पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही करावी --जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश

 

 

रायगड (जिमाका) दि.26:- जिल्ह्यातील गड किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जाणे गरजेचे आहेत. तहसील व उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले, मान्सून पर्यटन आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर   दुर्घटनांच्या होऊ नये यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. या समितीद्वारे सदर गावाच्या परिसर हद्दीतील पर्यटन स्थळ, तलाव, धबधबे , समुद्रकिनारे अशा जागांवर जीवित हानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार , गटविकास अधिकारी , पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना  विविध माध्यमातून सतर्क करावे असे सुचित केले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री.घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बस्टेवाड यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था, काशीद समुद्रकिनारा येथे पर्यटक सुरक्षेसाठी वॉच टॉवर उभारणे, विविध धबधबे गड-किल्ले आदीं ठिकाणी संबंधित विभागांच्या वतीने उपाययोजना करणेबाबत चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता रूपाली पाटील , कार्यकारी अभियंता महेश नामदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी बैठकीत सहभागी होत विविध माहिती दिली. मान्सून पर्यटनाच्या अनुषंगाने विविध तलाव, धबधब्याच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात पर्यटक येत असतात . या व मागील वर्षी काही ठिकाणी अपघात होवून पर्यटकांच्या मृत्यु होण्याच्या दुघटना घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रबळगडाच्या धर्तीवर इरशाळगड, पेब किल्ला, माणिक गड (रसायनी), कोथळी गड(पेठ गड), सागरगड व इतर पर्यटकांच्या गर्दी होणाऱ्या वन विभागाच्या हद्दीमधील गड-किल्ल्यावर स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देणे. पर्यटकांना स्थानिक गार्डड सोबत नेणे बंधनकारक करावे.  पर्यटकांना गड-किल्ले, धबधबा, धरणे , पाणी प्रकल्प  समुद्र किनारी व इतर धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास प्रतिबंध करणे बाबत चर्चा करून सूचना देण्यात आल्या.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड