Posts

Showing posts from January 2, 2022

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग, दि.7 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषद, अलिबाग कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत असून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राबवित असते. रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये नवीन विहीर या घटकाचा लाभ असल्याने जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येवून पीक उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास हातभार लागणार आहे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी आदिवासी उपयोजना (क्षेत्रांतर्गत/ क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजना बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेवून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलित आदिवासी उपयोजना ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) या नावाने दि.30 डिसेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे.   लाभार्थी पात्रतेच्या अटी : लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजे, शेतकऱ्याकडे सक्षम अध

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

          अलिबाग, दि.7 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषद, अलिबाग कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत असून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राबवित असते. रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये नवीन विहीर या घटकाचा लाभ असल्याने जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येवून पीक उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास हातभार लागणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेवून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलित विशेष घटक योजना ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने सन 2016-17 पासून राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. लाभार्थी पात्रतेच्या अटी : लाभार्थी हा अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकरी असला पाहिजे, शेतकऱ्याकड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासन आदिवासी बांधवांच्या सदैव पाठीशी --विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी बांधवांना वन हक्कांचे दस्तऐवज वाटपाचा कार्यक्रम संपन्न

Image
           अलिबाग, दि.6 (जिमाका):-   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शासन आणि संपूर्ण प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे   यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे केले.                जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी समाजातील बांधवांना वन हक्क दस्तऐवज वाटपाचा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करीत आज दि.06 जानेवारी 2022 रोजी पेण नगरपरिषद सभागृह येथे संपन्न झाला, त्यावेळी त्या दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या.                यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर आमदार श्री.रवी पाटील, अलिबाग उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार, साकव संस्था पेण चे संचालक अरुण शिवकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे तसेच आदिवासी कातकरी समाजातील बांधव कोविड नियमांच

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक होणार दि.12 जानेवारी रोजी

    अलिबाग, दि.6 (जिमाका):-   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार, दि.12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वा. ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. ०००००००

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी कोविड लसीकरण शिबिर कार्यक्रम संपन्न

Image
    अलिबाग, दि.6 (जिमाका):-   जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकरिता दि.06 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पनवेल महानगरपालिका   व तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कारागृहात नवीन दाखल झालेल्या कैद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला.   तळोजा मध्यवर्ती कारागृहातील दाखल 2 हजार 818 बंद्यापैकी 2 हजार 816 बंद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर यापूर्वीच 2 हजार 180 कैद्यांना   कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिली आहे. यावेळी तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्री.यु.टी.पवार,पनवेल तहसिलदार विजय तळेकर तसेच पनवेल महानगरपालिकेचे लसीकरण वैद्यकीय पथक उपस्थित होते. ०००००००

पनवेल शासकीय जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न

    अलिबाग, दि.5 (जिमाका):- शासकीय आय.टी.आय. पनवेल येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला. रायगड जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा संस्थेचे विद्यमान प्राचार्य के.डब्ल्यू.खटावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर पनवेलचे उप कोषागार अधिकारी श्री.जाधव, महाड आयटीआयचे प्राचार्य श्री.नलावडे, पनवेल संस्थेचे उपप्राचार्य श्री.व्ही. डि. टिकोले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उप कोषागार अधिकारी श्री.जाधव, महाडचे प्राचार्य श्री.नलावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना सावित्रीमाईंच्या जीवनचरित्रावर आपले विचार व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष अभियान कार्यक्रम स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुसूचित जातीच्या विविध व्यवसायातील पात्र प्रशिक्षणार्थ्यांना टूल कीट्सचे वाटप करण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.खटावकर यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्

अलिबाग तालुक्यातील साखर आक्षी बंदर येथे अवैध एल.ई.डी. व पर्ससीन नौकांवर जप्तीची कारवाई मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिले होते आदेश

