Posts

Showing posts from September 15, 2019

बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार अर्ज सादर करण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.   या बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार-2019 साठी केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत.  सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्कारांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2019 अशी हेाती.  आता ती दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पाठविण्यात आलेली आहे.             बालशक्ती पुरस्कार पुढील प्रमाणे : ज्या मुलांनी  (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो.   बालकल्याण पुरस्कार पुढीलप्रमाणे : वैयक्तिक पुरस्कार-मुलांच्या विकास,संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.  संस्था स्तरावर-बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक क

थकीत व्याज रकमेवर दोन टक्के सवलत लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 : जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध कर्ज योजनेंतर्गत स्वयंरोजगाराकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांचे जिल्हा कार्यालय रायगड मार्फत अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.    महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थांसाठी महामंडळाकडून थकीत व्याज रकमेवर दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे.    ही योजना ठराविक कालावधीसाठी असून संबंधित लाभार्थ्यांनी लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करुन कर्ज खाते बंद करावे, असे आवाहन   जिल्हा व्यवस्थापक, रायगड एन.व्ही.नार्वेकर यांनी केले आहे. 000000

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनबाबत जनजागृती

Image
अलिबाग , जि . रायगड ( जिमाका ) दि .17:-   आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम ( इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ) व व्हीव्हीपॅट (VVPAT: Voter Verified Paper Audit Trail) मशीन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून    या मशिन वापराबाबत व त्या संदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून    जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे . तरी या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व आपल्या मनातील शंकांचे निरसन करुन घ्यावे , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . विजय सूर्यवंशी यांनी केले . या संदर्भात अलिबाग एस . टी . स्टँडच्या आवारात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला .   यावेळी नव मतदारांना   मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर त्यासोबत असणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली व त्याची   माहिती दिली . प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय हा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे . मतदान केंद्र , गर्दीची ठिकाणे , बाजार आदी ठिकाणी हे जनजागृती पथ काकडून नागरिकांना ईव्हीएम , व्हीव्हीपॅट याबाबत माहिती देण्यात देईल .      या

22 सप्टेंबरला पनवेल येथे रोजगार‍ मेळावा

अलिबाग , जि . रायगड ( जिमाका ) दि .17:-   महाराष्ट्र शासना च्या कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , पनवेल यांचे विद्यमाने , रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी , सकाळी 10.00 वाजता के . व्ही . कन्याशाळा ( ज्युनिअर कॉलेज ) वडाला तळावा जवळ , ता . पनवेल , जि . रायगड येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आला आहे . सदर मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत . सदर कंपन्याना 10 वी , 12   वी , आयटीआय , पदवी , पदवीधर ( सदर रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उदयोजकांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार ) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे . या मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणा ऱ्या उमेदवारांनी या विभागाच्या https://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देवून नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे . तसेच यापुर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारित संकेतस्थळावर आपला जुना 15 अ

हरीतगृह/शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांची नोंदणी

अलिबाग , जि . रायगड ( जिमाका ) दि .17:-   कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत हरीतगृह / शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांची नोंदणी करणेसाठी जिल्हा स्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत . यासाठी इच्छुकांनी अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , रायगड - अलिबाग , जिल्हा फळरोपवाटिका मु . राऊतवाडी , पो . वेश्वी ता . अलिबाग या कार्यालयास सादर करावा असे आवाहन पांडुरंग शेळके , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , रायगड - अलिबाग यांनी केले आहे . 0000

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 निवडणूक पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न

Image
अलिबाग दि.16 सप्टेंबर- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निवडणूक पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती आदि   उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा निहाय आढावा घेतला.   यावेळी मतदार यादी अद्यावतीकरण तसेच निवडणूक पूर्वतयारी व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत केली जात असलेली जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला. निवडणूक विषयक कामे यंत्रणेने दक्षता ठेवून व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, जिल्ह्यातील निवडणूक शांततेच्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी    आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी तसेच मतदारांमध्ये जनजागृतीवर भर देण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व समिती प्रमुख, पोलीस अधिकारी उपस्थित होते. 000