महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री.ज.मो.अभ्यंकर यांचा रायगड जिल्हा दौरा

 

अलिबाग, दि.05 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबईचे अध्यक्ष श्री.ज.मो.अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा) हे दि.07 मे 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका येथे दौऱ्याकरिता येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.

सकाळी 10.30 वाजता ओशिवरा मुंबई येथून डीव्ही कारने माणगावकडे प्रयाण. दुपारी 02.30 वाजता माणगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 03.00 ते 04.30 अनुसूचित जाती/जमातीच्या संघटना प्रतिनिधींशी चर्चा तसेच अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून निवेदने स्विकारणे व त्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा. सायंकाळी 05.00 ते 06.00 उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई यांनी अनुसूचित जाती जमातीच्या प्रशिक्षणार्थ आयोजित केलेल्या कौशल्य शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 06.00 वाजता माणगाव येथून डीव्ही कारने मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक