Posts

Showing posts from September 24, 2017

राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

                अलिबाग (जिमाका) दि.29 :- उद्योग व खनिकर्म, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.             मंगळवार  दि. 03 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 8.00 वाजता  बी-6 निवासस्थान मुंबई येथून शासकीय वाहनाने परहूर पोस्ट कामार्ले ता.अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण.   11.30 वाजता संत गाडगेबाबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई संचलित श्री समर्थ संत गाडगेबाबा वृध्दाश्रम परहूर पोस्ट कामार्ले ता.अलिबाग चा नामकरण सोहळा व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.  दुपारी 1.00 वाजता शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह अलिबागकडे प्रयाण. 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग विभाग, पर्यावरण विभाग, खनिकर्म विभागांची आढावा बैठक.  3.00 वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथून रोहाकडे प्रयाण.  सायंकाळी 4.00 वाजता रोहा एमआयडीसी मधील औद्योगिक क्षेत्राची पाहणी.  4.30 वाजता रोहा एमआयडीसी क्षेत्रातील प्रदूषणाबाबत जनता दरबार. स्थळ : शासकीय विश्रामगृह रोहा.  5

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

                अलिबाग (जिमाका) दि.29 :- बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.             शनिवार दि. 30 सप्टेंबर 2017 रोजी रात्रौ 12.00 वाजता डोंबिवली निवासस्थान येथून रोहा जि.रायगकडे प्रयाण.   2.00 वाजता हॉटेल मिराज रोहा येथे आगमन व राखीव.             रविवार  दि. 01 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 6.15 वाजता  हॉटेल मिराज रोहा येथून ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याकडे प्रयाण.  6.30 वाजता ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी  सोहळा येथे आगमन व शासकीय मानवंदना सोहळ्यास उपस्थिती.  9.00 वाजता रोहा येथून पेणकडे प्रयाण.  11.00 वाजता पेण येथे आगमन व भारतीय जनता पार्टी पेण शहर कार्यालयास भेट.  11.45 वाजता पेण येथून खालापूरकडे प्रयाण.  दुपारी 1.00 वाजता देवेंद्रजी साटम यांची भेट व राखीव.  स्थळ : हॉटेल साहेब चौक ता.खालापूर.  3.00 वाजता भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी कार्यालयाचे उद्घाटन व बैठक.  सायंकाळी 4.00 वाजता जनस

वैधानिक लेखापरिक्षणाअंती 20 टक्के लेखा परिक्षण शुल्क शासनास भरणा केलेल्या सनदी,प्रमाणित लेखापरिक्षकास परत मिळणार

        अलिबाग,(जिमाका)दि.29:-   वैधानिक लेखापरिक्षण अंती शासनाकडे भरणा केलेले 20 टक्के लेखापरिक्षण शुल्क् संबंधित सनदि, प्रमाणित लेखापरिक्षकांना दि.30सप्टेंबर 2017 पर्यंत अदा करणेबाबत सुचित केलेले आहे. तरी ठाणे,पालघर व रायगड जिल्ह्यातील संबंधीत सनदी,प्रमाणित लेखापरिक्षक यांनी सहकारी पशु,दुग्ध व मत्स्य संघ संस्थांचे 20 टक्के लेखापरिक्षण शुल्क शासनाकडे भरणा केलेल्या चलनांच्या प्रती व संस्थांची यादी तात्काळ या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन गणेश शंकर शिंदे,जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहाकरी संस्था पदुम,ठाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 000000000000

5ऑक्टोबर 2017 रोजी निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा

अलिबाग,(जिमाका)दि.29:-   रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांसाठी दि. 5ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता जंजिरा सभागृह, पोलीस परेड मैदान, अलिबाग येथे   मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास हजर राहावे, असे आवाहन फिरोज मुल्ला, जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 00000

ध्वनीक्षेपक वापरास रात्री 12 पर्यंत सुट जिल्ह्यातील दिवस जाहीर

अलिबाग,जि.रायगड,दि.29(जिमाका)- केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण)सुधारीत नियम,2017 नुसार नियम 5 उपनियम -3 नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी सहा ते रात्रौ बारा वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाद्वारे    प्राधिकृत केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठीचे पंधरा दिवस जाहीर करण्यात आले आहेत. त्यात नमूद करण्यात आलेले नऊ दिवस रायगड जिल्ह्यात यापूर्वीच उपयोगात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे-शिवजयंती-1दिवस,ईद-ए-मिलाद-1दिवस,डॉ.आंबेडकर जयंती-1दिवस,1 मे-1दिवस, महाराष्ट्र दिन-1दिवस, होळी पोर्णिमा-1दिवस, गणपती उत्सव-4दिवस (दुसरा,पाचवा दिवस,गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी) या सणांकरीता ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम,2017 ची अधिसूचना लागू करण्यात आली होती.             त्यानंतर उर्वरित सहा दिवस निश्चित करुन त्यांची ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण)सुधारीत नियम,2017 अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार नवरात्री उत्सव-2 दिवस (अष्टमी व नवमी),दिवाळी-1दिवस (लक्ष्मीपूजन),ख्रिस

पत्रपरिषदः मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे- श्रीमती पुदलवाड

Image
अलिबाग,जि.रायगड,दि.29(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी तसेच दि.1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर  आधारीत  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम व सेनादलातील मतदारांच्या यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांनी मतदार यादीत आपले नाव व तपशिलाबाबत माहिती नोंदवून घ्यावी, असे आवाहन प्रभारी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करुन पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी देण्यात आलेली माहिती याप्रमाणे- मा.भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार दि.1 नोव्हेंबर 2017 या अर्हता दिनांकावर  कोकण विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या  मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची यादी तयार करण्याचे वेळापत्रक - मतदार नोंदणी जाहीर सुचना प्रसिद्धी दिनांक  गुरुवार दि.28 सप्टेंबर 2017 वर्तमान पत्रातील पुर्नप्रसिद्धी (प्रथम) दिनांक शुक्रवार दि.13 ऑक्टोबर 2017 वर्तमान पत्रातील पु

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

Image
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्र हे महाराष्ट्र राज्यामध्ये क्षार जमीनीवर संशोधन करणारे एकमेव संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राची स्थापना 1943 मध्ये कृषि संशोधन केंद्र म्हणून झाली नंतर आवश्यक असणारे शास्त्रज्ञ व इतर मनुष्यबळ पुरविण्यात आल्यानंतर 1959 मध्ये कृषि संशेाधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प या योजनेतून अंशत: योजना-1 आणि योजना-1 यामधून पुरविण्यात आल्या. या केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगांव या दोन प्रक्षेत्रामध्ये विभागण्यात आले आहे. पनवेल प्रक्षेत्राचे क्षेत्रफळ 12.8.2016 हेक्टर आणि पारगांव प्रक्षेत्राचे क्षेत्रफळ20.24 हेक्टर इतके आहे.    पनवेल व पारगांव हि प्रक्षेत्र कोकणातील रायगड जिल्ह्यातील असून येथे सरासरी पाऊस 2500 ते 3000 मि.मि. पडतो.सरासरी कमाल 33 ते 38 सें.ग्रे. आणि किमान 24.5 ते 29.0 तापमान सें.ग्रे. एवढे असते. तसेच आद्रता 79ते 96 %एवढी असते. कोकणातील चार जिल्ह्यात अंदाजे 65.485 हे.इतके क्षेत्रफळ खार जमिनीखाली आहे. त्यापैकी 85टक्के ठाणे,रायग

'रक्तदान: करुन पहा… छान वाटतं'

Image
मानवाने आपल्या बुध्दीच्या जोरावर विज्ञानाद्वारे अनेक नवनविन प्रयोग केले.अनेक असाध्य गोष्टी साध्य करुन नेहमीच प्रगती करत आहे. मानवास आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. विज्ञानाने बरेंच प्रयत्न केले पण आपण कृत्रिम रक्ताची निर्मिती करु शकलो नाही. हे एक सत्य असून जगातील वैज्ञानिकांना सतत आवाहन देत राहिल. आज मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नसल्यामुळे माणसाचा जीव वाचविण्यासाठी रक्ताचीच आवश्यकता असते. यासाठी   ' रक्तदान   '   हाच एकमेव उपाय आहे. त्यासंदर्भात जनजागृती व्हावी, लोकांना रक्तदानाचे महत्त्व पटावे यासाठी   राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस (दि.1 ऑक्टोबर) निमित्त हा विशेष लेख. राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस   सर्वप्रथम 1 ऑक्टोंबर 1975 साली Indial society of Blood transfusion and immunohaematology द्वारे व्यक्तीच्या जीवनात रक्ताची आवश्यकता आणि रक्ताचे महत्व ”   यासाठी साजरा करण्यात आला. Indial society of Blood transfusion and immunohaematology ची स्थापना 22 ऑक्टोबर 1971 साली डॉ.जे.जी.ज्वाली आणि श्रीमती के.स्वरुप, क्रिसेन संस्थेचे संस्थापक सदस्य यांच्या नेतृत्वात झाल

