Posts

Showing posts from March 26, 2023

कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक

कृषी यांत्रिकीकरण योजना ही कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना आहे. कृषी विषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेविषयी जाणून घेऊ या लेखातून… या योजनेसाठी सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी गट, एफपीओ, सहकारी संस्था   पात्र लाभार्थी  असतात.     यासाठी   7/12 व 8 अ, आधारकार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व संवर्ग प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. यामध्ये समाविष्ट बाबी-   कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिटस भाडे तत्वावर कृषी यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (औजारे बँक) यांचा समावेश असणार आहे. यात अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी व महिलांना ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख व इतर बाबींसाठी 50 टक्के औजारे अशी मदत मिळणार आहे. इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख तर इतर औजारेसाठी 40 टक्के किंवा मंजूर कमाल अनुदान मर

स्वदेस फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने माहिती सादर करावी

Image
अलिबाग,दि.30(जिमाका):-   रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनच्यावतीने  रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड या तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प गाव विकास समितीच्या सहकार्यांमधून सुरू आहेत. स्वदेस फाऊंडेशन मार्फत दरवर्षी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. आतापर्यंत हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी स्वदेस शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आपले अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून चांगल्या प्रकारची नोकरी मिळविली आहे.   शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्रता-अटी :- विद्यार्थी हा रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड या तालुक्यातील रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8.5 लाखाचे आत असावे, 12 वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत 60 टक्के पेक्षा जास्त टक्केवारी असावी, विद्यार्थ्याची उच्च शिक्षण घेण्याची महत्वकांक्षा असावी. शिष्यवृत्ती निवड प्रक्रिया :- विद्यार्थ्यांने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वदेस फाउंडेशनने दिलेल्या क्यूआरकोड स्कॅन  करून आपली माहिती भरून दि.15 एप्रिल 2023 पूर्व

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल--केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Image
                   अलिबाग,दि.30(जिमाका):-  मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले.              कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी 13 कि.मी. आणि मूल्य 126.73 कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी 8.60 कि.मी. आणि मूल्य 35.99 कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाडा गाव,ता.पनवेल येथे  संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.              यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, राज्

उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

                अलिबाग,दि.29 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे बुधवार, दि.30 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :              गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता मुक्तागिरी बंगला, मलबार हिल, मुंबई येथून शासकीय वाहनाने खारपाडा, जि.रायगड कडे प्रयाण.             सकाळी 8.15 वाजता खारपाडा, जि.रायगड येथे आगमन व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी महोदयांच्या स्वागतासाठी उपस्थिती.              सकाळी 8.30 वाजता रस्ते परिवहन, महामार्ग मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या विद्यमाने रायगड जिल्ह्यातील पनवेल ते कासू (42 किमी) रस्त्याचे काँक्रीटीकरण व राष्ट्रीय महामार्गावरील इतर 2 कामांच्या भूमीपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ : खारपाडा टोल प्लाझा जवळ, खारपाडा गाव.         सकाळी 9.10 वाजता खारपाडा येथून हेलिकॉप्टरने पाली, ता.जि.रत्नागिरीकडे प्रयाण. ०००००००

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रायगड जिल्हा दौरा

               अलिबाग,दि.29 (जिमाका) :- केंद्रीय मंत्री ना.श्री नितीन गडकरी हे गुरुवार,दि.30 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:                गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 7.45 वाजता सुखदा अपार्टमेंट्स, वरळी मुंबई येथून महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड, मुंबईकडे प्रयाण.    सकाळी 7.55 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड, मुंबई येथे आगमन.  सकाळी 8 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड, मुंबई येथून हेलिकॉप्टरने हेलिपॅड खारपाडा टोलजवळ, जि.रायगडकडे प्रयाण.         सकाळी 8.30 वाजता पनवेल ते इंदापूर (पनवेल-कासू) किमी 00 ते 42/300 चौपदरीकरण नॅशनल हायवेचा पळस्पे, पनवेल, जि.रायगड पायाभरणी समारंभ.       सकाळी 9.10 वाजता हेलिपॅड, खारपाडा टोलजवळ, जि. रायगड येथून हेलिकॉप्टरने इंदापूर ते वाकड विभागाची (पॅकेज 1 ते पॅकेज 7) हवाई पाहणी.        दुपारी 12.15 वाजता  नॅशनल हायवे- 66 येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण. ००००००

