Posts

Showing posts from August 15, 2021

“आझादी का अमृत महोत्सव-इंडिया @ 75” युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने देशभरात आयोजित केलेल्या फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

  अलिबाग, जि.रायगड दि.13 (जिमाका) :- “ आझादी का अमृत महोत्सव-इंडिया @ 75 ” च्या महोत्सवाचा भाग म्हणून युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने देशभरात फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजित केले आहे.   दि.12 मार्च 2021 रोजी आझादी का अमृत महोत्सवाच्या वेळी भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन प्रसंगीच्या भाषणातून प्रेरणा घेऊन, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने कृती आणि संकल्पांच्या आधारे “ आझादी का अमृत महोत्सव-इंडिया @ 75 ” साजरा करण्याची संकल्पना मांडली आहे. या फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने केले आहे. “ फिट इंडिया फ्रीडम रन ” ची कल्पना गेल्या वर्षी कोविड -19 महामारीच्या जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आली होती. त्यावेळी सामाजिक अंतर ठेवून राहाणे, ही नवीन सामान्य जीवनशैली बनली होती, जेणेकरून सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करतानाही फिटनेसची अत्यावश्यक गरज कायम ठेवता येणार होती. फिट इंडिया फ्रीडम रन   व्हर्च्युअल रन या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. याचाच अर्थ 'आपण ​​ कुठेही

ण तालुक्यातील नवीन दादर पोलीस ठाण्याकरिता मौजे शितोळे येथील शासकीय जागा हस्तांतरित

  पे   अलिबाग, जि.रायगड दि.13 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवीन दादर पोलीस ठाणे प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत नवीन दादर पोलीस ठाणेकरिता शासकीय जमीन देण्याची कार्यवाही तत्परतेने सुरू केली.             या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील नवीन दादर पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामासाठी जागेची योग्य निवड व पाहणी करून नवीन पोलीस ठाणे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.               त्यानुसार मौजे शितोळे, ता.पेण, जि.रायगड येथील ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप यांच्याकडून गट क्र.18/1 येथील क्षेत्र 5-72-30 हे.आर.पैकी 1-00-00 हे.आर. इतकी जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने

पनवेल तालुक्यातील धानसर तलाठी कार्यालयाकरिता जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.17 (जिमाका):- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.   ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.     या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील वारदोली या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.     त्यानुसार तलाठी सजा धानसरसाठी मौजे धानसर येथील स.नं.179 क्षेत्र 8.60.00 हे.आर.पैकी 0.05.00 हे.आर. ही शासकीय जमीन भागोधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने धानसर तलाठी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पालकमंत्री कु.आ

पनवेल तालुक्यातील पालेखुर्द तलाठी कार्यालयाकरिता जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.17 (जिमाका):- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.   ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.     या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील पालेखुर्द या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.     त्यानुसार तलाठी सजा पालेखुर्दसाठी स.नं.55 क्षेत्र 0.58.00 हे.आर.पैकी 0.05.00 हे.आर. ही शासकीय जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने तलाठी सजा पालेखुर्द कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पालकमंत्री कु.आदिती

पेण तालुक्यातील विविध तलाठी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.17 (जिमाका):- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.   ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.     या पार्श्वभूमीवर कामार्ली, उचेडे, आंबेघर, शिर्की, पाबळ या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.     त्यानुसार तलाठी सजा कामार्लीसाठी क्षेत्र 0.04.00 हे.आर., उचेडे येथील तलाठी सजा कांदळेसाठी क्षेत्र 0.01.00 हे.आर.,तलाठी सजा आंबेघरसाठी क्षेत्र 0.05.00 हे.आर., तलाठी सजा शिर्कीसाठी क्षेत्र 0.02.00 हे.आर.,तलाठी सज

करोनाकाळातील उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबच्या टीमचा गौरव

Image
    अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका) :-   करोनाकाळात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅब मधील डॉ.शितल जोशी-घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांना   नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग व त्याचे रिपोर्ट नागरिकांना देणे, हे जोखीमपूर्ण काम अत्यंत कुशलतेने हाताळले.   त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरटीपीसीआर लॅब मधील डॉ.शितल जोशी-घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. 000000

स्वातंत्र्यदिनी कर्जत मधील रेस्क्यू टीमचा सन्मान

Image
        अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका) :-   रक्षा सामाजिक विकास मंडळ ही संस्था सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये गेली 3 वर्ष कार्यरत आहे. या संस्थेच्या रेस्क्यू टीमने बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपत्ती काळामध्ये प्रशासनाला आणि नागरिकांना सहकार्य केले आहे. याबद्दल यावषी्र दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कर्जत पोलीस स्टेशन व कर्जत नगरपरिषद पालिका यांच्या वतीने रक्षा सामाजिक विकास मंडळ संस्थेच्या रेस्क्यू टीमचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात कर्जत नगर परिषदेच्या   नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी पंकज पाटील उपस्थित होते.      दि.21 व 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीमध्ये संस्थेच्या सदस्यांनी कर्जत तालुक्यातील व्यक्तींना पूराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले. याचबरोबर काही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले होते, अशा व्यक्तींचा शोध घेण्याचेही कार्य केले.   महाड येथील तळीये गावात जाऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांना सहकार्य केले. याचबरोबर महाड नियंत्रण कक्ष येथे वायरलेस द्व