Posts

Showing posts from January 10, 2021

“कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आज जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे “ कोविशील्ड ” लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.               यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, आरसीएफ चे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.             प्रारंभी “ कोविशील्ड ” लसीकरण केंद्राचे   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचण्यात येवून कोविशील्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.                जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी 1 आणि पनवेल येथील 2 अशा 4 केंद्राच्या माध्यमातून आरोग्य   कर्मचाऱ्यांना क

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डिजिटल एक्स- रे,सि.आर.सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर,मॅमोग्राफी मशीनचे लोकार्पण संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- आरसीएफ कंपनीकडून सीएसआरमधून जिल्हा शासकीय रुग्णालयाला देण्यात आलेल्या एक्स- रे,सि. आर.सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर,मॅमोग्राफी डिजिटल मशीनचे पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याहस्ते आज जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे लोकार्पण संपन्न झाले.               यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, आरसीएफ चे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ००००००

दिव्यांग व्यक्तींना दर बुधवार-गुरुवारी दिव्यांग प्रमाणपत्र वितरण सुरु

                अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र तात्काळ (यू.डी.आय.डी.कार्ड) बनवून मिळण्यासाठी दर आठवड्यातील बुधवार व गुरुवार हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दर बुधवारी केवळ अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी करण्यात येते, त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केवळ 50 अस्थिव्यंग रुग्णांना टोकन देऊन तपासणी करून त्यांना त्याच दिवशी प्रमाणपत्र वितरित येत, यासाठी विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सूचना देऊन तसे आदेश देण्यात आले आहेत.             तसेच दर गुरुवारी अस्थिव्यंग सोडून इतर सर्व (नेत्रदोष, कर्णबधीर, मानसिक दोष इ.) दिव्यांगांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाण्याची व्यवस्था केली आहे.               या कामासाठी लागणारे संगणक, प्रिंटर आदि आवश्यक साधनसामुग्रीकरिता आरोग्य प्रशासनाला आरसीएफकडून सहकार्य मिळाले आहे.                 अस्थिव्यंग रुग्णांना जिने चढताना अडचण येऊ नये, म्हणून दर बुधवारी अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी तळमजल्यावरील ओपीडी नं.14 मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक स्वत:

मोटार वाहन निरीक्षकांचा फेब्रुवारी महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

  अलिबाग,जि.रायगड दि.16   (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा फेब्रुवारी-2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार, दि.5 व 12   फेब्रुवारी 2021 रोजी ता.अलिबाग.   सोमवार, दि.8 व दि.15 फेब्रुवारी 2021 रोजी ता. महाड. मंगळवार, दि.9 फेब्रुवारी 2021 रोजी ता.श्रीवर्धन.   बुधवार, दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी माणगाव. मंगळवार, दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी ता.रोहा. बुधवार, दि.17 फेब्रुवारी 2021 रोजी ता.मुरुङ ००००००

पिडित, तक्रारदार महिलांनी महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रारी अर्ज, निवेदन करावेत

            अलिबाग,जि.रायगड, दि.16 (जिमाका) :- महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व सामाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते.   महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये पिडित, तक्रारदार महिलांचे केवळ वैयक्तिक स्वरूपाचे अर्ज स्वीकारले जातात. तक्रार, निवेदन दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.   आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये अर्ज, सेवा विषयक अर्ज, आस्थापना विषयक अर्ज स्वीकारले जात नाहीत.   या महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रारी अर्ज, निवेदन सादर करण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी कार्यालय, घर नं. 738, निलपुष्क, डोंगरी-चेंढरे एमआयडीसी कार्यालयासमोर,अलिबाग (दूरध्वनी क्र.02141-225321) या कार्यालयात तक्रार अर्ज, निवेदन दोन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीमती

सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

            अलिबाग,जि.रायगड, दि.16 (जिमाका) :- जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे   कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण   सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस‍, विषयांकित   कायद्यातील तरतूदींनुसार ‍विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.           त्यानुसार डिसेंबर, 2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ई-आर-1 मधील त्रैमासिक सांखिकी   माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु असून, या सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.   यासाठी सर्व आस्थापनांनी आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शनिवार, दि.16 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 8.00 वा मुंबई येथून बोटीने मांडवाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. मांडवा येथे आगमन व शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. अलिबाग येथे आगमन व कोविड लसीकरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग, सकाळी 9.30 वा. अलिबाग येथून शासकीय वाहनाने मेंदडी ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. मेंदडी येथे आगमन व मेंदडी कोंड नळ पाणीपुरवठा योजना भुमिपूजन. दुपारी 12.45 वा. मेंदडी पिकअप शेड उद्घाटन. दुपारी 1.00 वा. मेंदडी येथील आगरी समाज नळ पाणीपुरवठा   योजना भुमिपूजन. दुपारी 1.30 वा. काळसुरी येथे महिला सामाजिक सभागृह उद्घाटन. दुपारी 2.00 ते 3.00 राखीव. दुपारी 3.00 वा. पंचायत समिती म्हसळा कार्यालयास भेट. दुपारी 3.30 वा. म्हसळा येथून शासकीय वाहनाने रोवळा ता.तळाकडे प्रयाण. सायं.4.30 वा. रोवळा येथे आगमन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना, अभिप्राय दि.22 जानेवारी पर्यंत पाठवावेत

    अलिबाग,जि.रायगड,दि.13 (जिमाका) :- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू/साहसी/दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात. याबाबतची नियमावली शासन निर्णय दि. 24 जानेवारी 2020 नुसार निर्गमित केलेले आहे. या नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.             यासाठी शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय दि.22 जानेवारी 2021 पर्यंत मागविण्याचे शासनाने निर्देशित दिले आहेत. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.                अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे यांचेशी संपर्क साधावा. पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सुचना/अभिप्राय dsysdeskI४@gmal.co

कुक्कुटपालक नागरिकांनी बर्ड फ्ल्यूबाबत काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन भीती बाळगू नये...काळजी घ्यावी...!