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा

      अलिबाग,दि.29(जिमाका):- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ना.श्री.रविंद्र चव्हाण हे गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:             गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता पलावा, डोंबिवली निवासस्थान येथून शासकीय वाहनाने खारपाडा, जि.रायगड कडे प्रयाण.       सकाळी 8 वाजता खारपाडा, जि.रायगड येथे आगमन व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी महोदयांच्या स्वागतासाठी उपस्थिती.      सकाळी 8.30 वाजता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल-इंदापूर (पनवेल-कासू) टप्प्याच्या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : पळस्पे, ता.पनवेल.      सकाळी 9.15 वाजता खारपाडा येथून हेलिकॉप्टरने इंदापूर-वाकड टप्प्याच्या हवाई सर्वेक्षणासाठी प्रयाण.       सकाळी 9.30 वाजता ते सकाळी 11.45 वाजेपर्यंत केंद्रीयमंत्री नितिन गडकरी महोदयांसमवेत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या इंदापूर-वाकड या टप्प्याचे हवाई सर्वेक्षण. त्यानंतर जि.रत्नागिरीकडे प्रयाण. ०००००००

वसतिगृहाकरिता भाडेतत्वावरील इमारतीत जागा मिळण्याकरिता इमारत मालकांनी संपर्क साधावा

    अलिबाग,दि. 29(जिमाका):- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात उघडणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व  विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता 01 व विद्यार्थिनींकरिता 01 अशी एकूण 02 शासकीय वसतिगृहे सुरू करावयाची आहेत.              इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या दि.29 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये प्रति जिल्हा इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मुलांकरिता एक व मुलींकरिता एक अशी दोन १०० क्षमतेची नवीन शासकीय वसतिगृहे नोंदणीकृत संस्थामार्फत चालविण्याकरिता मंजूरी देण्यात आली आहे. इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या दि.28 फेब्रुवारी 2023 अन्वये ही वसतिगृहे शासनामार्फत कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.     तसेच प्रत्येकी 100 क्षमतेची 02 वसतिगृहे जिल्ह्याच्या ठिकाणी अलिबाग येथे इतर मागास प्रवर्गातील मुले व मुलींच्या वसतिगृहाकरिता भाडेतत्वावरील इमारतीत चालवावयाची आहेत.                    या इमारती शाळा, महाविद्यालयाच्या जवळ असाव्यात व मुलींकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सुयोग्य असाव्यात.               इच्छुक इमारत

जिल्ह्यात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता व विद्यार्थिनींकरिता शासकीय वसतिगृहे सुरू होणार

  अलिबाग,दि. 29(जिमाका):- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात उघडणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व  विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता 01 व विद्यार्थिनींकरिता 01 अशी एकूण 02 शासकीय वसतिगृहे सुरू करावयाची आहेत.              इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या दि.29  नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये प्रति जिल्हा इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मुलांकरिता एक व मुलींकरिता एक अशी दोन १०० क्षमतेची नवीन शासकीय वसतिगृहे नोंदणीकृत संस्थामार्फत चालविण्याकरिता मंजूरी देण्यात आली आहे. इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या दि. 28 फेब्रुवारी 2023 अन्वये ही वसतिगृहे शासनामार्फत कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.                यात प्रवेश घेण्याऱ्या प्रवेशितांस भोजन, निवास व इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रवेशिताना ॲप्रन वैद्यकीय इ. साहित्य,अभियांत्रिकी प्रवेशितांकरिता ब्रॉयलर सूट, गणवेश, प्रकल्प भत्ता, स्नेहसंमलेन क्रीडा स्पर्धा इ. अनेक सुविधा शासनामार्फत देय आहेत.               याकरिता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी

लोकशाही दिन 3 एप्रिल 2023 रोजी

    अलिबाग,दि. 29(जिमाका):- जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.              माहे एप्रिल 2023 चा लोकशाही दिन सोमवार, 03 एप्रिल 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेत होणार आहे.                लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी कळविले आहे. 000000

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते संपन्न होणार राष्ट्रीय महामार्ग क्र.66 आणि 965 च्या काँक्रिटीकरणाचा भूमीपूजन सोहळा

             अलिबाग,दि.29(जिमाका):- कोकणासा ठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाड गाव, ता.पनवेल येथे गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी  सकाळी 8.30  वाजता संपन्न होणार आहे.              या भूमीपूजन सोहळा कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री ना.श्री.रविंद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य खासदार श्री.कुमार केतकर, लोकसभा सदस्य, मावळ खासदार श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, रायगड खासदार श्री.सुनिल तटकरे, विधानप

कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्र राज्यासाठी मोठी उपलब्धी...! -- राज्यपाल रमेश बैस

Image
  वृत्त क्र.225                                            दि.27 मार्च 2023     अलिबाग,दि.27(जिमाका):-  दि.15 जुलै 2015 रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मोहिमेची घोषणा केली, ज्यामध्ये त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील चाळीस कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून आज येथे कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमीपूजन समारंभ दिमाखात संपन्न होत आहे, ही बाब महाराष्ट्र राज्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज पनवेल येथे केले.               महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमीपूजन समारंभ पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.               यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, गृह मंत्री  देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व नाविन्यपूर्ण उपक्रम मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवींद्र पाटील, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महार