Posts

Showing posts from October 2, 2016

गाथा विकासाची-जनतेच्या सन्मानाची-(भाग-1)

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग दूरध्वनी -222019, Facebook-dioraigad ई मेल - dioraigad@ gmail.com Twweter-@dioraigad ब्लॉग :  dioraigad दिनांक :-  07 ऑक्टोबर 2016                                                     लेख क्र-49 गाथा विकासाची-जनतेच्या सन्मानाची- (भाग-1)             परिवर्तनाची चक्र आम्ही फिरवत आहोत.   यंत्रणा अधिक पारदर्शक, प्रभावी आणि सहभागशील करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.  याचा देशातल्या प्रत्येक नागरिकाला फायदा होईल असा जनताभिमुख विचार आणि त्यानुसार करण्यात येणारे आचरण अथवा कृती.  यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.                   या कालावधीत देशाच्या विकासास   पुरक आणि जनतेच्या विश्वासास महत्वपूर्ण अशा काही योजनांद्वारे त्यांनी साद दिली. त्यास अपेक्षित असा प्रतिसाद संपूर्ण देशातून

कुपोषण समस्या सोडविण्यास पंच्याहत्तर लाखांचा विशेष निधी - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक :- 06 /10/2016                                                                                                        वृ.क्र.654 कुपोषण समस्या सोडविण्यास पंच्याहत्तर लाखांचा विशेष निधी                                                                 - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.6(जिमाका), जिल्हयात असलेल्या आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून आदिवासी उपयोजनांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून 25 लाख रुपयांचा तर आदिवासी उपयोजना 50 लाख रुपये असा एकूण 75 लाखाचा निधी पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या मान्यतेने तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला असून  जिल्हा प्रशासन गांर्भीयाने हा विषय हाताळत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी  दिली. या नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) आणि बाल उपचार केंद्र (CTC) च्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या उपचारासाठी निधी देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 21 दिवस सॅम (तीव्र कुपोषित) आणि मॅम (कुपोषित) बा

सुधागड-पाली येथे पत्रकारांशी जिल्हा माहिती कार्यालयाचा माध्यम संवाद

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक :- 05/10/2016                                                             वृ.क्र.652 सुधागड-पाली येथे पत्रकारांशी जिल्हा माहिती कार्यालयाचा माध्यम संवाद          अलिबाग दि.05 :- (जिमाका) माध्यम संवाद या उप्रक्रमांतर्गत जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी आज  सुधागड-पाली  तालुक्यातील प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.  जिल्हयातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबागमार्फत माध्यम संवाद हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सुधागड-पाली येथील जिल्हा परिषद विश्रामगृह येथे हा माध्यम संवाद कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी सुधागड-पाली तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विनोद भोईर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.      जिल्हा माहिती अधिकारी यावेळी बोलताना

आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी विकास विभाग

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग दूरध्वनी-222019, ई मेल- dioraigad@ gmail.com,                 dioabg@rediffmail.com                  फेसबुक : dioraigad           ट्विटर Ë : @dioraigad  ब्लॉग : dioraigad   दिनांक :- 05 ऑक्टोबर  2016                                                  लेख क्र.47 आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी विकास विभाग रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी विभागांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी मोबाईल हेल्थ युनिट सुरु करण्यासंदर्भात आदिवासी विकास विभाग आणि उर्वी अशोक पिरॅमल फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यामध्ये पाथरज या गावी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे हस्ते हे मोबाईल हेल्थ युनिट देण्यात आले.  आदिवासींच्या संदर्भातील कुपोषणाबाबत सरकार संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र

रायगड किल्ला संवर्धन आराखडा मुख्यमंत्र्यांना सविस्तर सादरीकरण

Image
दिनांक :- 04 /10/2016                                                                                                        वृ.क्र.644 रायगड किल्ला संवर्धन आराखडा मुख्यमंत्र्यांना सविस्तर  सादरीकरण                                                             अलिबाग दि.04:- (जिमाका)     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्यावर घोषित केलेल्या रायगड किल्ला जतन संवर्धन 520 कोटी रुपयांच्या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण काल विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख व रायगड जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांसमोर मंत्रालय मुंबई येथे केले.  यावेळी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, वित्त व नियेाजन राज्यमंत्री दिपक केसरकर तसेच पर्यटन सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह व इतर अधिकारी उपस्थित होते. रायगड गडकिल्ला संवर्धन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्राथम्यांचा व जिव्हाळयाचा विषय आहे.  येथील कामकाज सुरु करण्यासाठी हिवाळी अधिवेशनापूर्वी शंभर कोटी रुपयांचा निधी भारतीय पुरातत्व खात्याकडून मिळविण्याबाबत आयुक्तांना विनंती केली असता त्यास मुख्यमंत्र्यांनी स