Posts

Showing posts from April 15, 2018

जावळी येथील शाळेत मोफत प्रवेश

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याकरीता जावळी ता.माणगावं येथे सन 2018-19 पासून शासकीय ‍ निवासी शाळेची  इयत्ता 6 वी ते 8 वी  च्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेशप्रक्रिया दि. 1 एप्रिलपासून सुरु झाली असून मोफत प्रवेश दिला जात आहे. जावळी ता.माणगाव येथील शासकीय निवासी शाळेमध्ये प्रवेशिताकरीता आरक्षण पुढील प्रमाणे  आहे. अनुसूचित जाती -80%, अनुसूचित जमाती -10%, अपंग प्रवर्ग -3%,वि मुक्त जाती,भटक्या जमाती- 5%, विशेष मागास प्रवर्ग -2% शासकीय निवासी शाळेची वैशिष्ट्ये- शाळा विभाग व निवासाकरता स्वंतत्र इमारती. शासनामार्फत मोफत सोई पुढीलप्रमाणे- राहण्याची, जेवणाची, गणवेश, शैक्षणिक साहित्य्,निवासी साहित्य्,सुसज्ज् ग्रंथालय,प्रयोगशाळा व संगणक कक्ष, भव्य् खेळाचे मैदान व साहित्य प्रवेशासाठी अर्ज विहीत नमुन्यात भरुन खालील कागदपत्रासह सादर करावा. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला नसल्यास वडिलांचा,पालकांचा उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला (सरपंच,पोलीसपाटील), विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्षाची मार्कलिस्ट्,पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, अपंग असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंग प

'मिसा'बंदींची माहिती पाठविण्याचे आवाहन

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- सन 1975 ते 1977 या कालावधीत लोकशाहीसाठी लढा देतांना 'मिसाअंतर्गत'बंदिवास सोसलेल्या लोकांचा गौरव करण्याचे धोरण शासनाने ठरविले आहे. त्याअनुषंगाने ज्या व्यक्तींवर मिसाअंतर्गत कारवाई झालेल्या व्यक्तिंची माहिती शासनाने मागविली आहे. त्यात मिसाअंतर्गत कारवाई झालेल्या आंदोलकांनी शिक्षा झालेली कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेत जमा करावेत. तसेच ज्या मिसाबंदींचे निधन झाले असेल तर त्यांचे कायदेशीर वारस (पत्नी) व महिला असल्यास पती यांनी सदरची माहिती बुधवार दि.25 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य शाखेत जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

सामाजिक समता सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20:- सहाय्यक आयुक्त समाज रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती निमित्त दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह संपन्न झाला. यानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समता सप्ताहाची सुरुवात दि.8 एप्रिल  रोजी सामाजिक न्याय भवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण दलित मित्र प्रदिप किर्तने, महाड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दि.8 ते 13 एप्रिल दरम्यान विविध जिल्हास्तरीय शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  दि.8 रोजी इयत्ता दहावी वी बारावी च्या विद्यार्थ्यांकरीता करिअर मार्गदर्शनाबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीम. प्राची देशमुख (प्रकाशवाटा करिअर गायडन्स अँड कॉन्सलिंग संस्था अलिबाग)यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 5 विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले. दि.9 एप्रिल रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांक

ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवा उज्ज्वला योजना-पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग, जि. रायगड, (जिमाका) दि.20- पंतप्रधान उज्वला योजना ही ग्रामीण भागातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना असून ही योजना ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी  पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी जे.एन.पी.टी.टाऊनशिप उरण येथे आयोजित ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत उज्वला दिवस कार्यक्रमात केले. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, जे.एन.पी.टी.चे विश्वस्त महेश बालदी, उरणाच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, प्रांताधिकारी श्री.नवले, तहसिलदार कल्पना गौड, उरण नगरपरिषदेचे नगरसेवक आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ना.चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान उज्वला योजना ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया दुर्बल महिलांनी घेतला पाहिजे. या योजनमुळे महिलांना एलपीजी गॅस व शेगडी मिळणार आहे. त्यामुळे चुलीवर जेवण बनविताना होणारा त्रास कमी होणार आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही. येणाऱ्या काळात देशातील साडेतीन कोटी महिलांना या योजनेचा

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे   शुक्रवार, दि.20 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.20 रोजी सकाळी साडेदहा वाजता उरण, जि.रायगड येथे आगमन व उज्जवला दिवस या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती.स्थळ:जे.एन.पी.टी.कॉलनी, उरण,जि.रायगड.सकाळी साडे आकरा वाजता उरण,जि.रायगड येथून ठाणेकडे प्रयाण. 0000

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे   शुक्रवार, दि.20 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.20 रोजी सकाळी साडेदहा वाजता उरण, जि.रायगड येथे आगमन व उज्जवला दिवस या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती.स्थळ:जे.एन.पी.टी.कॉलनी, उरण,जि.रायगड.सकाळी साडे आकरा वाजता उरण,जि.रायगड येथून ठाणेकडे प्रयाण. 0000

युनिट हेडक्वार्टर कोट्यामधून सैन्यभरती मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- भारतीय सैन्यदलात भरती होण्याची सुवर्णसंधी दि आर्टिलरी सेन्टर, नाशिक रोड(महाराष्ट्र) येथे दि.2 जुलै ते 4 जुलै 2018 या कालावधीत युनिट हेडक्वार्टर कोट्यामधून sol GD व   sol Tdn या पदांसाठी सैन्य्भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीप्रक्रीयेत फक्त् माजी व सेवारत सैनिकांची तसेच TAच्या व्यक्तिींची मुले आणि सख्खे भाऊ, युद्ध विधवा यांची मुले पात्र असणार आहेत.तरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर प्रांजल पी जाधव(निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड अलिबाग यांनी केले आहे. 00000

जिल्हास्तर क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबीरास सुरुवात

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- क्रीडा व युवक सेवा संचालानालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हयातील क्रीडा शिक्षकांसाठी दि. १६ ते २५ एप्रिल, २०१८ या कालावधीत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीरास नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरुवात झाली आहे. या शिबीराचे उदघाटन कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे श्री.बी.एल.थोरात, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रमुख पाहुणे म्हणुन तर अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री महादेव कसगावडे उपस्थित होते. जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीरात जिल्ह्यतील विविध तालुक्यातून क्रीडा शिक्षक सहभागी झालेले आहेत. येत्या दहा दिवसामध्ये क्रीडा शिक्षकांना विविध १६ खेळांचे बदललेले नियम, तंत्र , क्रीडा मानसशास्त्र, खेळातील दुखापती व उपचार, डोपींग, खेळाडूंचा आहार इ. ची माहिती संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्ती व क्रीडा मार्गदर्शकांव्दारे दिली जाणार आहे. सहभागी शिक्षकांना शासनाच्या वतीने क्रीडा गणवेश देण्यात आलेला असून त्यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था संकुलातील वसतीगृहामध्ये करण्यात आली आहे. शिबीरामध