पत्रपरिषदः मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे- श्रीमती पुदलवाड


अलिबाग,जि.रायगड,दि.29(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी तसेच दि.1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर  आधारीत  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम व सेनादलातील मतदारांच्या यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
 या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांनी मतदार यादीत आपले नाव व तपशिलाबाबत माहिती नोंदवून घ्यावी, असे आवाहन प्रभारी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.
यासंदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करुन पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी देण्यात आलेली माहिती याप्रमाणे-
मा.भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार दि.1 नोव्हेंबर 2017 या अर्हता दिनांकावर  कोकण विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या  मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची यादी तयार करण्याचे वेळापत्रक -
मतदार नोंदणी जाहीर सुचना प्रसिद्धी दिनांक  गुरुवार दि.28 सप्टेंबर 2017
वर्तमान पत्रातील पुर्नप्रसिद्धी (प्रथम) दिनांक शुक्रवार दि.13 ऑक्टोबर 2017
वर्तमान पत्रातील पुर्नप्रसिद्धी (द्वितीय) दिनांक बुधवार दि.25 ऑक्टोबर 2017
दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक सोमवार दि.6 नोव्हेंबर 2017
 हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई  सोमवार दि.20 नोव्हेंबर 2017
 प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि.21 नोव्हेंबर 2017
दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी मंगळवार दि.21 नोव्हेंबर ते मंगळवार दि.21 डिसेंबर 2017
दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे मंगळवार दि.15 जानेवारी 2018
मतदार यादीची अंतीम प्रसिद्धी शुक्रवार दि.19 जानेवारी 2018.
पदवीधर मतदार संघासाठी मतदार पात्रताः- मान्यताप्राप्त विद्यापिठातून प्राप्त पदवीधारक, स्थानिक रहिवासी.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
मा.भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार दि.1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर  आधारीत  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम दि.3  ऑक्टोबर 2017 ते 5 जानेवारी 2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम वेळापत्रक
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्दी मंगळवार दि.3 ऑक्टोबर 2017
दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी  मंगळवार दि. 3 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2017.
मतदार यादीमधील  संबंधित भागाचे/ सेक्शनचे ग्राम्सभा/ स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत  बैठक इत्यादी  आणि नावांची खातरजमा करणे- शनिवार दि.7 ऑक्टोबर व शुक्रवार दि.13 ऑक्टोबर 2017
विशेष मोहिम दिनांक रविवार दि.8 ऑक्टोबर 2017 व रविवार दि.22 ऑक्टोबर 2017
दावे व हरकती निकाली काढणे मंगळवार दि.5 डिसेंबर 2017 पर्यंत
डाटाबेस अद्यावतीकरण इत्यादी बुधवार दि.20 डिसेंबर 2017 पर्यंत
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी  शुक्रवार दि.5 जानेवारी 2018.
मतदार यादीतील शेवटच्या भागातील मतदारांची (सेनादलातील मतदार) मतदार यादी -
मा. भारत निवडणूक आयोग यांच्या  निर्देशानुसार दि.1 जानेवारी 2017  या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीतील शेवटच्या भागातील मतदारांची (सेनादलातील मतदार) मतदार यादी नव्याने  तयार करण्यात येणार आहे. त्याचा कार्यक्रम याप्रमाणे-
प्राप्त याद्या तयार करुन अपलोड करणे सोमवार दि.25 सप्टेंबर 2017
प्रारुप प्रसिद्धी- बुधवार दि.4 ऑक्टोबर 2017
प्रारुप यादीची तपासणी व दुरुस्ती व ऑनलाईन तपासणी शुक्रवार दि.13 ऑक्टोबर 2017
अंतिम प्रसिद्धी शुक्रवार दि.18 ऑक्टोबर 2017.
 या कार्यक्रमाप्रमाणे मतदारांनी जागरुकतेने आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक