ण तालुक्यातील नवीन दादर पोलीस ठाण्याकरिता मौजे शितोळे येथील शासकीय जागा हस्तांतरित

 पे

 

अलिबाग, जि.रायगड दि.13 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवीन दादर पोलीस ठाणे प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत नवीन दादर पोलीस ठाणेकरिता शासकीय जमीन देण्याची कार्यवाही तत्परतेने सुरू केली.

            या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील नवीन दादर पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामासाठी जागेची योग्य निवड व पाहणी करून नवीन पोलीस ठाणे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

              त्यानुसार मौजे शितोळे, ता.पेण, जि.रायगड येथील ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप यांच्याकडून गट क्र.18/1 येथील क्षेत्र 5-72-30 हे.आर.पैकी 1-00-00 हे.आर. इतकी जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने कब्जा हक्काने जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांच्याकडे नवीन दादर पोलीस ठाणे करिता हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतेच जारी केले आहेत.

            पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला कायदा व सुव्यवस्थेच्या सुविधा मिळण्याच्या दृष्टीने हा लोकोपयोगी निर्णय पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडून घेण्यात आला आहे. 

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड