समाज कल्याण विभागाच्या योजनांची श्री सिद्धिविनायक सामाजिक मंडळाच्या वतीने जनजागृती

 


 

अलिबाग,दि.23(जिमाका):- रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व श्री सिद्धिविनायक सामाजिक सांस्कृतिक मित्र मंडळ, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या पुढाकारातून  समाज कल्याण विभागच्या स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना यांसह विविध योजनांची जनजागृती मुरुड बस स्थानक, तेलवडे, मुरुड कोळीवाडा, विहूर या ठिकाणी बहुसंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आली.

        या कलापथकाचे नेतृत्व शितल म्हात्रे करीत असून कलाकार म्हणून तुषान मढवी, अलंकार पाटील, श्रावणी राऊत, नेहा पाटील, सानवी म्हात्रे, मृदुला म्हात्रे, कृतिका वाटकर आदी कलाकार सहभागी झाले होते. मुरुड मार्केट येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.मयूर कल्याणी यांनी सहकार्य केले. बौद्धवाडी तेलवडे येथे सेविका कामिनी म्हात्रे यांनी साहाय्य केले.

       जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या या लोक जागराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक