Posts

Showing posts from January 28, 2024

शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठयांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

Image
रायगड (जिमाका) दि. 1:- जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात देण्यासाठी ग्रामपंचायतींनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी तसेच गुणवत्ता पूर्ण पाणी पुरवठयासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले. जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी राज्य पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ.शैलेश कानडे, रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे,प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाखले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राजेंद्र भालेराव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व  बालकल्याण निर्मला कुचीक, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद चौधरी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी  श्री.राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ बास्टेवाड यांनी ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे.त्याचबरोबर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत असे

मच्छिमार बांधवाच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देणार --महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे

Image
           रायगड (जिमाका) दि.2 :-  रायगड जिल्ह्यातील मच्छिमार बांधवाच्या समस्या, प्रस्तावांना गती देण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच सर्व लोकप्रतिनिधी समवेत मंत्री मत्स्यव्यवसाय यांच्याकडे बैठक घेण्याचे आश्वासन     अलिबाग मच्छिमार सहकार सोसायटीच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिले.   अलिबाग येथील जुनी मच्छिमार मैदान येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  यावेळी सहायक मत्स्य व्यवसाय संजय पाटील, तहसिलदार अलिबाग विक्रम पाटील, मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विशाल बना यांसह संचालक मंडळ आणि  रायगड जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, स्वातंत्रोत्तर काळात मच्छिमार बांधवाच्या समस्या सोडविण्यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली.  यंदाचे वर्षे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे ही आनंदाची बाब आहे. या निमित्ताने सर्व मच्छिमार बांधवांना शुभेच्छा देते.  ही सोसायटी केंद्र शासनाकडे नोंदणीकृत संस्था असून गेल्या 75 वर्षामध्ये मच्छिमारांचे अनेक प

जिल्हा सामान्य रुग्णालयास देण्यात आलेल्या आरओयुनिट हस्तांतरण सोहळा संपन्न

Image
             रायगड(जिमाका)दि.2:-  OWENS CORNING    व UNITEDWAY    या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून  जिल्हा सामान्य रुग्णालयास    देण्यात   आलेल्या आर ओ युनिट चा हस्तांतरण    सोहळा   जिल्हा परिषदेचे   मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड,    जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने व जिल्हा आरोग्य अधिकारी,   जि.प.   डॉ.मनीषा विखे तसेच   OWENS CORNING व UNITED WAY तर्फे वरिष्ठ अधिकारी   यांच्या   उपस्थितीमध्ये    संपन्न झाला.      यावेळी     अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शीतल जोशी (घुगे),   OWENS CORNING चे (Director   HR INDIA)  संजय राव,  (Supply Chain Leader) अभिषेक रघुवंशी, (Occupational Physician), डॉ.भालचंद्र पेंढाबकर, (CSR Program Co.Ordinator) धर्मराज प्रधान  तसेच UNITEDWAY    MUMBAI    या संस्थेचे (VP. CommunityInvestment), अनिल परमार,  (VP Co.Operate Partnership) प्राची नौटियाल, (SeniorManager   Community Investment)डॉ.शैलेश वागळे, (Executive) डॉ.अदिल व इतर अधिकारी,   (प्रभारी अधिसेवीका)   श्रीम.अनिता भोपी, सर्व वॉर्डच्या इन्चार्ज सिस्टर उपस्थित होत्या.                     

देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा

    रायगड,दि.30 (जिमाका):-  विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटी इ द्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषि विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्य

अमृत'च्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा--- मुख्य वित्त व लेखाधिकारी महेश वाकचौरे पेण, खोपोली येथे लाभार्थी संवाद मेळावा व मार्गदर्शन

  '   रायगड,दि.30 (जिमाका):-   जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन 'अमृत'चे मुख्य वित्त व लेखाधिकारी तथा जिल्ह्याचे पालक अधिकारी महेश वाकचौरे यांनी लाभार्थी संवाद मेळाव्या दरम्यान केले. श्री वाकचौरे यांनी सांगितले, की महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही आयोग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे.  'अमृत'च्या विविध योजनांचा प्रसार, प्रचार करणे व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक येथे घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या