Posts

Showing posts from September 12, 2021

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1.00 मि.मी. पावसाची झाली नोंद

             अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.20 मि.मी इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3399.27 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 0.00 मि.मी., पेण- 0.00 मि.मी., मुरुड- 4.00 मि.मी., पनवेल- 2.40 मि.मी., उरण-0.00 मि.मी., कर्जत- 3 .00 मि.मी., खालापूर- 3.00 मि.मी., माणगाव- 0.00 मि.मी., रोहा- 0.00 मि.मी., सुधागड-2.00 मि.मी., तळा-1.00 मि.मी., महाड- 2.00 मि.मी., पोलादपूर-0.00 मि.मी, म्हसळा- 1.00 मि.मी., श्रीवर्धन-0.00 मि.मी., माथेरान- 0.80 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 19.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 1.20 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 105.69 टक्के इतकी आहे. 00000

रायगडकरांची स्वप्नपूर्ती… शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

Image
    अलिबाग, जि.रायगड दि.17 (जिमाका) :-   अखेर तो दिवस आला…रायगडकरांची स्वप्नपूर्ती झाली… अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होणार असल्याची माहिती आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आरसीएफ शाळा, लेक्चर हॉल, कुरुळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. लवकरच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रकिया सुरू होणार असून, रायगडसह कोकणातील विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   यावेळी केले. रायगड जिल्ह्यात आरोग्य सुविधेच्या मूलभूत हक्कांपासून कोणीही वंचित राहणार नाही आणि त्यातून आरोग्य स्वयंपूर्ण रायगड वेगाने मार्गक्रमण करताना दिसून येणार आहे. रायगड जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नीत 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक

जिल्ह्यात दि.2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता सेवा अभियानाचे आयोजन

  अलिबाग, जि.रायगड दि.17 (जिमाका) :-  भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार दि.15 सप्टेंबर 2021 पासून जिल्ह्यात स्वच्छ्ता सेवा अभियानांतर्गत गावे स्वच्छ, सुंदर करण्यावर भर दिला जात आहे. हे अभियान दि.2 ऑक्टोंबर 2021 पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिली आहे.         स्वच्छता सेवा अभियान अंतर्गत दि.19 सप्टेंबर 2021 पर्यंत स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार तसेच शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे बनविण्यात येणार आहेत.                  दि. 20 व  दि.21 सप्टेंबर 2021 दरम्यान तालुका व ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ्ता महाश्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय व सार्वजनिक इमारतींची स्वच्छता, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन त्याचे व्यवस्थापन तसेच गावागावात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच दि.21 सप्टेंबर ते दि. 01

म्हसळा तालुक्यातील विविध तलाठी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.17 (जिमाका) :- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.             ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.             या पार्श्वभूमीवर लिपणी, वरवटणे, खरसई या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.             त्यानुसार लिपणी येथील तलाठी कार्यालय, वावेसाठी क्षेत्र 0.03.0 हे.आर., वरवटणे येथील तलाठी सजा, वरवटणेसाठी क्षेत्र 0.03.0 हे.आर., खरसई येथील तलाठी सजा, मेंदडीसाठी क्षेत्र 0.03.0 हे.आर., ही जमीन महसूल मुक्त

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि.30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका) :- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि.30 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.      कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, म्हणून अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरले नसलेल्या विद्यार्थ्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.     मुंबई विभागातील विविध महाविद्यालयात सन 2021-22 मध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्या

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका) :- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या 136 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर   यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.        यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000000

अलिबाग तालुक्यातील विविध तलाठी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.17 (जिमाका) :- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.             ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.             या पार्श्वभूमीवर सोगाव, खंडाळे, वरंडे, कुरकुंडी कोलटेंभी, घोटवडे, चिखली, चिंचोटी, कुर्डूस, बामणोली, केतकीचा मळा, ढवर, पेझारी या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.             त्यानुसार सोगाव येथील तलाठी कार्यालय मापगावसाठी क्षेत्र 0.05.0 हे.आर., खंडाळे येथील तलाठी कार्यालय, खंडाळेसाठी क्षेत्

शेतकऱ्यांनी पडिक जमिनीवर बांबू लागवड करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) :-   शेतकरी त्यांच्या पडीक जमिनीवर बांबू लागवड करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावू शकतात व स्वत:चे आर्थिक उत्पन्न बांबू उपजाच्या माध्यमातूनसुध्दा वाढवू शकतात. जागतिक बांबू दिवसाच्या निमित्ताने जास्तीत जास्त बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण व प्रदूषण कमी करण्याबरोबर बांबू कारागिरांना त्यांच्या रोजगाराची हमी देण्याची परिस्थिती निर्माण करण्याचा सर्वांनी निश्चय करावा,   असे आवाहन वृत्त समन्वयक ठाणे, वनवृत्त श्री.अजय पिलारी सेठ यांनी केले आहे. दरवर्षी 18 सप्टेंबर या दिवशी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बांबू हे बहुउपयोगी वनउपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यास हिरवे सोने असे संबोधले जाते. बांबूचा उपयोग करून मनुष्य जीवनात विकासाची वाटचाल सुरू झाल्याचे इतिहाससुद्धा साक्ष आहे. पुरातन काळात सुद्धा बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात घरबांधणी, अवजारे, हत्यारे व घरगुती वस्तूसाठी करण्यात येत असत. बांबू कारागिरी त्या काळापासून विकसित होत गेली व वस्तूमध्ये सुद्धा सुधार होत गेला.   मोठ्या प्रमाण

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2.00 मि.मी. पावसाची झाली नोंद

                 अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.76 मि.मी इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3396.43 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 5.00 मि.मी., पेण- 0.00 मि.मी., मुरुड- 2.00 मि.मी., पनवेल- 8.80 मि.मी., उरण-5.00 मि.मी., कर्जत- 2 .60 मि.मी., खालापूर- 2.00 मि.मी., माणगाव- 1.00 मि.मी., रोहा- 5.00 मि.मी., सुधागड-0.00 मि.मी., तळा-1.00 मि.मी., महाड- 6.00 मि.मी., पोलादपूर-4.00 मि.मी, म्हसळा- 0.00 मि.मी., श्रीवर्धन-0.00 मि.मी., माथेरान- 1.80 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 44.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 2.76 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 105.60 टक्के इतकी आहे. 00000

राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे जमिनीचे होणारे भूस्खलन तसेच दरड कोसळणे याबाबतच्या अभ्यास व क्षेत्र निश्चितीसाठी समिती गठित

  अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य हे आपत्तीप्रवण राज्य असून राज्याला दरवर्षी विविध आपत्तीचा सामना करावा लागतो. राज्यामध्ये येणाऱ्या आपत्तीपैकी दरड कोसळणे व भूस्खलन होणे ही एक भीषण आपत्ती असून राज्यामध्ये झालेल्या या दुर्घटनेत वित्तीय व मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या आपत्ती होण्याची संभाव्यता अभ्यास करण्यासाठी विविध प्राधिकरणाची मदत घेवून संभाव्य क्षेत्र निश्चित करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती सहाय्य करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्यास   शासनाने मान्यता दिली असून नुकताच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ही समिती पुढीलप्रमाणे आहे:-   प्रा.रवि सिन्हा, आयटीआय, मुंबई हे या समितीचे अध्यक्ष तर सदस्य म्हणून श्री.प्रभाकर देशमुख, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI)चे प्रतिनिधी, डॉ.सतीश ठिगळे, माजी भूशास्त्र विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ, डॉ.शिरीष रावण, (UN-SPIDER), डॉ.भावना उंबरीकर, सहायक प्राध्यापक (भूगर्भशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ), डॉ.टी.पी.सिंग, संचालक, (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ जिओ इन्फॉर्मेटिक,

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.16(जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             शुक्रवार दि.17 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने रोहाकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा.रोहा येथे आगमन व सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट आयोजित ह्दयविकार व अस्थीविकार चिकित्सा शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : भाटे सार्वजनिक वाचनालय, रोहा. सायंकाळी 6.00 वा. रोहा तालुका प्राथमिक शिक्षक परिवार तर्फे कोविड प्रतिबंधक उपाययोजना साहित्य वाटप कार्यक्रम. स्थळ : द.ग.तटकरे सभागृह, पंचायत समिती रोहा. सोईनुसार रोहा येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण, सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7.00 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.15 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.93 मि.मी इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3393.67 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 4.00 मि.मी., पेण- 3.00 मि.मी., मुरुड- 3.00 मि.मी., पनवेल- 6.60 मि.मी., उरण-1.00 मि.मी., कर्जत- 6 .80 मि.मी., खालापूर- 6.00 मि.मी., माणगाव- 7.00 मि.मी., रोहा- 2.00 मि.मी., सुधागड-10.00 मि.मी., तळा-11.00 मि.मी., महाड- 22.00 मि.मी., पोलादपूर-13.00 मि.मी, म्हसळा- 18.00 मि.मी., श्रीवर्धन-3.00 मि.मी., माथेरान- 10.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 126.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 7.93 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 105.51 टक्के इतकी आहे. 00000