Posts

Showing posts from November 29, 2020

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड दि.04 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे..       शनिवार दि. 04 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. श्रीवर्धन येथे आगमन व श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील सोनेाग्राफी व सी.आर.एस.फंड अंतर्गत इ.सी.जी. व एक्स रे मशीनच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11.15 वा. उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन येथून सोमजाई मंदिराकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा.   सोमजाई माता मंदिर येथे आगमन व भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. राखीव. दुपारी 2.15 वा. श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने मदगड वांजळे ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. मदगड किल्ला पायथा येथे आगमन व पाहणी तसेच वांजळे ग्रामस्थांसमवेत चर्चा.   दुपारी 3.30 मदगड येथून वडवली ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. सायं. 4.00 वा. वडवली ता.श्रीवर्धन येथे आगमन व संसद आदर्श ग्रामयोजनेंतर्गत जि.प.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन,डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

  अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका) : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन,डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षणाच्या दि.01 जानेवारी 2021 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र रायगड-अलिबाग येथे सुरु होणा-या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि.30 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणां तर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फूट लांबी असलेल्या 63.35 टनेज क्षमंतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205   अश्वशक्तीचे इं जि न असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे- प्रशिक्षण कालावधी दि. 01 जानेवारी 2021 ते दि.30 जून 2021 ( 6 महिने) आवश्यक   पात्रता- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे, ( आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे), क्रियाशिल मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमा

जिल्हयात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

  अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील पत्रानुसार रायगड जिल्ह्यामध्ये दि. 12 डिसेंबर, 2020 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.               या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन आय.अॅक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच,नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकांबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांचेकडिल थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणेही या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.                दि. 08 फेब्रुवारी 2020 रोजी संप्पन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अलिबाग तालुक्यातील कल्याण व उसर या गावातील 162 भूसंपादनाची दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 49 प्रकरणामधील पक्षकारांनी तडजोड केली व तडजोडीची/नुकसानभरपाईची रक्कम त्यांना तात्काळ प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्वरीत

सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी प्रशासक निवड प्रक्रिया सुरू इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे सहकार विभागाचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका) : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ,78.78 अ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पुरवणी पॅनेल तयार करण्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात यावेत, असे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोकण विभाग, नवी मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले आहे.               महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ,78,78 अ अन्वये कोकण विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांच पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) उच्चतम सहकार पदविका (एच. डी.सी.) धारक, चार्टर्ड अकाऊटंट (सी.ए.)/इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्कर्स अकाऊटंट (आय.सी.डल्ब्यू ए.)/कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) सहकार खात्यातील प्रशासन/लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.                अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभा

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कलम 144 नुसार सुधारित प्रतिबंधात्मक आदेश केले जारी

       अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) : फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.01 नोव्हेंबर 2020 रोजीच्या सकाळी 06.00 वा. पासून ते दि.30 नोव्हेंबर 2020   रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत शासनाच्या अधिसूचनेत नमूद प्रतिबंधित केलेली कृत्ये करण्यास मनाई राहील, असे आदेश जारी करण्यात आले होते, आता शासनाकडून नव्याने लॉकडाऊन कालावधी दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून सुधारित आदेशान्वये (Easing of Restrictions & Phasewise opening of lockdown. - MISSION BEGIN AGAIN) लागू केलेले निर्बंध तसेच सुरु करण्यास मान्यता दिलेल्या बाबी यापुढेही सुरु राहतील, असे निर्देश देण्यात आले आहेत.   त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 च्या तरतुदीनुसार रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.30 नोव्हेंबर 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पासून ते दि.31 डिसेंबर 2020 रोजीचे रात्री 12.00 वा. पर्यंत नव्याने प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. या अधिसूचनेद्वारे दिलेल्या अथवा यानंतर वेळोवळी

जिल्ह्यातील ग्रामीण/शहरी भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना निःशुल्क सहशिक्षणाची जवाहर नवोदय विद्यालयात सूवर्णसंधी !

                अलिबाग,जि.रायगड दि.03 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना 1988 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थापन करण्यात आली. देशाचे माजी पंतप्रधान स्व.श्री.राजीव गांधी यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक व विविध कलागुणांचा विकासाबरोबर आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. नवोदय विद्यालय हे भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत भारत सरकारच्या वतीने चालविण्यात येते.               नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी पासून इयत्ता 12 वी पर्यंत वसतिगृहयुक्त पूर्णतः निःशुल्क सहशिक्षणाची सुविधा आहे. नवोदय विद्यालयाचा पाठ्यक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डद्वारे संचालित करण्यात येतो. सुसज्ज कॉम्प्युटर व विज्ञान प्रयोगशाळा, सॅमसंग स्मार्ट क्लासरूम, प्रशस्त ग्रंथालय, क्रीडांगण व जिम तसेच विद्यालयात मुला-मुलींसाठी आधुनिक व उत्तम शिक्षणाची तसेच निवासाची सुविधाही देण्यात येते.                नवोदय विद्यालयात 75टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व 25टक्केजागा शह

जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात सेल्फी स्टॅन्ड चे उद्घाटन

Image
        अ लिबाग,जि.रायगड दि.03 (जिमाका) :-  जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे जिल्हा सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी, रायगड जिल्हा विधी प्राधिकरण सेवा, जिल्हा न्यायालय,अलिबाग तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते सेल्फी स्टॅन्डचे उद्घाटन करण्यात आले.   यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, अँड.भूषण साळवी, जिल्हा सरकारी वकील, जिल्हा न्यायालय रायगड, जिल्हा सहाय्यक लेखा  रविंद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम अँड ई सौ. रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक  कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर  डापकु, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ  सौ. सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, मोबाईल आयसीटीसी व्हॅन क्लिनर रुपेश पाटील, रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार, क्लिनर संकेत घरत, दि रूरल अँड यंग  फाऊंडेशन  संस्था प्रतिनिधी  सुशील साईकर, रायगड जिल्हा विधी प्राधिकरण सेवा, जिल्हा न्यायालय अल

एडस् नियंत्रण व जनजागृती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी-कर्मचारी-संस्थांचा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते गौरव जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त राबविण्यात आला उपक्रम

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.03 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई अंतर्गत   जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत दि.1 डिसेंबर या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या   कर्मचाऱ्यांचा   जिल्हाधिकारी श्रीम. निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते   सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.             रायगड जिल्ह्यातील सन 2019-20 मध्ये त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टांचे अवलोकन केले असता ग्रामीण रुग्णालय उरण येथील आयसीटीसी समुपदेशक महादेव पवार यांनी 98.57 टक्के, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील आयसीटीसी 02 मधील समुपदेशक श्रीम.कल्पना गाडे   यांनी 97.79 टक्के तर ग्रामीण रुग्णालय मुरुड येथील आयसीटीसी समुपदेशक सचिन जाधव यांनी 97.43   टक्के कामाचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. त्यामुळे त्यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय असे क्रमांक देऊन सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून   गौरविण्यात आले आहेत. तसेच उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उपजिल्ह

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड दि.03 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे..       शुक्रवार दि. 04 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.30 वा. सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथून शासकीय वाहनाने खैरकाटी, आदिवासीवाडी-रानसई ता.उरणकडे प्रयाण. सकाळी. 10:30 वा. खैरकाटी, आदिवासीवाडी-रानसई ता.उरण येथे आगमन व ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत पिण्याचे पाणी संचाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (मार्गे गव्हाणफाटा), सकाळी 11.15 वा.खैरकाटी, रानसई ता.उरण येथून शासकीय वाहनाने उरणकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. उरण येथे आगमन व सिडको आणि शासनाने संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : सिडको ट्रेनिंग सेंटर, केअर पाँईट हॉस्पिटलजवळ, बोकडविरा, उरण, दुपारी 12.30 वा. राखीव. (जे.एन.पी.टी.विश्रामगृह,उरण), दुपारी 1.30 वा. जे.एन.पी.टी.विश्रामगृह,उरण येथून शासकीय वाहनाने लोहगड, ता.मावळ, जि.पुणेकडे प्रयाण. सायं.4.00 वा. मावळ येथे

दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,संस्था होणार दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

    अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :- सन 2020- 21 मध्ये रायगड जिल्हा परिषदेने आपल्या मूळ अर्थसंकल्पात          5 टक्के दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या लाभासाठी पुढीलप्रमाणे निकष   निश्चित केलेले आहेत.     दिव्यांग व्यक्ती रायगड जिल्ह्याचा किमान 10 वर्षे रहिवाशी असावा. तसेच   संस्थेसंदर्भात संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असावी, दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा, अर्जासोबत दिव्यांग क्षेत्रातील कार्याचा इतिवृतांत किमान 200 शब्दांत मराठी मध्ये असावा, दिव्यांग क्षेत्रात काम केलेल्या कार्याचे फोटो ,वृत्तपत्रीय कात्रणे व संस्था संदर्भात संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडावे, निवड केलेल्या व्यक्तीस/संस्थेस रक्कम रू.10 हजार रोख व शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल, प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि. 18 डिसेंबर 2020   अशी आहे.    या पुरस्काराचे विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयाकडे उपलब्ध

मोटार वाहन निरीक्षकांचा डिसेंबर महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,जि.रायगड दि.2 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा डिसेंबर-2020 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे- सोमवार, दि.07 व दि.21 डिसेंबर 2020 रोजी ता. महाड.   मंगळवार, दि.8   डिसेंबर   2020   रोजी ता.श्रीवर्धन.   बुधवार, दि.09 डिसेंबर 2020   रोजी माणगाव.    शुक्रवार, दि.11, व दि.18 डिसेंबर 2020 रोजी ता.अलिबाग.   सोमवार, दि.14 डिसेंबर 2020 रोजी ता.रोहा. मंगळवार, दि.15 डिसेंबर 2020 रोजी ता.मुरुङ ००००००

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करण्याचे पालकमंत्री आदिती तटकरेंचे निर्देश

  अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका) :- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय,अलिबाग येथे सुरू असणाऱ्या तयारीची पाहणी केली व त्यांनी पुढील आवश्यक त्या कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.     यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, पालकमंत्री महोदयांचे खाजगी सचिव डॉ.जगन्नाथ वीरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसिलदार सचिन शेजाळ व इतर अधिकारी कर्मचारी तसेच पदाधिकारी   उपस्थित होते. ००००००

जानेवारी-फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 2 नगरपरिषदा व 17 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

  अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :-   राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 2 नगरपरिषदा व 17 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, व पोलादपूर या नगरपंचायतीची मुदत दि.24 जानेवारी 2021 रोजी संपुष्टात येत आहे.               प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना दि. 02 डिसेंबर 2020 रोजी संबधित नगरपंचायतीच्या व जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व वेबसाईट प्रसिध्द करण्यात आलेली आहे.               प्रभाग रचनेवर हरकती व सूचना स्विकारण्याचा कालावधी व हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांची पुढीलप्रमाणे नेमणूक करण्यात आलेली आहे:- नगरपंचायतीचे नाव- खालापूर, हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव- श्री.गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, दिनांक- बुधवार दि.02   ते बुधवार दि.09 डिसेंबर 2020 , वेळ-सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15, हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण-खालापूर नगरपंचायत, ता.

01 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त.... जागतिक एकता, सामायिक जबाबदारी !"

  विशेष लेख क्र.38                                                                          दिनांक :- 01 डिसेंबर 2020       लाल फित (रेड रिबन) आंतरराष्ट्रीय जनजागृतीचे एड्सचे प्रतिक मानले गेले. जे एच.आय.व्ही/एड्स या आजाराने मृत्यूमुखी झाले आहेत. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी, ज्याची या आजाराने हानी झाली आहे. त्यांना आधार दाखविण्यासाठी आणि त्यांना झळ पोहोचलेली आहे, त्यांच्याशी दृढ सामाजिक बांधिलकी म्हणून "लाल फित" लावली जाते."         01 डिसेंबर हा दिवस एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी पाळला जातो. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्ल्यू. बँन आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या, जिनेवा(स्वित्झर्लंड) येथील जागतिक कार्यक्रमात एड्स या रोगाची संकल्पना मांडली. डॉ.जानथन मान यांच्या सहमती नंतर 01 डिसेंबर 1988 पासून हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्ल्यू बँन व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये सन १९८८ मध्ये साजरा केला.या वर्षाचे शासनाचे घोष वाक्य आहे "ज

जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड योजनेला दि. 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ

    अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक यांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. सध्या करोना विषाणू (कोविड-19) संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्यामुळे शासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात येत आहेत. करोना विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यामुळे या योजनेला दि. 31 मार्च 2021पर्यंत मुदतवाढ दिली आहे.      तसेच दि. 30 एप्रिल 2021 पासून जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्वरित   नजिकच्या आगारातील संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून, जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड नोंदणी करावी व राज्य परिवहन महामंडळाच्या या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन रायगड विभाग, पेण यांनी केले आहे. ००००००

जिल्ह्यातील जनतेला क्रीडाविषयक सुविधा देण्याविषयीची कामे जलदगतीने पूर्ण करावीत पालकमंत्री आदिती तटकरेंचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

    अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका):- येथील जिल्हा क्रीडा संकुलातील सोयीसुविधांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी नुकतीच (दि.30 नोव्हें.) पाहणी केली. या पाहणी दरम्यान   त्यांनी खेळाडूंना व   जनतेला आवश्यक असलेल्या क्रीडाविषयक देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. याशिवाय क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय सभागृह व वसतिगृहाची दुरूस्ती, संरक्षक भिंतीचे अंदाजपत्रक तयार करून मंजूरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे, जिल्ह्यातील मल्लखांब आखाडे, जिल्हा व राज्यस्तरावरील कुस्तीच्या स्पर्धांसाठी आवश्यक निकषांप्रमाणे कुस्तीपटूंसाठी मातीचा आखाडा तयार करणे, त्याचप्रमाणे नव्याने 400 मीटर लांबीचा सिन्थेटीक ट्रॅक तयार करणे, शूटिंग रेंज उभारणे, श्रीवर्धन, म्हसळा, सुधागड या तालुक्यांसाठी तालुका क्रीडा संकुल उभारणी करण्याच्या कामकाजाबद्दलचा आणि माणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल कामकाजाचा आढावा घेतला. याबरोबरच रेवस बंदराकडे जाणाऱ्या परिवहन विभागाच्या एसटी बसेस या जिल्हा क्रीडा संकुल मार्गे नेण्यासाठी अलिबाग बस आगारास तसे विनंती पत्र देण्यात यावे, अशा सूचना देवून पालकमंत्री कु.आदिती

अत्याधुनिक आरोग्य सोयीसुविधांचा माणगावकरांना निश्चितच लाभ होईल पालकमंत्री आदिती तटकरे

Image
  अलिबाग,जि.रायगड, दि.1, (जिमाका):-   माणगाव तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे व आमदार भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते पोर्टेबल एक्स-रे मशीन, कोविड पूर्व तपासणी केंद्र व फिरता दवाखाना असलेली अत्याधुनिक व   सर्व प्रकारच्या आरोग्य सोयी-सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, अत्यंत प्रगत अत्याधुनिक ईसीजी मशिन चे उद्घाटन आज करण्यात आले. या अत्याधुनिक आरोग्य सोयी-सुविधांचा माणगावकरांना निश्चितच लाभ होईल, कोविड संशयित रुग्ण शोध मोहिमेस मोठा हातभार लागेल व इतर क्षयरोग, न्यूमोनियासदृश्य रुग्ण शोधण्यास देखील मदत होईल, असे प्रतिपादन याप्रसंगी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.    यावेळी माणगाव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसिलदार ललिता बाबर व अन्य अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते. 000000