Posts

Showing posts from September 22, 2019

रायगड विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

Image
रायगड-अलिबाग दि.27:- रायगड विधानसभा निवडणूक संदर्भात खर्च निरीक्षक म्हणून श्री.विनोद कुमार, श्री.के.सुनिल नायर व श्री.श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली आहे.   आज पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी या खर्च निरीक्षकांचे स्वागत केले. १८८ पनवेल, १८९ कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी विनोद कुमार यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी ९१५८७२०५९६      असा आहे. १९० उरण, १९१ पेण या विधानसभा मतदार संघासाठी के.सुनिल नायर यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क    भ्रणणध्वनी 9158719876     असा आहे.   १९२ अलिबाग, १९३ श्रीवर्धन, १९४ महाड या मतदार संघासाठी श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी ९१५८७२४६३४ असा आहे. ०००००

अलिबाग विधानसभा मतदार संघाची प्रशासकीय तयारी पूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम.शारदा पोवार

Image
अलिबाग (जिमाका) दि.26 : विधानसभा निवडणूक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासकीय तयारी पुर्ण झाली आहे. मतदारसंघात एकुण 371 मतदान केंद्र असल्याची माहिती अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम.शारदा पोवार यांनी   आज पत्रकार परिषदेत दिली. श्रीम.पोवार म्हणाल्या, अलिबाग मध्ये चार मतदान केंद्राचे विभाजन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यात अलिबाग तालुक्यातील 1 तर रोहा तालुक्यातील 3 मतदान केंद्रांचा समावेश आहे.     सारसोली केंद्राचे विभाजन करून टिटवी हे नवीन केंद्र सुरु केले जाणार आहे. सुडकोली केंद्राचे विभाजन करून म्हसाडी केंद्र सुरु केले जाणार आहे. गायचोळ मतदार केंद्राचे विभाजन कडून खांबेरे मतदान केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तर अलिबाग तालुक्यातील रुईशेत केंद्राचे विभाजन करून भोमोली हे स्वतंत्र केंद्र सुरु केले जाणार आहे. प्रस्तावास निवडणूक आयोगाने मान्यता दिली तर चारही केंद्रावर यंदा मतदान प्रक्रीया पडेल. महिला मतदारांचे प्रमाण अधिक     अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ९३ हजार ९६२ मतदार आहेत. यात अलिबाग ता

उरण विधानसभा मतदार संघातील निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Image
अलिबाग (जिमाका) दि.25 : 190-उरण विधानसभा मतदार संघ येथील रा.जि.प.मराठी शाळा जासई येथे आचार संहिता पथक, खर्च नियंत्रण समिती व इतर समित्यांचे नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूक विषयक तयारी व कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी   (मंगळवार दि.24 सप्टेंबर रोजी ) घेतला आढावा. यावेळी डॉ.सुर्यवंशी म्हणाले, विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निवडणूक विषयक सर्व कामकाजांची तयारी झाली आहे.   त्या अनुषंगाने उरण विधानसभा मतदार संघात 327   मतदान केंद्र असून ते एकूण 174 स्थानांच्या ठिकाणी आहेत.    या मतदार संघात एकूण 2 लाख 92   हजार 951 इतके मतदार असून पुरुष मतदार संख्या 1 लाख 47 हजार 198 व स्त्री मतदार संख्या 1 लाख 45 हजार 650 व इतर 3 मतदार आहेत. निवडणूकीचे काम नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारदर्शक,नियोजनबध्द व निपक्षपाती करावे.   तसेच दि.बा.पाटील मंगळ कार्यालय जासई येथे क्षेत्रीय अधिकारी यांच्या समवेत निवडणूक कामाबाबत सूचनापर मार्गदर्शन करताना एक चूक देखील निवडणूकीच्या केलेल्या चांगल्या कामाचे नुकसान करु शकते. त्यामुळे निवडणूकीचे काम करताना आपणा

निवडणूकीचे काम पारदर्शक, नियोजनबध्द व निपक्षपातीपणे करावे -जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
अलिबाग (जिमाका) दि.25 : जिल्ह्यातील सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूकीचे काम पारदर्शक,नियोजनबध्द व निपक्षपातीपणे करावे, असे निर्देश  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी  यांनी आज दिले.   पी.एन.पी.नाट्यगृह अलिबाग येथे आयोजित विधानसभा निवडणूक 2019 आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे तसेच विविध समिती प्रमुख व सदस्य उपस्थित होते. डॉ.सर्यवंशी म्हणाले,निवडणूकी संदर्भातील सर्व समिती प्रमुख व सदस्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  सर्व समिती प्रमुखांनी आपल्या सदस्यांकडून चांगले काम करुन घ्यावे.   निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून उल्लघंन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.  निवडणूक प्रचार काळात सर्व समित्यांनी आपआपल्या दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित व प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.   व्हिडिओ पाहणी पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक व भरारी पथक यांनी आपली जबाबदारी पारपाडताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.   आदर्श आचारस

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23 : राज्य विधानसभा निवडणूकीत सर्व समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने काम करा. काम करताना आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची काळजी घ्यावी, अशा सूचना   जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज आदर्श आचार संहिता अंमलबजावणीबाबत सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.   त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी बोलत होते.   यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख,   उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीम.वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव व जिल्ह्यातील विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी म्हणाले, निवडणूक कालावधीत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक आयोगाकडे वर्ग झाल्या आहेत.    त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनांचे व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जावे.     राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी नुकतीच (रविवार दि.

मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन जिल्ह्यात पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यात शांततेत ,   पारदर्शकपणे व सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा ,   असे आवाहनही त्यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित   पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील निवडणूक तयारी संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उप जिल्हाधिकारी ( निवडणूक)   श्रीमती वैशाली माने उपस्थित होते.          यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले ,   जिल्ह्यात एकाच टप्प्यात 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी नामांकन दाखल करण्याची शे