Posts

Showing posts from June 23, 2024

मतदार यादी द्वितीय संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार जिल्ह्यतील अधिकाधिक पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवण्याचे जिल्हाधिकारी श्री.जावळे यांचे आवाहन दि. 25 जून ते 20 ऑगस्ट या कालावधीत अंमलबजावणी

    रायगड, (जिमाका) दि. 27:--भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दि. 25 जून ते 20  ऑगस्ट 2024 या कालावधीत द्वितीय संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हयातील अधिकाधिक पात्र नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी आवाहन केले आहे.     लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 21 (2) अन्वये आगामी कालावधीत ज्या राज्यातील विधानसभा निवडणूक आहेत त्या राज्यात दि. 01 जुलै या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणेबाबत महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना आयोगाने निर्देश दिले आहेत. घरोघरी मतदार यादीत नावाबाबत पडताळणी होणार या पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमातर्गत दि.25 जून ते 24 जुलै दरम्यान मतदान केंद्र स्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारांच्या घरोघरी मतदार यादीत नावनोंदणी, नावाबाबत पडताळणी करणे, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राचे प्रमाणिकरण व सुसूत्रीकरण करणे, मतदार यादी / मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग रायगड जिल्हा दौऱ्यावर

    रायगड, (जिमाका) दि.27:--महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग जिल्हा दौऱ्यावर येत असून 28 व 29 जून 2024 या दोन दिवसात जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देणार आहेत, असे आयोगाचे सचिव नितीन पाटील यांनी कळविले आहे. या दौऱ्यात 28 जून रोजी  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय , जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी भेट देतील तसेच वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांबरोबर मानव अधिकार संरक्षण संदर्भात आढावा घेणार आहेत. तसेच कर्नाळा येथील युसुफ मेहर अली सेंटर येथे भेट देऊन स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी बरोबर चर्चा करतील. पाली येथील आदिवासी कातकरी यांच्यासाठी विकास कामाबाबत माहिती घेतील. दिनांक 29 जून रोजी माणगाव येथे भेट देऊन माणगाव व म्हसळा येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी बरोबर चर्चा करून आढावा घेतील. माणगाव येथे आदिवासी कातकरी यांच्या विकासाबाबत माहिती घेतील.  तसेच आदिवासी नागरिकांसाठी आधार कार्ड मधील दुरुस्त्या व अद्ययावत करणेच्या मोहीमेतील कार्यवाहीबाबत जाणून घेणार आहेत. 00000000

वाहन भाडे,कंत्राटी तत्त्वावर पुरविण्यासाठी इच्छूकांनी दरपत्रके सादर करावीत

  रायगड(जिमाका)दि.27:- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकत्ता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग या शासकीय कार्यालयासाठी सन-2024-25 या अर्थिक वर्षाकरिता वाहन भाडे/कंत्राटी तत्त्वावर (On Calling) पुरवठा करण्याकरिता दरपत्रके मागविण्यात येत असून इच्छूक वाहन पुरवठादारांनी दरपत्रके खालील नमुन्यात सिलबंद लखोट्यात दि.01 जुलै 2024 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे. विहित नमुना -वाहनाचा तपशिल ( कंपनी मेक व मॉडेल ), वाहन दर प्रति कि.मी. सर्व करासहित-ए.सी, नॉनए.सी, लोकल 8 तासाचे भाडे सर्व करासहित- किमान 150 कि.मी., अतिरिक्त प्रति कि.मी. दर, 24 तासाचे सर्व करासहित- किमान 300 कि.मी, अतिरिक्त प्रति कि.मी. दर. ( सूचना–नमूद करावयाच्या माहीतीमध्ये खाडाखोड करु नये केल्यास सदरचे दरपत्रक रद्द ठरविले जाईल), कार्यालयाचा पत्ता-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग,  वैभव निवास ,  भंडार आळी , चेंढरे अलिबाग . ००००००००

पनवेल येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

    रायगड(जिमाका) दि.27:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत  जिल्ह्यातील महिला व युवांकरिता  शुक्रवार, दि.12 जुलै,2024 रोजी सकाळी 10.00 ते 4.00 वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आ योजित करण्यात आला असल्याची माहिती   कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.  जिल्ह्यातील सन 2024-25 या अर्थिक वर्षातील पहिल्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील कंपन्यांनी स्किल्ड व अनस्किल्ड जास्तीत जास्त रिक्तपदे या कार्यालयास कळविण्यात यावीत. शासनाच्या माध्यमातून खाजगी कंपन्यातील जास्तीत-जास्त रिक्तपदे रोजगार मेळाव्यातून भरती करण्यात येणार आहे. याकरिता  या विभागाचे संकेतस्थळावर  https :// rojgar . mahaswayam . gov . in   नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल / अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी .   ही  माहिती भरताना प्रथम उपरोक्त संकेतस्थळावर  Employment-Employer  ( List a Job )- Employer Login  या क्रमाने जा

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी आधार व मोबाईल सिडिंग करणे अनिवार्य --जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे

    रायगड,(जिमाका)दि.26:-  सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थीना धान्य वितरण करण्यात येते. योजनेत एकूण 17 लाख 69 हजार 776 लाभार्थी आहेत. या लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण (e-kyc) व Mobile Seeding करण्याच्या शासन सूचना आहेत. रेशनकार्डसोबत आधार जोडणी करताना लाभ घेणारी व्यक्ती तीच आहे किंवा कसे याची पडताळणी होणार आहे. याकरिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन तसेच कुटूंबातील व्यक्तींचे मोबाईल क्रमांक देऊन आधार प्रमाणिकरण (e-kyc) व Mobile Seeding करावयाचे आहे. त्याचप्रमाणे ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आपले आधारकार्ड शिधापत्रिकेस जोडलेले नाही अशा शिधापत्रिकाधारकांनीही आपले आधारकार्ड शिधापत्रिकेस संलग्न (Aadhar Seeding) करावयाचे आहे. यामुळे रेशनिंगची गळती थांबण्यासह बोगस लाभार्थीना चाप बसणार आहे. यासंदर्भात सर्व लाभार्थी व स्वस्तधान्य दुकानदार यांना 100 टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.

पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही करावी --जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश

    रायगड (जिमाका) दि.26:-  जिल्ह्यातील गड किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जाणे गरजेचे आहेत. तहसील व उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले, मान्सून पर्यटन आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर   दुर्घटनांच्या होऊ नये यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. या समितीद्वारे सदर गावाच्या परिसर हद्दीतील पर्यटन स्थळ, तलाव, धबधब

फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी

    रायगड(जिमाका)दि.25:-  भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग पदवीधर/मुंबई पदवीधर/मुंबई शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.24 मे 2024 रोजी पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दि. 26 जून 2024 रोजी रबाळे, एपीएमसी, खांदेश्वर व उरण या पोलीस ठाणेच्या हद्दीत मतदान होणार असून दि.01 जुलै 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान शांत, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पाडावे याकरीता कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे, एपीएमसी, खांदेश्वर व उरण या पोलीस ठाणेच्या हद्दीत 08 मतदान केंद्र (इमारत) च्या ठिकाणी असलेल्या एकूण 47 बुथवर पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई प्रशांत मोहिते यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये खालील कृत्यास मनाई आदेश जारी केला आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, वायरलेस किंवा इतर संपर्क साधने घेवून जाण्यास मनाई आहे (निवडणूकीशी संबधित कामाकरीता नियुक्त केलेले अधिकारी/कर्म

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

     रायगड (जिमाका) दि.24:- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जुलै ते माहे डिसेंबर  2024 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. माहे जुलै-2024:  बुधवार, दि.10 जुलै 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.09 जुलै 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.12          जुलै व शुक्रवार, दि.26 जुलै 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.08 जुलै व सोमवार दि.22 जुलै 2024 ता.महाड, मंगळवार, दि.23 जुलै 2024 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 जुलै 2024, ता.माणगाव. माहे ऑगस्ट-2024 :   :  बुधवार, दि.07 ऑगस्ट 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.06 ऑगस्ट 2024, ता.मुरुड, सोमवार, दि.12 ऑगस्ट  व बुधवार, दि.28 ऑगस्ट 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.05 ऑगस्ट व बुधवार दि.21 ऑगस्ट 2024 ता.महाड, गुरुवार, दि.22 ऑगस्ट 2024 ता.श्रीवर्धन,  शुक्रवार, दि.23 ऑगस्ट 2024, ता.माणगाव. माहे सप्टेंबर-2024 :  बुधवार, दि.04 सप्टेंबर 2024, ता.रोहा, मंगळवार, दि.03 सप्टेंबर 2024, ता.मुरुड, शुक्रवार, दि.20 सप्टेंबर  व शुक्रवार, दि.27 सप्टेंबर 2024 ता.अलिबाग, सोमवार, दि.02 सप्टेंबर व सोमवार दि.23 सप्टेंब