  वृत्त क्रमांक:-29                                                           दिनांक :- 13 जानेवारी 2021     अलिबाग,जि.रायगड,दि.13 (जिमाका) :-   सध्या बर्ड फ्लूबाबतची भीती सर्वत्र पसरलेली दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के आणि जिल्हा पशु विकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पक्ष्यांमधील बर्ड फ्लू या आजाराविषयीची योग्य ती माहिती समजून घेऊन त्याप्रमाणे काळजी घ्यावी,भीती बाळगू नये, व अफवांवर विश्वास ठेवू नये.        पक्ष्यांमध्ये अचानक मोठया प्रमाणात मर्तृक आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना त्वरीत कळवावे. पोल्ट्री फार्म मधील पक्ष्यांचा इतर जंगली पक्षाशी (उदा.बदके, कबूतर, पोपट, चिमण्या, कावळे इ.) संपर्क होणार नाही, याची दक्षता घेणे व जैव सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे. कुक्कुटपालकांनी शेड व परिसरामध्ये स्वच्छता बाळगणे. नियमित सोडीयम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून परिसर निर्जंतुकीकरण करणे. संशयित/प्रादूर्भाव झालेल्या फार्मवरुन पक्ष्यांची वाहतूक, खरेदी विक्री थांबव

बाळासाठी आईचा करोनाशी लढा...!

Image
  यशकथा क्र.1                                                                   दिनांक :- 13/01/2021   सौ.पूनम सुरेश भालेराव, वय वर्षे 30. पती सुरेश भालेराव सह मोलमजुरी करून उरण रोड वरील गवळीवाडा येथे राहणारी महिला. करोनाचे संकट तर सुरुच होते. अशातच सौ.पूनम यांचा अपेक्षित प्रसूती कालावधी साधारणत: 22 जानेवारीचा असेल असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला होता. मात्र करोनासदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. 4 जानेवारी रोजी तातडीने दाखल करण्यात आले. त्यांचा दि.5 जानेवारी रोजी करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.   सौ.पूनम यांना आधी दोन अपत्ये आहेत. हे तिसरे अपत्य अपेक्षित होते. मात्र करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वचजण चिंतातूर झाले. त्यात सौ.पूनम यांचे वजन 55 कि.ग्रॅ.होते, तर हिमोग्लोबिन जे 10 हवे हेाते ते फक्त 7.4 इतकेच होते. त्यामुळे डॉक्टरांनाही चिंता वाटत होती. पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बसवराज लोहारे यांच्यासह डॉ.सचिन संकपाळ, डॉ.प्रियंका म्हात्रे, डॉ.अरुणा पोहरे, डॉ.संजय गुडे, स्टाफ नर्स शुभांगी   पंडेरे, भाग्यश्री सिंग, पूनम ला

लोककला व पथनाट्य पथक शासकीय निवडसूची 2021 साठी कला क्षेत्रातील अनुभवी संस्थांनी दि.19 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत

    अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या   लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने लोककला, पथनाट्याद्वारे करण्याकरिता (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरुपी, भारुड इ.) लोककला, पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. तरी याबाबत कला क्षेत्रातील अनुभवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.        इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून अर्जाचा नमुना व माहितीपत्रक प्राप्त करून घ्यावे किंवा www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असलेला अर्जाचा नमुना व माहितीपत्रक उपलब्ध करुन घ्यावे.       विहीत नमुन्यातील अर्ज भरुन जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अलिबाग- रायगड येथे दि.19 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे. पथकाला विविध विषयांवर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम, पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किम

15 जानेवारीला जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींमध्ये 299 मतदान केंद्रांवर 1 लाख 77 हजार 383 मतदार मतदानाचा हक्क बजावणार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :- एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून या मतदान केंद्रावर 1 लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे. तर या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.                     या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवार, दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतदारांच्या आकडेवारीची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे:- अलिबाग- ग्रामपंचायतींची संख्या-4, यामध्ये स्त्री मतदार 4 हजार 482, पुरुष मतदार 4 हजार 249, इतर 0, असे एकूण मतदार   8 हजार 731.   पेण- ग्रामपंचायतींची संख्या-7, यामध्ये स्त्री मतदार 5 हजार 985, पुरुष मतदार 5 हजार 853, इतर 0, असे एकूण मतद

अलिबाग नेहरु युवा केंद्र व जिल्हा विधी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन साजरा

                अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका) :- स्वामी विवेकानंद यांची जयंती युवकांना प्रेरणा देणारी असते म्हणून 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरा होतो. युवा दिनाचे व युवा सप्ताहाचे औचित्य साधून अलिबाग नेहरू युवा केंद्र व जिल्हा विधी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने वरसोली मधील कारभारी क्लासेस येथे 65 युवक/युवतींच्या उपस्थितीत स्वामी विवेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी   निशांत रौतेला आणि कारभारी क्लासचे संचालक यांनी कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून केली. यावेळी काही तरुण व तरुणींना पुष्प देऊन प्रातिनिधिक स्वरुपात राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुणांनी शासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, त्यातून देश सेवा घडू शकते, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे निशांत रौतेला   यांनी उपस्थित युवांना केले. त्याचबरोबर मतदार दिनानिमित्त मतदानाचा आपला हक्क आणि मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहनही केले. जिल्हा विधी प्राधिकरणात

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका) :- जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी(सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.        यावेळी   तहसिलदार सतीश कदम,सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000000