उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना राज्य, विभाग, जिल्हा पुरस्कार, वैयक्तिक पुरस्कार उत्तेजनार्थ अशा पुरस्कारांनी मंत्री महोदय, आमदार, खासदार, सेलिब्रिटी व पर्यावरण तज्ञ यांच्या हस्ते गौरविण्यात येईल.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक