Posts

Showing posts from May 1, 2022

नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा - विभाग नियंत्रक अनघा बारटक्के

Image
  “ एस.टी. चा प्रवास सुरक्षित प्रवास ” अलिबाग, दि.05 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आलेला असल्याने   रायगड  राज्य परिवहन  विभागातील सर्व आगारांमार्फत (महाड / अलिबाग / पेण / श्रीवर्धन / कर्जत / रोहा / मुरुड / माणगाव) दैनंदिन वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत रायगड  राज्य परिवहन  विभागातील सर्व आगारांमार्फत मिळून 850 फेऱ्या सुरू आहेत . तरी नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करून राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक,   पेण   अनघा बारटक्के यांनी केले आहे. 00000

रायगड जिल्हास्तरीय अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न

Image
अंमली पदार्थाच्या संकटापासून  वाचविण्याचा केला संकल्प   अलिबाग, दि.05 (जिमाका):-  गृह विभागाच्या  दि.25 मार्च 2022 च्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-0122/प्र.क्र.01/दिशा-3 अ अन्वये जिल्हास्तरावर अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी  “ जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती ”  ची स्थापना करण्यात आलेली असून या समितीची बैठक काल दि.04 मे 2022 रोजी अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सदस्यांनी समाजातील विविध घटकांना अंमली पदार्थांच्या संकटापासून वाचविण्याचा संकल्प केला. या बैठकीस सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.जयवंत रामकृष्ण झोपे ,  सीमा शुल्क विभागाचे निरीक्षक श्री.सुभाष गोपाळ राणे ,  राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्या  अधीक्षक श्रीमती कीर्ती भाऊसाहेब शेडगे ,  कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री.गोरखनाथ रघुनाथ मुरकुटे ,  अन्न व औषध प्रशासन ,  पेणचे औषध निरीक्षक श्री.हेमंत राजाराम आडे ,  रायगड डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी श्री.मिलींद अनंत पाटील ,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास दत्तात्रय माने ,  नायब तहसिलदार श्री.सं

महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री.ज.मो.अभ्यंकर यांचा रायगड जिल्हा दौरा

Image
  अलिबाग, दि.05 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबईचे अध्यक्ष श्री.ज.मो.अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा) हे दि.07 मे 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका येथे दौऱ्याकरिता येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे. सकाळी 10.30 वाजता ओशिवरा मुंबई येथून डीव्ही कारने माणगावकडे प्रयाण. दुपारी 02.30 वाजता माणगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 03.00 ते 04.30 अनुसूचित जाती/जमातीच्या संघटना प्रतिनिधींशी चर्चा तसेच अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून निवेदने स्विकारणे व त्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा. सायंकाळी 05.00 ते 06.00 उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई यांनी अनुसूचित जाती जमातीच्या प्रशिक्षणार्थ आयोजित केलेल्या कौशल्य शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 06.00 वाजता माणगाव येथून डीव्ही कारने मुंबईकडे प्रयाण. 00000

शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन 2022-23 सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया सुरू

  अलिबाग, दि.04 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडासुविधा, क्रीडाप्रबोधिनींच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळसेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अर्हता पुढीलप्रमाणे आहे. सरळ प्रवेश प्रक्रिया क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेला खेळाडू ज्यांचे वय 14, 17 व 19 वर्षा आतील मुले-मुली आहेत अशा खेळाडूंना संबधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. खेळनिहाय कौशल्य चाचणी:  क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर सहभागी व ज्यांचे वय 14, 17 व 19 वर्षाचे आत मुले-मुली आहेत अशा खेळाडूंची खेळनिहाय कौशल्य चाचणी आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश दिला जाईल. अनिवासी प्रवेश प्रक्रिया:  अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज

जिल्ह्यात दि.07 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

अलिबाग, दि.04 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यात दि.07 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग श्री.संदीप वि. स्वामी यांनी सांगितले. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे अॅक्टखालील प्रकरणे दिवाणी अपिले, तडजोडपात्र पालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था इतर थकबाकी बाबतची वादपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. न्यायालयात भरलेले शुल्क परत मिळते. त्यामुळे शनिवार, दि.07 मे 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ

विशेष लेख: रायगड पोलीस दल..महिला सुरक्षितता व सबलीकरणासाठी सदैव सज्ज…!

Image
  रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला पथदर्शी सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन दि.01 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार श्रीमती मिनल दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला व मुले यांची सुरक्षितता व सबलीकरणाच्या अनुषंगाने भरोसा सेल, बडी कॉप, पोलीस काका/पोलीस दिदी, सुरक्षित शाळा, मनोधैर्य योजना, स्वसंरक्षणाबाबत प्रशिक्षण, विशेष बाल पोलीस पथक व महिला दक्षता समिती असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या लेखातून जाणून घेवूयात काय आहेत हे उपक्रम.. ·           भरोसा सेल:- पिडीत महिला यांना समुपदेशन कायदेशीर सहाय्य, पोलीस संरक्षण, वैद्यकीय मदत, मानसिक सेवा, तात्पुरता निवारा अशा प्रकारची एकत्रित सुविधा देण्यासाठी

विशेष लेख: फलनिश्चिती रंगीत भात लागवड प्रयोगाची..!

सद्य:स्थितीमध्ये रायगड जिल्ह्यात भातशेतीचे असणारे क्षेत्र जवळपास 1 लाख हेक्टर आहे. मिळणारे दरडोई उत्पन्न वार्षिक रू.1 लाख 25 हजार इतके कमी असल्याने तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे 87 टक्के प्रमाण आणि 3 हजार 500 मि.मी. पाऊस आणि त्यात होणारे बदल यामुळे उत्पन्नात घट होते. या परिस्थितीत रंगीत भात हे एक वरदान ठरले आहे. भात हे जास्त पावसात तग धरणारे एकमेव पीक आहे. या पिकाच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी रंगीत भात लागवड प्रायोगिक तत्वावर केली असून त्याचे बाजारातील आजचे दर कमीत कमी रू.120 ते जास्तीत जास्त रु.350 प्रति किलो आहे. त्याचे पोषणमूल्य साध्या भातापेक्षा खूप जास्त आहे. मधुमेही, हृदयरोगी, लकवा, संधीवात, सोरायसिस, उच्च रक्तदाब, कॅन्सर इ. आजार असलेल्या व्यक्ती तसेच लहान बालके, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता या सर्वांसाठी उपयुक्त असून त्यात पोषण तत्वे उच्च प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्याच्या लागवडीचे नियोजन केले होते. या भाताची वैशिष्ट्ये:- 1. नेहमीच्या भातापेक्षा या भातामध्ये Antocyninचे प्रमाण खूप जास्त आहे. Antocynin हे एक प्रकारचे Antioxident आहे. ज्यामुळे माणसाची रोगप्रतिक

नाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
अलिबाग,  दि.01 (जिमाका): -   जिल्ह्यातील नागरिकांना माझी वसुंधरा, गरूडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व कातकरी उत्थान अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा तत्परतेने देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच प्रकारे नाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून   जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या  उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे  यांनी आज येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे 01 मे, महाराष्ट्र दिनाच्या 62व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण  पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प