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2017 पारितोषिक वितरण

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)-   आपण सारे घरात बसून कुटूंबियांसोबत सण साजरे करत असतांना आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा त्याग साऱ्या समाजाने समजावून घेतला पाहिजे. समाजाने स्वतःहूनच अनेक बाबतीत शिस्त पाळली, नियमांचे पालन केले तर अनेक गोष्टींच्या त्रासापासून आपण आणि पोलीस यंत्रणाही मुक्त होईल. म्हणून स्वयंशिस्त ही समाजहिताची आहे, असा हितोपदेश ज्येष्ठनिरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आज येथे केला. रायगड जिल्हा पोलिसदलातर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोस्तव स्पर्धा 2017 चा पारितोषिक वितरण सोहळा आज डॉ. धर्माधिकारी यांच्या हस्ते येथील पीएनपी नाट्यगृहात पार पडला. यासोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक,  बॅंक ऑफ इंडियाचे विमल राजपूत, ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, तसेच प्रकाश धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीगणेशाची व श्री देवीची नृत्यवंदना  सादर केली.  त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  सहभागी गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच ग

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान:गाव विकासाच्या कामांना गती द्या- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)-   ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत ग्राम प्रवर्तकांनी तयार केलेल्या विकास आराखड्याची संबंधित यंत्रणांनी पडताळणी करुन तातडीने गाव विकासाची कामे सुरु करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात  ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत 16 गावांचा विकास ग्रामप्रवर्तकांमार्फत करण्यात येत आहे. त्यासंदर्भात ग्रामप्रवर्तकांनी तयार केलेला गाव विकासाचा आराखडा व त्याचे संभाव्य अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.  यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवळी, मत्स्यविकास अधिकारी अविनाश नाखवा, कौशल्य विकास अधिकारी  सागर मोहिते, स्वदेस फाउंडेशनचे महा व्यवस्थापक तुषार इनामदार तसेच सर्व विभागप्रमुख व सर्व ग्रामप्र्वर्तक उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात 16 गावांत हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात  माणगाव तालुक्यातील काकळ, वडगाव, मुठावळी तर्फे तळा, तळा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3.50 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.28:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.50 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3535.69 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग-0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-18.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-04.00 मि.मि., पोलादपूर-34.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 56.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.50 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   112.51 टक्के इतकी आहे.

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3.50 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.28:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.50 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3535.69 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग-0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-18.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-04.00 मि.मि., पोलादपूर-34.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 56.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.50 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   112.51 टक्के इतकी आहे. 00000

क्रीडा विकासाच्या विविध योजना

  राज्य सरकारने खेळाडूंसाठी तसेच क्रीडा विकासासाठी अनेक योजना कार्यान्वीत केल्या आहेत . ®úÉVªÉÉSªÉÉ GòÒb÷É vÉÉä®úhÉÉxÉÖºÉÉ®ú GòÒb÷É{É]Úõ iɺÉäSÉ ¨ÉènùÉxÉÉÆSªÉÉ Ê´ÉEòɺÉɺÉÉ`öÒ Ê´ÉÊ´ÉvÉ ªÉÉäVÉxÉÉ EòɪÉÇÎx´ÉiÉ आहेत . ªÉÉ ºÉ´ÉÇ ¨ÉÉvªÉ¨ÉÉÆiÉÚxÉ ®úÉVªÉÉiÉ MÉÖhÉ´ÉÆiÉ JÉä³ýÉbÚ÷ iɪÉÉ®ú ´½þÉ´Éä +ÉÊhÉ iªÉÉÆxÉÒ +É{ɱªÉÉ ®úÉVªÉÉSÉä {ɪÉÉǪÉÉxÉä näù¶ÉÉSÉä xÉÉ´É VÉMÉÉiÉ =VV´É±É Eò®úÉ´Éä +ºÉÉ BEò ¨É½þi´ÉÉSÉÉ =qäù¶É ªÉÉ ªÉÉäVÉxÉÉƨÉÉMÉä +ɽäþ. राज्याच्या क्रीडा विभागाकडून विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत दिली जाते. राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख पारितोषिके दिली जातात.वयोवृध्द खेळाडमंना मानधन देण्यात येतो.त्यामध्येही वाढ करण्यात आलेली आहे.शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्तीही दिली जाते.शिवछत्रापती राज्य क्रीडा पुरस्कार,गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, गुणवंत खेळाडू तसेच जिल्हा युवा  पुरस्कारही शासनामार्फत दिले जातात.  MÉÉ´É{ÉÉ