    अलिबाग, दि.5 (जिमाका):- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग अवैध मासेमारी विरोधात कमालीचा सक्रीय झालेला दिसून येत आहे. सिंधुदुर्गनंतर आता रायगड जिल्ह्यातही एलईडी आणि अवैध मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सुधारित सागरी अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आज दि.05 जानेवारी 2022 रोजी प्रादेशिक उपआयुक्त, मत्स्यव्यवसाय महेश देवरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. साखर आक्षी बंदराच्या चॅनलमध्ये मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मुंबई संजय माने यांच्यासह परवाना अधिकारी. तुषार वाळूज, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी गणेश टेमकर, महादेव नांदोस्कर यांनी 1 अवैध एल.ई.डी. व 2 अवैध पर्ससीन नौका पकडल्या असून, या तीनही नौकांवर कोणतेही कागदपत्रे नव्हते. या 3 नौकांवर सुधारित कायद्यानुसार कारवाई करुन प्रतिवेदन दाखल करण्यात

खालापूर तालुक्यातील महड येथे अवैध थाई मागूर माशांचे संवर्धन करणाऱ्या इसमावर कारवाई

    अलिबाग, दि.5 (जिमाका):-   राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली (National Green Tribunal, New Delhi ) यांनी दि. 22 जानेवारी 2019 रोजीच्या आदेशानुसार अवैध थाई मागूर माशांच्या (Clarias gariepineus) प्रजनन, मत्स्यपालन, वाहतुक व विक्री करण्यावर बंदी घातली असून, प्रतिबंधित मागूर माशांचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार (दि.4 जानेवारी 2022) रोजी   प्रादेशिक उपआयुक्त, मत्स्यव्यवसाय महेश देवरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, श्री.सुरेश भारती यांच्यासह सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्रीम.अजया भाटकर, चेतन निवळकर व परवाना अधिकारी श्रीम.रश्मी आंबुलकर यांनी खालापूर तालुक्यातील महड येथे अवैध थाई मागूर माशांचे संवर्धन करणाऱ्या इसमावर पोलीस स्टेशन, खालापूर येथे कलम 188 शासन आदेशाचा अवमान करणे, कलम 268 सर्व लोकांना सामाईकपणे होणारे नुकसान, धोका अगर त्रास होतो, अगर त्यांना कोणताही सार्वजनिक हक्क वापरण्याचा प्रसंग येईल त्या व्यक्तींना नुकसान, अटकाव धोका किंवा त्रास होणे अपरिहार्य आहे, अशी कोणतीही

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास दि.28 फेब्रुवारी, 2022 पर्यंत मुदतवाढ प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांचे आवाहन

    अलिबाग, दि.5 (जिमाका):-   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, दि.28 फेब्रुवारी,2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळा येथे प्रवेश घ्यावा. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्यासाठी सुध्दा दि.28 फेब्रुवारी,2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग, मुंबई श्रीम.वंदना कोचुरे यांनी केले आहे. मुंबई विभागांतर्गत मुंबई शहर या जिल्ह्यात मुलांचे 2 व मुलींचे 1, मुंबई उपनगर या जिल्ह्यात मुलांचे 3 व मुलींचे 3, ठाणे जिल्ह्यात मुलांचे 4 व मुलींचे 4, पालघर जिल्ह्यात मुलांचे-1, रायगड जिल्ह्यात मुलांचे 3 व मुलींचे 4, रत्नागिरी जिल्ह्यात मुलांचे 6 व मुलींचे 4 व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांचे 3 व मुलींचे 5असे एकूण 41 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. मुंबई विभागातील रायगड जिल्ह्यात जावळी, ता.माणगाव येथे शासकीय निवासी शाळा कार्यरत आहे.

मदत व बचावकार्यासाठी सहा रबरी बोटी जिल्ह्यात दाखल सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले वितरण

    अलिबाग, दि.5 (जिमाका):- पूर परिस्थितीच्या काळत मदत व बचाव कार्य वेगाने सुरु करता यावे, यासाठी राज्य शासनाकडून 6 रबरी बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या बोटींचे सोमवार, दि.3 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आपत्ती सौम्यीकरण योजना निधींतर्गत 116 रबरी बोटींची राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील 6 बोटी रायगड जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक उपस्थित होते. महाड येथील साळुंखे रेस्क्यू टिमला 2, रोहा येथील वाईल्ड वॉटर अडव्हेंचर्स पथकाला 1, खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेला 1, रायगड पोलिसांना 1 तर महाड नगरपालिकेला 1 रबरी बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्याला दरवर्षी पूर समस्येला सामोरे जावे लागत आहे, अशा वेळी पूरात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी, मदत व बचावकार्यासाठी स्थानिक यंत्रणा सक्षम व्हाव

मुंबई विभागीय युवा महोत्सवातील लोकनृत्य प्रकारात रायगड जिल्ह्याचा संघ प्रथम

                अलिबाग, दि.5 (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने युवांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी 15 ते 29 वयोगटातील युवक- युवतींसाठी दि.04 जानेवारी 2022 रोजी मुंबई विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या लोकनृत्य प्रकारात रायगड जिल्ह्याच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.   केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या सूचनेप्रमाणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन आले. या युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या प्रकारांचा फक्त समावेश करण्यात आला होता.   या युवा महोत्सवामध्ये मुंबई विभागातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.                मुंबई विभागीय युवा महोत्सव लोकगीत आणि लोकनृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती पुष्पा ताई पागधरे (लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त गायिका..), श्रीमती ग्लोरिया डिसुझा (सुप्रसिद्ध अभिनेत्री, केंद्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कल

मुंबई विभागीय युवा महोत्सवाचा निकाल घोषित रायगडने लोकनृत्यात पहिला तर लोकगीतात पटकाविला दुसरा क्रमांक

                अलिबाग, दि.5 (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्यावतीने   युवांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी 15 ते 29 वयोगटातील युवक- युवतींसाठी दि.04 जानेवारी 2022 रोजी मुंबई विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात रायगड जिल्ह्याने लोकनृत्यात पहिला तर लोकगीतात दुसरा क्रमांक पटकाविला. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या सूचनेप्रमाणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन आले. या युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या प्रकारांचा फक्त समावेश करण्यात आला होता.   युवा महोत्सवांमध्ये मुंबई विभागातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील   स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.   या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना आदिती तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या व युवा महोत्सवांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी आपल्या कलेचे प्

जिल्हाधिकारी कार्यालयातील कोविड-19 हेल्पलाईन कक्षात मिळणार रॅपिड ॲन्टिजन टेस्टची सुविधा

  अलिबाग, दि.5 (जिमाका):- करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत. जिल्ह्याच्या दि.4 जानेवारी 2022 च्या कोविड अहवालानुसार जिल्ह्यात विद्यमान रुग्ण 1 हजार 890 असून 702 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.   दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती निश्चितच चिंताजनक बनत चालली आहे. याकरिता जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी तात्काळ औषधोपचाराबरोबरच कोविड लसीकरण, ॲन्टिजन व आरटीपीसीआर टेस्ट करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजला येथे कोविड-19 हेल्पलाईन कक्ष काल (दि.04 जानेवारी) रोजी सुरु करण्यात आला असून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी या कोविड-19 हेल्पलाईन कक्षातच रॅपिड ॲन्टिजन टेस्टची सुविधा सुरु करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच अभ्यागतांसाठी रॅपिड ॲन्टिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूचा वाढत्या प्रादूर्भावामुळे इयत्ता 1 ते 9 आणि इयत्ता 11 वी चे सर्व वर्ग बंद करण्याबाबतचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आदेश जारी

  अलिबाग, दि.5(जिमाका):-   जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे व रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये होऊ शकणाऱ्या कोविड-19 विषाणूचा संभाव्य संक्रमणाचा धोका विचारात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी साथरोग अधिनियम, 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 25 व 30 महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020 नियम 10 अन्वये रायगड जिल्हा क्षेत्रातील पनवेल महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, सर्व नगरपंचायती व ग्रामीण क्षेत्रातील इयत्ता 1 ते 9 आणि इयत्ता 11 वी चे सर्व वर्ग बंद करणे, सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांबाबत बंदचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाप्रमाणे इ. 1 ली ते 9 वी आणि इ. 11 वी चे वर्गामधील प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन दि.05 जानेवारी 2022 पासून दि.31 जानेवारी 2022 पर्यंत बंद राहील,   इ.1 ली ते 9 वी आणि इ. 11 वी चे वर्गामध्ये ऑनलाईन (Online Education) पध्दतीने अध्ययन अध्यापन शासन स्तरावरून वेळोवळी देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सुरु राहील,   इ. 10 वी व 12 वी ची बोर्डाची परीक्षा जाहीर झाली असून विद्यार्थ्यांचे माह

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीची बैठक संपन्न

    अलिबाग, दि.4 (जिमाका) :-   रायगड जिल्हाची जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीची बैठक आज दि. 04 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीस अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकूटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शाम कदम, मत्स्यव्यवसाय अधिकारी गणेश टेमकर व साकव संस्था, पेण चे संचालक अरुण शिवकर, जिल्हा एम.आय.एस. समन्वयक, श्रीमती अर्पिता पारेख आदि उपस्थित होते. यावेळी साकव संस्था, पेण यांनी सादर केलेल्या पेण तालुक्यातील 10 गावांच्या व्यवस्थापन आराखडयास जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीने मान्यता दिली व करण्यात येणाऱ्या कामांचा प्रगती अहवाल एक महिन्याच्या कालावधीमध्ये समितीसमोर मांडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी दिल्या. नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक मग्रारो-2019/प्र.क्र. 144/मग्रारो-01, दिनांक 30 नोव्हेंबर 2021 अन्वये सामूहिक वनहक्क मान्यताप्राप्त ग्रामस

महाड महापूरातील महाड शहर आणि ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारकांना अनुदानाचे वितरण अनुदान वाटप शिल्लक राहिलेल्या दुकानदार, हातगाडीधारक व टपरीधारक लाभार्थ्यांनी आवश्यक पुरावे तातडीने सादर करावेत

अलिबाग, दि.4 (जिमाका) :- दि.22 व 23 जुलै 2021 रोजी महाड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. त्यानुषंगाने झालेल्या नुकसानीमधील महाड शहर व ग्रामीण भागातील दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्यांची संख्या व दुकारनदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहे:               दुकानांच्या पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या 3 हजार 962 असून वाटप लाभार्थीं संख्या - 3 हजार 93 असून त्यांना 14 कोटी 84 लाख 31 हजार 851 रु.चे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 869 लाभार्थी शिल्लक आहेत.                टपरी शेडच्या पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या 304 असून वाटप लाभार्थीं संख्या- 51 असून त्यांना 3 लाख 77 हजार 250 रु.चे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 253 लाभार्थी शिल्लक आहेत.              हातगाडीधारकांच्या पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या 180 असून वाटप लाभार्थीं संख्या- 126 असून त्यांना 11 लाख 38 हजार 825 रु.चे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 54 ल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता 100 विद्यार्थी प्रवेशाकरिता मिळाली परवानगी ---पालकमंत्री कु.आदिती तटकरे

    अलिबाग,दि.4 (जिमाका) :- अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली होती.   त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग (जि. रायगड) या वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी केंद्र शासनाने 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी विहीत अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने या वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 100 विद्यार्थी प्रवेशित करण्यासाठी पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय दि.3 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. यातील अटी व शर्ती पुढीलप्रमाणे:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग (जि. रायगड) या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार 100 इतकी राहील. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे संलग्

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता 100 विद्यार्थी प्रवेशाकरिता मिळाली परवानगी ---पालकमंत्री कु.आदिती तटकरे

    अलिबाग,दि.4 (जिमाका) :- अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली होती.   त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग (जि. रायगड) या वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी केंद्र शासनाने 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी विहीत अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने या वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 100 विद्यार्थी प्रवेशित करण्यासाठी पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय दि.3 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. यातील अटी व शर्ती पुढीलप्रमाणे:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग (जि. रायगड) या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार 100 इतकी राहील. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे संलग्

जिल्ह्यात पहिल्या दिवशी 15 ते 18 वयोगटातील 2 हजार 388 लाभार्थ्यांचे झाले कोविड लसीकरण

    अलिबाग,दि.3 (जिमाका):- महाराष्ट्र राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये दि.3 जानेवारी, 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवक-युवतींच्या कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे.     या वयोगटामधील जिल्ह्यातील युवक युवतींची अंदाजित संख्या 1 लाख 45 हजार 383 असून आज पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 2 हजार 388 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. वंदन पाटील यांनी कळविली आहे. 000000

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका):- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-   मंगळवार दि.4 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3.30 वा. शासकीय निवासस्थान क-1 मंत्रालय, येथून शासकीय वाहनाने बोकडविरा-चारफाटा ता.उरणकडे प्रयाण. सायं.5.00 वा. बोकडविरा-चारफाटा ता.उरण येथे आगमन व 21 वा युवा महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : बोकडविरा-चारफाटा (एन.एम.एस.ई.झेड मैदान), पेट्रोल पंपाजवळ ता.उरण. सायं.5.30 वा. बोकडविरा-चारफाटा ता.उरण येथून शिरढोण ता.पनवेलकडे प्रयाण. सायं.6.00 वा. शिरढोण ता.पनवेल येथे आगमन व शिवसेना पक्ष पदाधिकारी सोबत बैठकीस उपस्थिती. स्थळ : शिरढोण, ता.पनवेल. सायं.6.30 वा. शिरढोण ता.पनवेल येथून शासकीय वाहनाने मंत्रालय, मुंबईकडे प्रयाण. 00000

जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची,अभ्यागतांची ॲन्टिजन टेस्ट करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आदेश नागरिकांनी गाफील न राहता कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :-   करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत. जिल्ह्याच्या दि.2 जानेवारी 2022 च्या कोविड अहवालानुसार जिल्ह्यात विद्यमान रुग्ण 980 असून   288 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ऑक्सिजन बेडवर असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 76 आहे तर अतिदक्षता विभागात 14 रुग्ण दाखल आहेत. ही परिस्थिती निश्चितच काळजी करण्यासारखी आहे.   जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा अद्याप दुसरा डोस बाकी असलेल्यांची संख्या जवळपास 3 लाख 44 हजार 283 असून अजूनपर्यंत पहिला डोसही न घेतलेल्यांची संख्याही 1 लाख 12 हजार 429 आहे, सद्य:परिस्थितीत यांच्या आरोग्याला सर्वाधिक धोका आहे. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी तात्काळ औषधोपचाराबरोबरच कोविड लसीकरण, ॲन्टिजन व आरटीपीसीआर टेस्ट करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच अभ्

करंजा येथे जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यालयाकडून विशेष क्षयरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

  अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :- करंजा मच्छिमार सहकारी सोसायटी, पालवी हॉस्पिटल उरण आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उरण यांच्या सहकार्याने (दि.02 जानेवारी 2022) रोजी विशेष क्षयरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.   या शिबिरात एकूण 124 रुग्णांची तपासणी करून 19 संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले तसेच     107 रुग्णांना कोविड लस   देण्यात आली. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर यांनी मच्छिमार सोसायटीच्या सभासदांना क्षयरोगाची माहिती देऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची तपासणी करण्यासाठी आवाहन केले. जिल्ह्यातील सात तालुक्यात एकूण 84 मच्छिमार सोसायट्या असून त्यांचे जवळपास 35 हजार सभासद आहेत. त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील सदस्य किती आहेत, याचा आराखडा तयार करून त्यानुसार त्या कुटुंबातील सदस्यांचे क्षयरोगाची तपासणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तसे आदेश देण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ईटकरे, करंजा

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड-अलिबाग कार्यालयातील जुन्या साहित्यांचा जाहीर लिलाव

  अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड-अलिबाग, राऊतवाडी, वेश्वी अलिबाग यांच्या कार्यालयाचे जुने नादुरुस्त लाकडी व लोखंडी फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक   साहित्य, गाडीचे जूने पार्टस जाहीर लिलावाद्वारे विकण्याची कार्यवाही मंगळवार, दि.4 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. संबंधित साहित्य पाहण्याकरिता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.02141-295418 वर संपर्क करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी कळविले आहे. ०००००००

जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी कोविड लसीकरण मोहीम झाली सुरू लसीकरणासाठी मुला-मुलींनी पुढे येण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका):-    मुंबई महानगर क्षेत्रात तसेच इतर भागात करोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार, दि.3 जानेवारी रोजी 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरूवात झाली असून यासाठी जिल्ह्यातील 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींनी कोविड लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ आजपासून डोंगरे हॉल, अलिबाग या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.                     यावेळी सुप्रसिद्ध नेपथ्यकार नितीन देसाई यांची तसेच अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मिनल दळवी, अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, नगरसेवक अनिल चोपडा, गौतम पाटील, सामाजिक कार्यकर्ते धर्मेश शहा, मे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका):- स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.        यावेळी उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, तहसिलदार (सर्वसाधारण) विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते . 000000