Posts

Showing posts from July 10, 2022

विद्यार्थ्यांनी “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” करिता अर्ज करावेत

Image
  अलिबाग, दि.15 (जिमाका):-  जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादीकरिता महामंडळाकडून सरासरी 60% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून  “ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती ”  करिता अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादीसह दोन प्रतीत पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह आपले अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय, रायगड-अलिबाग, श्रीराम समर्

अन्..अमित कातकरीला मिळाला जातीचा दाखला..! ; जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील “कातकरी उत्थान” अभियानाची “फलश्रुती”

Image
अलिबाग, दि.15 (जिमाका):-  उरण तालुक्यातील सातघर कातकरीवाडी येथील अमित अमृत कातकरी या विद्यार्थ्याला औद्योगिक तंत्रशिक्षण संस्थेत (ITI) मध्ये प्रवेश हवा होता. परंतू त्याच्याकडे जातीचा दाखला नसल्याने त्याच्या आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास तांत्रिक अडथळा येत होता. ही बाब प्रा.राजेंद्र मढवी यांना समजल्यावर त्यांनी उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि नायब तहसिलदार नरेश पेडवी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमितचा अर्ज स्वतः भरून दिला. त्या अर्जावर चानजे ग्रामपंचायतीचे तलाठी तेजस चोरगे, मंडल अधिकारी श्री.भंडारी अन् आदिवासी विकास निरीक्षक श्री.पांढरे यांच्या स्वाक्षरीसह आवश्यक ते अभिप्राय घेतले. सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अमितचा हा अर्ज सेतू कार्यालयात ऑनलाईन प्रक्रियेसाठी सादर करण्यात आला. तेथे सेतू कार्यालयातील श्रीमती शरयू यांनी ऑनलाईन प्राथमिक कार्यवाही पूर्ण केली. तहसील कार्यालयातील लिपिक श्रीमती सोनिया आणि श्री.गिरी यांनीही अमितचा अर्ज ऑनलाईन तपासून पुढील कार्यवाहीसाठी तहसिलदार श्री.अंधारे यांच्याकडे तातडीने पाठविला. एका विद्यार्थ्याच्या तोही कातकरी समाजात

नागरिकांची सुरक्षितता अन् उत्तम आरोग्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज

Image
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न   अलिबाग,दि.14(जिमाका):-  जिल्हा धिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत सध्याच्या परिस्थितीचा आढावा, पिण्याचे पाणी शुद्धीकरण, साथरोग आटोक्यात आणणे, आपत्कालीन घटनांना तात्काळ प्रतिसाद देणे, घटनेचा अहवाल वेळीच वरिष्ठ कार्यालयास सादर करणे इत्यादी विषयांबाबत आज, दि.14 जुलै 2022 रोजी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी निवारा शेड मध्ये स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, येणाऱ्या कालावधीमध्ये मनुष्यबळ, मशिनरी उपलब्ध करणे, पावसाळ्याचे पाणी साठून उद्भवणाऱ्या साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस इत्यादी साथरोग नियंत्रणासाठी औषधसाठा उपलब्ध करणे, वैद्यकीय पथके नेमणे, अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदा

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धा होणार दि.21 जुलै रोजी सुरु

Image
अलिबाग,दि.14(जिमाका):-  जगभरात कोरोनाचे संकट पसरल्याने जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्र कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत. त्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही पडलेला दिसून आला. मागील गेल्या दोन वर्षापासून शासकीय क्रीडा स्पर्धा झालेल्या नाहीत. विविध स्तरावरील स्पर्धा, शिबिरे, प्रशिक्षण इत्यादी कोविड कालावधीत बंद राहिल्याने क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दरवर्षी रायगड जिल्ह्यातील हजारो खेळाडू, विविध क्रीडा स्पर्धा व शिबिरांमध्ये सहभागी होत असतात, त्यांना याचा खरा फटका बसला आहे. आता जग कोरोनाच्या सावटातून सावरत असून पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्र उभारी घेत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पनवेल महानगर पालिका यांच्या वतीने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धांचे आयोजन कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी येथे करण्यात आले असून या स्पर्धांना दि.21 जुलै 2022 रोजी सुरुवात होणार आहे. या स्पर्धा 14 वर्षाखालील मुले, 17 वर्षाखालील मुले व मुली या दोन वयोगटामध्ये खेळविण्यात येणार आहेत. 14 वर्षाखालील मुले (सब ज्युनियर) वयोगटासाठी

मतदारयाद्यातील तपशिलाशी जोडणी आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांक जोडणी कार्यक्रम सुरु

Image
अलिबाग,दि.14(जिमाका):-  भारत निवडणूक आयोगाकडील दि.23 जून 2022 च्या पत्रान्वये केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाद्वारे निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्य लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुषंगाने मतदारयादी संदर्भातील नमुना अर्ज 6, 7, 8 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामधील कलम 23 नुसार मतदारयादीतील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. याकरिता मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 260 मधील नियम 26बी नुसार फॉर्म नंबर 6ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दि.01 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणार आहेत, तरी मतदारांनी मतदारयादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांना मतदारयादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि विहित रितीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच अधिसूचना दि.17 जून 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि.01 एप्रिल 2023 पर्

साथरोगाला आळा बसण्याच्या दृष्टीने नागरिकांनी पाण्याची जैविक तपासणी करून घ्यावी - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

Image
अलिबाग, दि.14 (जिमाका):-  जून ते सप्टेंबर या कालावधीत पाण्याची जैविक तपासणी करणे गरजेचे आहे. पाण्याची जैविक तपासणी साथरोगाला आळा बसण्याच्या (जसे काविळ, अतिसार, कॉलरा इ.) दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तरी नागरिकांनी प्रयोगशाळेतून पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.हनुमंत संगनोर यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कार्यालयाच्या अंतर्गत 06 पाणी तपासणी प्रयोगशाळा (01 जिल्हा व 05 उपविभागीय प्रयोगशाळा) कार्यरत आहेत. जिल्हा प्रयोगशाळा ही अलिबाग तालुक्यात व पेण, महाड, माणगाव, कर्जत, रोहा तालुक्यात अशा एकूण 05 उपविभागीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत. तसेच आरोग्य विभागांतर्गत 01 जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा ही अलिबाग तालुक्यात कार्यरत आहे. या प्रयोगशाळांमार्फत सार्वजनिक तसेच खाजगी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करुन पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. या प्रयोगशाळांचे सनियंत्रण उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग, रायगड जिल्हा

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग इंद्रायणी नदीत सोडण्यात येतो; रायगड जिल्ह्यात नाही; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये

अलिबाग, दि.14 (जिमाका):-  सध्या विविध समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे यामध्ये टाटा पॉवर कंपनीच्या पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याच्या विसर्गाबाबत ज्या सूचना प्रसारित करण्यात येत आहेत, त्या बातम्या पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदी परिसरातील नागरिकांकरिता लागू आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणांच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात येतो. रायगड जिल्ह्यात या धरणांच्या सांडव्यावरून कोणत्याही स्वरूपात विसर्ग सोडण्यात येत नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी (विशेषतः खोपोली/कर्जत/खालापूर भागातील) अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी पारित केल्या जाणाऱ्या सूचनांकडे बारकाईने लक्ष ठेऊन त्यांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 00000

विशेष लेख: अतिवृष्टीमुळे जमलेले पावसाचे पाणी ओसरल्यानंतर…

Image
  राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निदर्शनास येते आहे. मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने पूर परिस्थितीमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाकडून प्रशासन तसेच नागरिकांसाठी वेळोवेळी विविध सूचना दिल्या जातात. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती लक्षात घेवून नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने राज्यातील आरोग्य यंत्रणेसाठी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. काय आहेत या सूचना.. जाणून घेवू या.. या लेखाच्या माध्यमातून.. 1) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी समन्वय: ·           प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर परिस्थितीचे दैनंदिन सनियंत्रण करीत आहे. ·           जिल्हास्तरीय आरोग्य विभागाने या कक्षाशी नियमित समन्वय राखणे आवश्यक आहे. यामुळे पूर परिस्थिती नेमकी कोठे आहे, कोणती गावे पूरग्रस्त झाली आहेत, याबाबतची अचूक माहिती वेळेवर मिळेल. 2) आरोग्य पथकः ·           पूरबाधित गावात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे पथक औषधासह पाठवावे. ·           मोठ्या लोकसंख्येच्या गाव

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

Image
  अलिबाग, दि.13 (जिमाका):-  अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी, शिकावू परिचारिका यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षाविषयक शिबीर काल (दि.12 जुलै 2022) रोजी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक जयपाल पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षाविषयक व्याख्याते श्री.जयपाल पाटील यांचे स्वागत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी उपस्थितांना प्रत्येकाने आपत्ती कशा प्रकारे येते, यापासून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याबाबतचे प्रशिक्षण व्याख्याते जयपाल पाटील यांच्याकडून घेवून आपत्तीकाळात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी डॉ.गवई म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आपण सर्वजण आपत्तीग्रस