Posts

Showing posts from March 19, 2023

शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाचा पथनाट्याच्या माध्यमातून लोकजागर

Image
  अलिबाग,दि.25(जिमाका):-  जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग, जिल्हा माहिती कार्यालय व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पनवेल तहसिलदार विजय तळेकर आणि तहसील कार्यालय,पनवेल यांच्या सहकार्याने समाज कल्याण विभागाच्या रमाई आवास घरकुल योजना, स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना यांसह विविध योजनांची जनजागृती पथनाट्याच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील पळस्पे, खांदा कॉलनी, विचुंबे, कुंडेवहाळ या ठिकाणी बहुसंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आली.     खांदा कॉलनी येथील कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता निवडणूक नायब तहसिलदार श्री.नाईक यांनी सहकार्य केले तसेच विचुंबे येथील कार्यक्रमासाठी उपसरपंच प्रमोद शांताराम भिंगारकर, लेखनिक विनायक भोईर य

रेवदंडा-साळाव पुलावरील अवजड वाहतुकीबाबत बंदी आदेश जारी

  अलिबाग,दि.25 (जिमाका):- अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच रेवदंडा-साळाव पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू करावयाचे असल्याने पुढील दोन महिन्यांकरिता रेवदंडा-साळाव पुलावरून 5 टनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत.      त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या दि.3 मार्च 2023 च्या पत्रान्वये अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतूक ही अलिबाग-पोयनाड-वडखळ- नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळा व मार्गे अथवा अलिबाग-पेझारी चेकपोस्ट- नागोठणे - कोलाड - रोहा - तळेखार - साळाव मार्गे तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोली-रो हा-तळेखार-साळाव मार्गे व मुरुड अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरुड - साळाव - तळेखार - चणेरा - रोहा -कोलाड - नागोठणे - वडखळ - पोयनाड - अलिबाग अथवा मुरुड - साळाव - तळेखार - रोहा - कोलाड - नागोठणे - पेझारी चेकपोस्ट- अल

सूक्ष्म व लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार-2022 पात्र उद्योजकांनी अर्ज सादर करण्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन

    अलिबाग,दि.25(जिमाका):-  सूक्ष्म लघु उद्योजकांनी सुयोग्य तंत्रज्ञानाची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकाची निकोप वाढ व्हावी, यासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने शासनाने 1985 या वर्षीपासून जिल्हा पुरस्कार योजना कार्यरत केली आहे.  हे पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये पात्र सूक्ष्म व लघु उद्योग घटकांना देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या सूक्ष्म लघु उद्योजकांनी विहित अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजार समोर, ठिकरुळ नाका, ई-मेल आयडी  didicraigad@gmail.com ,  अलिबाग येथे सादर करावा तसेच अधिक माहितीसाठी व्यवस्थापक  श्री.एस.यू चकोर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळया  यांनी केले आहे.       शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून विजेत्या उद्योजकांची, घटकांची निवड केली जाते. निवड करण्यात आलेल्या उद्योजकांना प्रथम पारितोषिक रुपये 15 हजार, सन्मानचिन्ह तसेच द्वितीय पारितोषिक रुपये 10 हजार, सन्मानचिन्

किल्ले रायगड येथे 5 व 6 एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन छत्रपतींना आदरांजली वाहण्याकरिता शिवभक्तांनी मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

    अलिबाग,दि.24 (जिमाका):-   छत्रपती शिवाजी महाराज यांची दि.6 एप्रिल 2022 रोजी 343 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख पाहुणे म्हणून त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.5 व 6 एप्रिल 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम पुढीलप्रमाणे:- बुधवार दि.5 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर दीपवंदना,  रात्रौ 8.30 वाजता पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत), रात्रौ 9.30 वाजता शाहिरी कार्यक्रम  “ ही रात्र शाहिरांची ”  (राजसभेत), शाहिर

शेतीला शाश्वत सिंचनाची हमी देणारी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना

    राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त    शेती ही पावसावर अवंलबून असणारी कोरडवाहू शेती आहे. पावसाची अनिश्चितता यामुळे सिंचनाअभावी कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. तर काही वेळा प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसामुळे नुकसान होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाचे पाणी साठवून   त्याद्वारे सिंचनाची शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने अनुदान तत्वावर  “ मागेल त्याला शेततळे ”  ही योजना    सुरु केली आहे .       शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांच्या क्रय शक्तीचा विचार करता शेततळे खोदण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना शक्य होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करुन वैयक्तिक शेततळ्यांचा या योजनेत समावेश केला आहे.                  लाभार्थी पात्रता–  अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मार्यादा नाही. शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने या

आदिवासीबहुल गावात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या कामास सुरुवात

Image
    अलिबाग,दि.24(जिमाका):- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) आदर्श शाळा टप्पा 2 अंतर्गत मागील दोन दिवसात सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाच्छापूर येथे 100 टक्के आदिवासीबहुल शाळेत किरकोळ दुरूस्ती व बोअरवेल पाईपलाईन शाळेपर्यंत आणण्याचे काम गावातील गावकऱ्यांकडून श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात येत असून हे गावाचे एकजूटीचे  प्रतिक आहे.   या कामांसाठी जिल्हा परिषद रायगड-अलिबाग, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक गण व शिक्षणाची जाणीव असणारी जागरूक शिक्षण समिती आणि  पालकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे, अशी माहिती महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (VSTF) जिल्हा समन्वयक श्री. रत्नशेखर गजभिये यांनी दिली आहे. ०००००००

श्रीराज मेडिकल अॅण्ड हेल्थकेअर सेंटर व ग्रामीण चॅरिटेबल हॉस्पिटलचा लोककल्याणकारी उपक्रम पाली-परळी येथे 39 बेड्सच्या अत्याधुनिक रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ संपन्न

  अलिबाग,दि.24(जिमाका):- श्रीमद् राजचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटरचे प्रणेते परमपूज्य पप्पाजी यांच्या निष्काम करूणेतून समाज कल्याणार्थ श्रीराज मेडिकल अँड हेल्थकेअर सेंटर व ग्रामीण चॅरिटेबल हॉस्पिटल (एशियाटिक चॅरिटेबल ट्रस्ट) च्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णालयाच्या वास्तूचा भूमीपूजन समारंभ गुरुवारी (दि.23 मार्च) रोजी संपन्न झाला. 39 बेड्स असलेल्या या रुग्णालयाचे भूमीपूजन श्री. निलेश मेहता यांच्या हस्ते पाली तालुक्यातील परळी येथे करण्यात आले. यावेळी एशियाटिक चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी नितीन अजमेरा, हितेन ठक्कर, श्रीमद राजचंद्र आश्रमचे सर्व ट्रस्टी तसेच सुधागड-पालीचे तहसिलदार उत्तम कुंभार, परळी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश कुंभार, वऱ्हाड जांभूळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे, पांडुरंग झोरे व पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश मेहता म्हणाले की, श्रीराज मेडिकल अॅण्ड हेल्थकेअर सेंटरच्या आरोग्य सुविधांची तुम्हाला गरज पडेल अशी वेळच यायला नको. परंतु आवश्यकता पडलीच तर कुटुंबियांना रुग्णाला घेवून शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही, इतके हे रुग्णालय सक्षम व

महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील रूचा समूहाची देशात सर्वाधिक विक्री उत्कृष्ट जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून सिद्धेश राऊळ यांचा गौरव

    अलिबाग,दि.24(जिमाका):-      महाराष्ट्र राज्य ग्रामीण योजनेंतर्गत दि.8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई, वाशी येथे महालक्ष्मी सरस चे आयोजन करण्यात आले होते.  या विक्री प्रदर्शनात देशभरातून 570 स्वयंसहायता समूहाने सहभाग घेतला.  तसेच या प्रदर्शनात 70 खाद्यपदार्थांचे स्टॉल ग्राहकांच्या सेवेसाठी ठेवण्यात आले होते.  ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहाने बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री दि.8 मार्च ते दि.21 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आली. या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातून 10 समूहांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनामध्ये रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील समूहाने सर्वाधिक विक्री केल्याबद्दल उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी व राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री.सिद्धेश चंद्रकांत राऊळ यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.   महालक्ष्मी सरस 2023 मध्ये जिल्हा समन्वयक म्हणून जिल्हा व्यवस्थापक,विपणन रायगड श्री.सिद्धेश चंद्रकांत र

कातकरी उत्थान अभियान आणि सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले वाटप शिबिर संपन्न

Image
      अलिबाग,दि.24(जिमाका):-  कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व  कर्जत उपविभागीय अधिकारी श्री.अजित नैराळे, खालापूर तहसिलदार श्री.अयुब तांबोळी यांच्या पुढाकाराने गुरुवार,दि.23 मार्च 2023 रोजी रानसई आदिवासी वाडी, ग्रुप ग्रामपंचायत शिरावली त. छत्तीशी ता.खालापूर येथे आदिवासी समाजातील बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यासाठी तहसिल कार्यालय खालापूर, परिवर्तन सामाजिक संस्था आणि उरण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर संपन्न झाले. यावेळी मंडळ अधिकारी श्री.तुषार कामत, तलाठी सजा वोवोशी श्री.माधव कावरखे व वावोशी मंडळातील सर्व तलाठी आणि कोतवाल यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये जवळपास 150 फॉर्म भरून घेण्यात आले. या शिबिराच्या‌ आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.महेश पाटील आणि सौ.प्रमिला पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. या शिबिराच्या आयोजनाबद्दल सर्व आदिवासी बांधवांनी तसेच प्रा.राजेंद्र मढवी आणि रत्नाकर घरत यांनी महसूल विभागाचे विशेष आभार मानले. ०००००००

अलिबाग व तळा तालुक्यात समाज कल्याण विभागाच्या योजनांची स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम

      अलिबाग,दि.23 (जिमाका):-  रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व  स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा   यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या पुढाकारातून   समाज कल्याण विभागच्या स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना यांसह विविध योजनांची अलिबाग तालुक्यातील वावे-मल्याण, रामराज, तळा तालुक्यातील टोकार्डे, तळा बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली. या कलापथकाचे नेतृत्व किरण काशिनाथ साळवी करीत असून कलाकार म्हणून पूर्वशा गण, समीक्षा रेडीज, शिवानी मौर्य, रिया टोपले, हर्षदा होगाडे, निशांत नवाखरकर, समृद्धी पाटील, सानिका भगत आदी कलाकार सहभागी झाले असून पथनाट्य यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी वाहतूक नियंत्रक तळा बस स्थानक, रामराज येथील पोलीस

समाज कल्याण विभागाच्या योजनांची स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न

                  अलिबाग,दि.23 (जिमाका):-  रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व  स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा   यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या पुढाकारातून   समाज कल्याण विभागच्या स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना यांसह विविध योजनांचीअलिबाग तालुक्यातील परहूरपाडा, पोयनाड बाजारपेठ, कुर्डुस,भायमला-बहिरमपाडा, बोपोली पेण तालुक्यातील शिहू  येथे जनजागृती करण्यात आली.  या कलापथकाचे नेतृत्व किरण काशिनाथ साळवी करीत असून कलाकार म्हणून पूर्वशा गण, समीक्षा रेडीज, शिवानी मौर्य, रिया टोपले, हर्षदा होगाडे, निशांत नवाखरकर,समृद्धी पाटील, सानिका भगत आदी कलाकार सहभागी झाले असून पथनाट्य यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी पोयनाड ग्रुप ग्रा

शहीद दिनानिमित्त हुतात्म्यांना जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे अभिवादन

Image
  अलिबाग,दि.23 (जिमाका):-- शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे  शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.       यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, लेखाधिकारी देवेंद्र पाटील तसेच  जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. ००००००

“होय…आपण टी.बी.संपवू शकतो…!” जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नि:क्षय मित्रांचा होणार विशेष सत्कार

  अलिबाग,दि.23 (जिमाका):-  दरवर्षी   दि.24 मार्च, जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आरोग्य प्रशासन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील जिल्हा क्षयरोग केंद्र, जिल्हा आरोग्य यंत्रणा, माणुसकी प्रतिष्ठान, सुरभी स्वयंसेवी संस्था, आर.सी.एफ. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी शुक्रवार, दि.24 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, अलिबाग येथे सकाळी 11 वाजता जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृतीपर मुख्य कार्यक्रम तसेच नि:क्षय मित्रांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने क्षयरुग्णांसाठी कोरडा पोषण आहार किट चे वितरण करण्यात येणार आहे.             या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील हे प्रमुख पाहुणे असणार आहेत, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, आर.सी.एफ.थळ चे कार्यकारी संचालक अनिरुध्द खाडिलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.             तरी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या सं

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत कर्ज मंजूरीसाठी बँकांनी सहकार्य करण्याचे तर नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन -- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले

  वृत्त क्र.210                                                                                      दि.23 मार्च 2023     अलिबाग,दि.23 (जिमाका):- रोजगार निर्मितीला चालना मिळावी यासाठी नवउदयोगांना चालना देण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे. होतकरू तरूणांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात हा यामागचा उद्देश आहे. शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना असून टक्क्यांपर्यंत अनुदान 35 वैयक्तिक लाभार्थ्याला लहान प्रक्रिया उद्योग सुरु करण्याकरिता मिळते. सद्य:स्थितीत चालू असलेल्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी ही योजना आहे. 10 लाखापर्यंत कर्ज निगडीत प्रकरणांसाठी कमाल अनुदानाची रक्कम दिली जाते. या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना कर्ज मंजूरीसाठी बँकानी सहकार्य करावे तर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.       कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सन 2020-21 ते 02024-25 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे राज्यभरात रोजगारनिर्मितीला चालन

समाज कल्याण विभागाच्या योजनांची प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न

Image
    अलिबाग,दि.23 (जिमाका):- रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या पुढाकारातून  समाज कल्याण विभागच्या रमाई आवास घरकुल योजना, स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना,  यांसह विविध योजनांची जनजागृती डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, अलिबाग येथे बहुसंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आली.         यावेळी या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. या कलापथकाचे नेतृत्व प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी नंदकुमार गोंधळी करीत असून कलाकार म्हणून विनोद नाईक, सुचित जावरे, यश पाटील, पार्थ म्हात्रे, साहिल म्हात्रे, दिश

समाज कल्याण विभागाच्या योजनांची श्री सिद्धिविनायक सामाजिक मंडळाच्या वतीने जनजागृती

Image
    अलिबाग,दि.23(जिमाका):- रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व श्री सिद्धिविनायक सामाजिक सांस्कृतिक मित्र मंडळ, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या पुढाकारातून  समाज कल्याण विभागच्या स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना यांसह विविध योजनांची जनजागृती मुरुड बस स्थानक, तेलवडे, मुरुड कोळीवाडा, विहूर या ठिकाणी बहुसंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आली.         या कलापथकाचे नेतृत्व शितल म्हात्रे करीत असून कलाकार म्हणून तुषान मढवी, अलंकार पाटील, श्रावणी राऊत, नेहा पाटील, सानवी म्हात्रे, मृदुला म्हात्रे, कृतिका वाटकर आदी कलाकार सहभागी झाले होते. मुरुड मार्केट येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.मयूर कल्याणी यांनी सहकार्य केले

वन्यजीव बचाव आणि पर्यावरण विषयक भरीव कामगिरी करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांचा सत्कार संपन्न

  अलिबाग,दि.21(जिमाका):-   अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील वन्यजीव बचाव आणि त्याबद्दल प्रबोधन करीत असणाऱ्या गुणी कार्यकर्त्यांचा तसेच रायगड जिल्ह्यात कार्यरत वन्यजीव बचाव व समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या संस्थांचा सत्कार रविवार, दि.19 मार्च 2023 रोजी अलिबाग येथे करण्यात आला. या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षक ॲड.अमित चव्हाण, प्रख्यात बालरोगतज्ञ आणि जेष्ठ पक्षी निरीक्षक डॉ.वैभव देशमुख, ज्येष्ठ सर्प अभ्यासक श्री.प्रदीप कुळकर्णी, अलिबाग मधील व्यावसायिक आणि प्राणीमित्र श्री.मंदार गडकरी आणि प्रख्यात व्यावसायिक मिलिंद कवळे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सेवा संकल्प प्रतिष्ठान ही संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यास वाहून घेतलेली संस्था आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवा, महिला कल्याण, नागरी समस्या, ग्राहक संरक्षण, शेतकरी कल्याण अशा विविध 12 विभागांवर संस्थेचे भरीव कार्य अवघ्या महाराष्ट्रभर सुरू आहे. सेवा संकल्प प्रतिष्ठान (रजि) ही संस्था मुंबई मध्ये स्थित असून डॉ. कृष्णाजी दाभोळकर हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत.  डॉ. प्रसाद दाभोळकर रायगड जिल्हा अध्यक्ष

“अग्निवीरवायू भरती प्रक्रिया स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वायुसेनेच्या अग्निवीरवायू स्पर्धा परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शक सत्राचे आयोजन

           अलिबाग,दि.21(जिमाका):-   देशातील तरुणांना भारतीय वायूसेनेत दाखल होऊन देशसेवा करण्याची एक उत्तम संधी म्हणजे 'अग्निवीरवायू ' भरती प्रक्रिया होय. दि. 17 मार्च ते 31 मार्च 2023 मध्ये ह्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. याविषयीची अधिक माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वायूसेनेच्या अग्निवीरवायू या स्पर्धा परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शक सत्र आयोजित केले आहे.  'अग्निवीरवायू भरती प्रक्रिया ' या विषयावरील ऑनलाईन सत्र सोमवार, दि.27 मार्च 2023, रोजी सकाळी 11 वाजता गुगल मीट लिंक:  https://meet.google.com/haz- ggqb-rif  या प्लॅटफॉर्मवर आयोजित केले आहे. या सत्रामध्ये भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर, CO, 6 ASC, मुंबई श्री.दिनेश कुमार यादव हे सहभागी उमेदवारांना या भरती प्रक्रियेचे टप्पे, स्पर्धा परीक्षा, त्यांची तयारी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील तरुणांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रो

जलदिनानिमित्त जिल्ह्यात होणार विशेष ग्रामसभेचे आयोजन

    अलिबाग,दि.21 (जिमाका):-   जागतिक जल दिन 22 मार्च चे औचित्य साधून जल जीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण झालेल्या गावांनी  “ हर घर जल ”  ची घोषणा तसेच हागणदारीमुक्त अधिक (ओडिफ प्लस) निकषाची पूर्तता केलेल्या गावांनी 22 मार्च जागतिक जलदिनी गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गाव  “ हर घर जल ”  व   “ हागणदारी मुक्त ”  घोषित करण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.                            जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्थांना नळ जोडणी द्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमित करीत असल्यास  गावात ग्रामसभेत  बैठक घेऊन हर घर जल ची घोषणा करावी तसेच गावात हागणदारीमुक्त अधिक ओडिफ प्लस यांनी निकषाची पूर्तता यामध्ये गावातील सर्व कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषाची पूर्तता केल्यास ग्रामसभेत बैठक घेऊन ठराव पारित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.          दि. 22 मार्च हा दिवस सर्वत्

महाज्योतीच्या सीईटी/निट/जेईई 2025 प्रशिक्षणासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

                     अलिबाग,दि.21(जिमाका):-  महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय ,   भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यां साठी महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र संयुक्त प्रवेश परीक्षा (सीईटी)/जेईई/निट   2025   या परीक्षा पू र्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.   इच्छुक विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर 31 मार्च 2023 पूर्वी अर्ज करावे ,   असे आवाहन महाज्योतीच्यावतीने करण्यात आले आहे. महाज्योती मार्फत   एमएचसीईटी/जेईई/निट या परीक्षांसाठीचे   ऑनलाईन पद्धतीने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.    या   प्रशिक्षणात सबंधित परीक्षेतील गणित ,   जीवशास्त्र ,   रसायनशास्त्र ,   भौतिकशास्त्र या विषयाच्या तज्ञ व अनुभवी प्रशिक्ष कां मार्फत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात सहभागी उमेदवारांना टॅब   तसेच    त्यासाठी लागणा रे इंटरनेटची ( 6   जीबी/प्रतिदिन) सुविधा तसेच परीक्षेसाठी   लागणा रे   दर्जेदार अभ्यास साहित्य घरपोच देण्यात ये ते . या योजनेसाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे--   उमे